शैक्षणिक प्रगती बरोबर मानवतावाद सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासणे महत्वाचे :- सुनील पुजारी.
धरित्री विद्यालयात उत्कृष्ठ पालक पुरस्कार संपन्न
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
शिक्षण हे मानवाच्या कल्याणासाठी आणि शैक्षणिक दृष्टया सक्षम करण्यासाठी किंवा जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्वाचे असते शैक्षणिक प्रगती बरोबर मानवतावाद सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे किंवा त्याचा वारसा जोपासने आवश्यक असते कारण या मधुनच विद्यार्थाना प्रेरणा व बळ मिळते
आसे परखड मत धरित्री विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनिल पुजारी यांनी केले .
नुकताच नळदुर्ग आलीयाबाद येथे ज्ञानदीप कलोपासक मंडळ नळदुर्ग संचलित धरित्री विद्यालय येथे पालक स्नेह मेळावा व उत्कृष्ट पालक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते
प्रथमता शाळेचे मुख्याध्यापक तथा महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनील पुजारी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक अण्णाप्पा सातलगावकर व पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .
दहावीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अण्णाप्पा सातलगावकर यांनी केले. प्रास्ताविक मध्ये त्यांनी शिक्षक पालक संघाची भूमिका व उत्कृष्ट पालक सन्माना मागील शाळेचा हेतू स्पष्ट केला. शाळेतील सर्व शिक्षकांनी थोडक्यात वर्गाचा आणि विषयाचा अहवाल सादर केला.
शाळेला सहकार्य करणारे व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या काही पालक प्रतिनिधींचा उत्कृष्ट पालक सन्मान सोहळा साजरा करण्यात आला . यामध्ये महादेव अंकुश पवार, दादासाहेब बनसोडे ,सुनील बलभीम पिस्के,सविता बुद्धवंत चव्हाण, सोमनाथ विजय म्हेत्रे,जयसिंग शिवप्पा गवळी, शंकर नातू राठोड,रेणुका मिलिंद भूमकर ,,सुनीता उत्तम वाघमारे, दामाजी सिताराम राठोड, विलास तुकाराम चव्हाण,तन्वीर अहमद हुसेन कुरेशी,अनिता गोविंद किल्लेदार,कलावती सुनील पवार या पालकांचा शाळेचे मुख्याध्यापक सुनील पुजारी यांच्या हस्ते शाल,उत्कृष्ट पालक सन्मानचिन्ह,स्मरणिका व नॅपकिन बुके देऊन सत्कार करण्यात आला यानंतर शाळे मध्ये इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य गणित व विज्ञान शिकवणारे सांची जयसिंग गवळी व सुरज संभाजी कांबळे या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक सुनील पुजारी यांच्या हस्ते शाल सन्मानचिन्ह, स्मरणिका व नॅपकिन बुके देऊन करण्यात आला. यानंतर शाळेतील शिक्षक रमेश चव्हाण यांना मिळालेल्या महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारा बद्दल त्यांचा शाल,स्मरणिका व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
यानंतर सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व पाल्यांनी शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले
मुर्टा येथील पालक जयसिंग गवळी
पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी उत्कृष्ट पालक सन्मान हा शाळेचा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचे सांगितले. शून्यातून जग निर्माण करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. विद्यार्थ्यां मधील सुप्त गुणवत्ता शोधणे हे शिक्षकाचे खरे कौशल्य आहे विद्यार्थाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी पालकानी ही पुढाकार घेतला पाहिजे कारण विद्यार्थांच्या गुणवत्तेवरच शिक्षकांची गुणवत्ता कळते या बरोबर शिवाय घरात जे संस्कार मुलांवर पडतात त्यात आईचा वाटा असतो म्हणून महिलांचा सन्मान झाला पाहिजे आजच्या काळाची गरज आहे असे मत पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी व्यक्त केले. शाळेने असा उपक्रम सतत घ्यावा त्यात आपले नक्कीच योगदान असेल
आलेल्या सर्व पालकांनी शाळेच्या कामकाजा बद्दल समाधान व्यक्त केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी कारंजे यांनी केले तर पालकांचे आभार शुभांगी कलवले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृद्ध शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परिश्रम घेतले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत