“चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर..
रमाई आणि बाबासाहेबांच्या पदस्पर्शान पुनीत झाले सोलापूर”
दत्ता गायकवाड
या शिर्षकाने सोलापूरचा बाबासाहेबांच्या सोलापूर जिल्ह्यातील कार्य कर्तृत्वाचा संशोधनात्त्मक ऐतिहासिक ग्रंथ आयु. दत्ता गायकवाड यांनी लिहला आहे. सर्व महाराष्ट्रभर या ग्रंथाचे वितरण झाले आहे. त्याची दुसरी आवृत्ती प्रसिध्द झालेली आहे. या ग्रंथामध्ये रमाईच सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ या गावी सत्यशोधक चळवळीचे एक अग्रगण्य नेते प्रभात या दैनिकाचे संपादक- वालचंद कोठारी यांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि वस्तीगृह सन- १९२२ साली उभी केलेली होती. वालचंद कोठारींचे व बाबासाहेबांचे मैत्री संबंध होते. रमाईंना डॉक्टरानी हवा पालटण्याचा बाबासाहेबांना सल्ला दिला होता, त्या प्रमाणे बाबासाहेबांनी रमाईना शेटफळ इथे विश्रांतीसाठी पाठवले होते. रमाईच वास्तव्य एक महिनाभर तिथे होते. शेटफळ पासून पंढरपूर अवघ्या विस कोसावर होते. रमाईंना विठ्ठालाची ओढ होती. रमाई विद्यार्थ्यांसमवेत रमल्या होत्या. या ग्रंथामध्ये अनेक घटना बाबासाहेबांनी सोलापूरातून सुरू केल्या. त्याचा उल्लेख महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या बावीस खंडामध्ये नाही.
तीनशे पन्नास पृष्ठांच्या या ग्रंथात बाबासाहेबांचे सहकारी, त्यांच वास्तव्य यांचा सचीत्र मागोवा दत्ता गायकवाड यांनी घेतला आहे. प्रकाशक सुविधा प्रकाशन, सोलापूर.
दत्ता गायकवाड ..सोलापूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत