देशनोकरीविषयकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

कोणावाचून कोणाचे अडत नाही -शांताराम ओंकार निकम

एकदा सूर्य अहंकाराने म्हणाला.
“मी आहे म्हणून पृथ्वीवर उजेड आहे.पृथ्वीवरची सर्व कामे माझ्याच प्रकाशात होत असतात. ही जगराहाटी माझ्यामुळेच सुरू आहे;पण मला चिंता पडली आहे की ,मी गेल्यावर काय? पृथ्वीला कोण उजेड देईल?
तेंव्हा एक मातीची पणती मिणमिणत म्हणाली,” महाराज आपण काळजी करू नका,मी देईल माझ्या परीने पृथ्वीला उजेड,मी प्रयत्न करेन जगराहाटी सुरू ठेवण्याचा.मी तुमची आठवण देखील होऊ देणार नाही.आपण खुशाल जावे.चिंता करू नये.”

सूर्याला वाटले होते.माझी जागा कोणीच घेऊ शकत नाही.मी गेल्यानंतर पृथ्वी ओस पडेल.जगराहाटी थांबेल.
पण लहानशा पणतीने सूर्याची चिंता मिटवली.गर्व मिटवला.

घरातील कर्त्या पुरुषास वाटत असते ,मी म्हणजे घर,माझ्याशिवाय घराला घरपण नाही, मी गेलो तर घरातील सर्वच उपाशी मरतील.माझी आठवण त्यांना येईल.मी आहे म्हणून सगळे खुशाल आहेत.माझ्या कर्तृत्वाने घराण्याचे नाव आहे.पण मी गेल्यावर यांचे कसे होईल? कोण देईल यांना आधार?

पण तसे काही होत नाही.
घरातील कर्ता गेला म्हणजे ‘वर’ गेला ,तर त्याची जागा त्याची पत्नी घेते किंवा त्याच्यापेक्षा लहान असलेली व्यक्ती घेते.पण घर उदास होऊ देत नाहीत. घरगाडा बंद पडू देत नाहीत.

प्रसंगी घरातील सगळेच लोक घराची जबाबदारी वाटून घेतात.
मी म्हणजे सर्व काही असे कधीच नसते.

भा.रा. तांबे यांनी मी मी म्हणाऱ्यांना ,आणि मी आहे म्हणून सर्वकाही आहे अशी शेखी मिरवणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.ते म्हणतात,

“जण पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’ मी जातां राहील कार्य काय।।

सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील। होईल कांहिं का अंतराय।।

मेघ वर्षतील शेतें पिकतील। गर्वानें या नद्या वाहतील।। कुणा काळजी कीं न उमटतील। पुन्हा तटावर हेच पाय।।

सगे सोयरे डोळे पुसतील। पुन्हा आपल्या कामी लागतील।। उठतील बसतील हसुनि खिदळतील। मी जातां त्यांचें काय जाय।।

राम कृष्णही आले गेले। तयां विना हे जग ना अडले।। कुणीं सदोदित सूतक धरिलें। मग काय अटकलें मजशिवाय।।

कोणावाचून कोणाचे काही अडत नाही.

त्याची जागा घेणारा असतोच कुठे तरी.

व.पु .काळे यांनी ‘कर्मचारी’ पुस्तकात एक निवृत्त कर्मचाऱ्याची खंत व्यक्त केली आहे.
ते म्हणतात,’कर्मचारी आयुष्यभर घड्याळाच्या काट्याप्रमाणे काम करत असतो.रोजची धावपळ सुरू असते.लोकल चुकायला नको, कामावर वेळेवर गेले पाहिजे.आजारी पडला तरी सुट्टी घेत नाही.
कारण काय तर,कर्मचाऱ्याला वाटते.’मी जर कामावर गेलो नाही तर माझे काम कोण करेल? माझ्यावाचून सगळ्यांचे अडेल.’

तो त्याच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होईपर्यंत इमाने इतबारे काम करतो.धावपळ करतो,व्यक्तिगत आनंद अव्हेरतो.

तो सेवा निवृत्त होतो.

काही दिवसांनी तो जेंव्हा कार्यालयात जातो.तर जुने सहकारी भेटतात. ‘कसे चालले आहे?’ विचारतात,चहा घेता का? विचारात.आणि जे ते आपापल्या कामाला लागतात.त्याच्याशी बोलायला कोणाला फुरसत नसते.

तो सहजच ज्या टेबलवर काम करत असतो.आणि त्या टेबलाचे काम करण्यासाठी रोजची धावपळ सुरू असते.त्या टेबलकडे बघतो.तर त्या टेबलवर दुसरीच एक नवीन व्यक्ती बसलेली असते आणि ती तिचे काम करत असते.

याच्या तोंडाचा चंबू होतो.हा स्वगतच म्हणतो,” सेवानिवृत्त होईपर्यंत मला चिंता होती,माझे काम कोण करेल ,मी नसलो तर सर्व अडून राहील.म्हणून मी रोज धावपळ करत होतो,पण माझ्यावाचून सगळेच सुरळीत सुरू आहे.काहीच अडले नाही.माझा गैरसमज होता.’ माझ्या वाचून काहीच होणार नाही.’

जग हे असेच चाललेले असते.कोणी अमरपट्टा घेऊन आलेले नसते.त्यामुळे मी म्हणजेच सर्वकाही असे कोणीच म्हणू नये. आपण गेल्यावर आपली जागा घेणारे खूप असतात.कदाचित आपल्यापेक्षा बेहत्तर असतात.आपण फक्त साहिर लुघुयानवी यांच्या भाषेत एवढेच म्हणायचे,

“मैं पल दो पल का शायर हूं पल दो पल मेरी कहानी है

पल दो पल मेरी हस्ती है पल दो पल मेरी जवानी है

मुझ से पहले कितने शायर आए और आ कर चले गए

कुछ आहें भर कर लौट गए कुछ नग़्मे गा कर चले गए

वो भी इक पल का क़िस्सा थे मैं भी इक पल का क़िस्सा हूं
कल तुम से जुदा हो जाऊंगा गो आज तुम्हारा हिस्सा हूं

पल दो पल में कुछ कह पाया इतनी ही सआदत काफ़ी है
पल दो पल तुम ने मुझ को सुना इतनी ही इनायत काफ़ी है

कल और आएंगे नग़्मों की खिलती कलियां चुनने वाले
मुझ से बेहतर कहने वाले तुम से बेहतर सुनने वाले
हर नस्ल इक फ़स्ल है धरती की आज उगती है कल कटती है
जीवन वो महंगी मुद्रा है जो क़तरा क़तरा बटती है

सागर से उभरी लहर हूं मैं सागर में फिर खो जाऊंगा
मिट्टी की रूह का सपना हूं मिट्टी में फिर सो जाऊंगा
कल कोई मुझ को याद करे क्यूं कोई मुझ को याद करे
मसरूफ़ ज़माना मेरे लिए क्यूं वक़्त अपना बरबाद करे.”

इतकं लक्षात घेतले म्हणजे माणूस जमिनीवर चालू लागतो.नाहीतर हवेतच राहणारी अनेक जण आपल्या आजूबाजूला आहेतच ना.

पक्षाच्या बाबतीत काहींना वाटते,” मी म्हणजे पक्ष,मी पक्षाचा चेहरा आहे.माझ्याशिवाय पक्षाला चेहराच नाही,मी गेलो की पक्ष कोलमडेल,अगदी पक्षाचे नामोनिशाण मिटून जाईल.

पण तसे नसते.

पक्ष कधी संपत नसतो.जसा रस्ता कधी संपत नसतो ;आपला प्रवास संपत असतो.रस्त्यावरून आपण प्रवास करत असतो, रस्ता मात्र वर्षोनी वर्षे तिथेच असतो.
तसाच पक्ष तिथेच असतो.आपले कार्य संपले की आपण निवृत्त होतो.पक्ष मात्र तिथेच असतो.आपली जागा चालवायला दुसरा कोणीतरी तयार असतोच असतो.

पक्ष फक्त श्रीमंत लोक चालवू शकतात,हे जर कोणाचे अज्ञान असेल तर त्याने काढून टाकावे.
अगदी आपल्या आजूबाजूला असणारी आताची उदाहरणे तुम्हाला सांगतील,की पक्ष फक्त श्रीमंत लोकच चालवू शकतात, ज्यांच्याकडे गाडी घोडा आहे असेच लोक पक्ष चालवू शकतात.तसे काही नसते.

पक्ष चालवण्यासाठी जिद्द,चिकाटी, मेहनत ,तळमळ,इमानदारी ,एकनिष्ठता या गोष्टी आवश्यक असतात.

रिपब्लिकन पक्षाचे नेते मा.रामदास आठवले याचे सुरुवातीचे दिवस आठवा,

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुरुवातीचे दिवस आठवा,

मा.कांशीराम यांनी तर सायकल घेऊन,लोकांकडून वर्गणी गोळा करून पक्ष चालवला.

हिटलरने तर काही दिवस भीक मागून खाल्ले आहे,तो आपल्या कर्तृत्वावर जर्मनीचा चान्सलर झाला. त्याने जगावर दुसरे महायुद्ध लादले.

इतकेच उदाहरणे बस.खूप उदाहरणे आहेत.
सामान्य कुटुंबातील मा.रामदास आठवले चिकाटी,जिद्द,मेहनत,तळमळ,त्याग या गुणामुळे भारतासारख्या बलाढ्य देशाचे मंत्री झाले, एकेकाळी रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे मा.एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
मा.कांशीराम यांचा बहुजन समाज पक्ष देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला,या पक्षाच्या मायावती उत्तरप्रदेश राज्याच्या चार वेळा मुख्यमंत्री झाल्या.

मायावती एक शाळेत शिक्षिका होत्या. त्यांच्याकडे कुठे गाडी घोडा होता?

चिकाटी ,तळमळ या गोष्टींमुळे पक्ष मोठा होत असतो.

उथळ लोक पक्ष पुढे नेऊ शकत नाहीत ती जबाबदारी पोक्त ,संयमी,निष्ठावंत,मेहनती आणि निस्वार्थी लोकच पुढे नेऊ शकतात.

एखाद्याकडे पैसा बघून आणि त्याच्याकडून चिरीमिरी घेऊन जर त्याला पक्षाच्या प्रमुख पदावर बसवले ,तर तो दिलेले पैसे अनैतिक मार्गाने समाजातून जमा करतो आणि पक्षाचे नाव बदनाम करत असतो.पक्ष म्हणजे आपले दुकान समजून त्याची दुकानदारी सुरू होते. पण सामान्य कार्यकर्ता असे करत नाही त्याला समाजाची जाणीव असते तो नेहमी पक्षहीत आणि समाजाच्या भल्याचाच विचार करत असतो.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!