प.महाराष्ट्रभारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांना धमक्या देणाऱ्या भाजपा व मित्र पक्षांच्या नेत्यांचा सांगली काँग्रेस कडूनतिरडी मोर्चा आणि जोडे मारुन निषेध आंदोलन!

सांगली दि.१९:देशाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास बक्षीस जाहीर करणारे असंस्कृत, असंसदीय व धक्कादायक विधान करणारे शिंदे गटाचे प्रवक्ते संजय गायकवाड व राहूल गांधी यांची जीभ जाळा, भाजपा नेता तरविंदरसिंह मारवा यांनी राहुलची अवस्था इंदिरा गांधी सारखी करु, तर भाजपचे केंद्रीय मंत्री रवनित बिट्टू यांनी राहूल गांधी यांना दहशतवादी म्हटलं आहे. असे बेताल व प्रक्षोभक विधान करुन देशवासियांच्या व मागासवर्गीय बांधवांच्या भावना दुखावलेल्या दोघांवर त्यांची आमदारकी व खासदारकी रद्द करुन कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी घेऊन आज सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीकडून सांगलीत आंदोलन करुन भाजपा व शिंदे सरकारचा काँग्रेस भवनासमोर जाहीर निषेध केला असे पृथ्वीराज पाटील यांनी म्हणाले.

संसदेत संविधान हाती घेऊन भाषण करणारे व भारत जोडो यात्रेत सर्वांना भेटून संविधान रक्षणाची हाक देणारे राहूल गांधी यांनी देशात संपूर्ण समता नाही त्यामुळे संविधान बदलाचा विषयच नाही. संविधान बदलता येणार नाही. भाजपा संविधान बदलायचा प्रयत्न करत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे बीजेपी घाबरुन राहूल गांधी यांच्या बद्दल फेक नरेटिव्ह पसरवत आहे. या देशातील जनतेला आणि विशेष करुन मागासवर्गीय समाजाला भाजपा हाच पक्ष संविधान विरोधी आहे. काँग्रेस पक्षाने कायम पुरोगामी विचारांचे समर्थन केले आहे. आता जनताच अशा खोटा प्रचार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. असेही पृथ्वीराज पाटील म्हणाले.

देशासाठी बलिदान दिलेल्या गांधी परिवारातील वंशज खा. राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्या भाजपा नेते,केंद्रीय मंत्री व खासदार आणि राज्यातील शिंदे गटाचे प्रवक्ते संजय गायकवाड यांची अनुक्रमे खासदारकी, मंत्रीपदे व आमदारकी रद्द करून त्यांना अटक करावी व त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी घेऊन आज सांगली काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली व खासदार विशाल पाटील आणि शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान विरोधी मोदी व शिंदे सरकारचा जाहीर निषेध केला.
यावेळी ‘राहूल गांधी संविधान रक्षक – संजय गायकवाड, अनिल बोंडे समता भक्षक, देशात शंभर टक्के समतेचे स्वप्न पहाणार्‍या राहूल गांधींचा – विजय असो, संविधान विरोधी अजेंडा राबविणाऱ्या भाजपा व शिंदे सरकारचा – धिक्कार असो, चले जाव चले जाव – संविधान विरोधी मिंधे सरकार चले जाव, देशातील मागासवर्गीय समाजाला समता व आरक्षण नाकारणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, रद्द करा रद्द करा.. संजय गायकवाडची आमदारकी रद्द करा या व इतर घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी राहुल गांधी यांच्याबद्दल बदनामीकारक असंस्कृत, असंसदीय व हिंसक वक्तव्य केलेल्या संजय गायकवाड, अनिल बोंडे, रवनित बिट्टू व तरवीरसिंह मारवा यांच्या प्रतिमेला जोडे मारो व तिरडी मोर्चा आंदोलन करण्यात आले.

आंदोलनानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री रवनित बिट्टू, भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे, भाजपा नेता तरविरसिंह मारवा व शिंदे गटाचे प्रवक्ते संजय गायकवाड यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी शासनाला कळवावे असे निवेदन मा. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यावेळी आंदोलनात बिपीन कदम, सनी धोतरे, सच्चिदानंद कदम,अल्ताफ पेंढारी, प्रा. एन.डी.बिरनाळे, उत्तम सुर्यवंशी, अजय देशमुख,सुनिल मोहिते, प्रशांत देशमुख, अशोकसिंग रजपूत, अजित ढोले,डॉ. प्रताप भोसले, मनोज लांडगे, बाबगोंडा पाटील,मारुती देवकर, सिध्दार्थ माने, वसीम अमीन, नदीम अमीन,राजाराम यमगर,सागर शिंदे, सुनिल भिसे, दयानंद शिवशरण, कयस जमादार, आर. आर. पाटील, रेहान बागवान, मौला वंटमुरे, महावीर पाटील,अजिजभाई मेस्त्री,राजेंद्र कांबळे,अजय माने, संभाजी शेळके, वसिम रोहिले, प्रकाश माने, सुहेल बलबंड, कय्यूम मेस्त्री, आशिष चौधरी,रामसिंग परदेशी, पैगंबर शेख,रहीम हट्टीवाले, लालूभाई मेस्त्री, संदीप आडमुठे, संभाजी शेळके, अजय व वैभव माने, जन्नत नायकवडी, रावसाहेब पाटील, सचिन घेवारे, शितल सदलगे, मन्सूर व रज्जाक नाईक, ताजुद्दीन शेख, सावनकुमार दरुरे, श्रीनाथ देवकर, सिकंदर मुल्ला, मनोज पवार, अनिल मोहिते,सदाशिव खाडे, राजू पाटील, देशभूषण पाटील,अरुण गवंडी, विलास खेराडकर, प्रसाद पाटील,दिक्षितकुमार व भारती भगत,अशोक रासकर, नंदा कोलप,रामभाऊ पाटील,टिपू बारगीर,शमशाद नायकवडी, मारुती नवलाई, शहाबाज नायकवडी , श्रीधर बारटक्के,अख्तरभाई अत्तार, गजानन मिरजे, विक्रम कांबळे, प्रशांत अहिवळे,विशाल सरगर सविता बोंद्रे, सिद्राया गणाचार्य,आशा पाटील, क्रांती कदम, शिवाजी सावंत, अरुण पळसुले,प्रणव देशमुख,सुभाष भोसले, निखिल पाटील, धनाजी जाधव, विवेक अंकलीकर, प्रशांत अहिवळे,प्रकाश बरडोले, नाना घोरपडे कर्नाळ, शफीक तांबोळी, सीमा कुलकर्णी, मिना शिंदे, सुशांत जाधव पलूस गवळी, रविंद्र काळोखे, अनिल नांगरे, राजू कलाल,श्रीकांत पाटील, मयूरेश पेडणेकर,अख्तर मुजावर व काँग्रेस आणि संविधान प्रेमी सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!