माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी केली जनहित याचिका दाखल.
बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणात नवीन ट्विस्ट. संबंधित शाळेच्या विश्वस्तांवर मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी जनहित दाखल केली आहे.
बदलापूरमध्ये बालिकांच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या, दुसऱ्याच दिवशी त्या शाळेतून अन्य एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. असही दावा याचिकेत करण्यात आला आहे.
या प्रकरणात बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे याप्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
लहान मुलांचे पाॅर्न व्हिडिओ तयार करुन विकण्याचा (पाॅर्नोग्राफी) आरोप केतन तिरोडकर उगाचच करणार नाहीत. हे केतन तिरोडकर तेच आहेत, ज्यांनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारने सर्वप्रथम दिलेले १६ टक्के मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात देवेंद्रजींचे गुरु श्रीहरी अणे यांचेसोबत धाव घेतली होती.
हा आरोप त्यांनी हवेत न करता थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन केला आहे. त्यामुळे त्यामध्ये तथ्य असण्याची शक्यता जास्त आहे. याच कारणासाठी आजतागायत भाजपाचे लाडके व संबंधित संस्थेचे सचिव तुषार आपटे व अध्यक्ष उदय कोतवाल यांना अजूनही पोलीस अटक करु शकलेले नाहीत का?
संबंधित शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थीनींच्या भवितव्याचे काय? आणि संस्थाचालकांना वाचवणाऱ्यांचे काय??
- तुषार गायकवाड
Tushar Gaikwad
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत