महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

आमदार लोकांसाठी असतो, पक्षासाठी नाही.

शिवराम पाटील

बुद्धिमान, ज्ञानी उच्चशिक्षित, प्रामाणिक आमदार होणे ही खरोखरच लोकांची गरज आहे.कारण मुरलीधर परदेशी सांगतात,असे हजारो लोक सांगतात त्याप्रमाणे लोकांना सरकार दरबारी मदतीची खूप गरज आहे.लोकांनी दिलेला कर चोर आमदार चोरुन नेत आहेत.त्यामुळे विकास थांबलेला आहे.विकास काय, दैनंदिन जीवनातील सोयीसोविधा सुद्धा मिळत नाहीत.कोणी रस्ता बांधकामाचे पैसे चोरतो.कोणी पाणीपुरवठाचे पैसे चोरतो.कोणी गटार बांधकामांचे चोरतो.कोणी सफाई चे पैसे चोरतो.कोणी दवाखान्यातील औषधांचे पैसे चोरतो.ही चोरी कोणी ऐरागैरा नव्हे ,आमचेच आमदार चोरतात.म्हणजे आम्ही चोरांना आमदार निवडून देतो.ही आमची चूक आहे.आणि असे चोर राजकिय नेत्यांना हवे आहेत.मोदींना , फडणवीस यांना असेच चोर पाहिजे.ठाकरे , पवार,पटोले, राहुल गांधींना असेच चोर पाहिजे.हो!हे नेते जाणिवपूर्वक चोर शोधून उमेदवारी देत आहेत.
पण लोक येथे चुक करतात.जो कोणी आमदार चोरी करून खान पान पैसा देत असेल त्याला निवडून आणतात.असे करणारा आमदार चोर असतो.आतापर्यंत कोणत्याही आमदाराने स्वताचे घर दार विकून खान पान पैसा दिला नाही.उलट तोच शंभर पट श्रीमंत झाला.हे समजण्यासाठी शाळा कॉलेज मधे शिकण्याची गरजच नाही.तितकी बुद्धी तर उपजत असते.फक्त तिचा वापर होत नाही.तो वापर झाला पाहिजे.
माझे निरीक्षण आहे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव , जळगाव,जामनेर आणि पाचोरा तालुक्यातील लोक सरकारी नोकरांनाकडून जास्त लुटले जात आहेत.तेथील आमदार या कामी मदत करीत नाहीत.येथे आमदार बुद्धीमान, उच्चशिक्षित, ज्ञानी प्रामाणिक असावा. आमची सरकारी कामे केली पाहिजे .पण अनुभव उलटाच आहे.आमचाच आमदार सरकारी चोरांचा साथीदार बनला आहे.
म्हणून आम्ही लोकांना आवाहन करतो कि आता आमदार बदलणे खूप आवश्यक आहे.यासाठीच तर दर पांच वर्षांनी निवडणूक होते.ती यासाठीच.
यात आणखी एक समस्या आहे.नवीन उमेदवार सुद्धा तितकाच बुद्धीमान उच्चशिक्षित ज्ञानी प्रामाणिक पाहिजे.पण राजकीय पक्ष जाणिवपूर्वक चुकीचा उमेदवार देऊन लोकांना भ्रमित करीत आहेत.काही ठिकाणी तर चक्क चोरांना उमेदवारी देत आहेत.काही ठिकाणी तर अवैध धंदे करणाऱ्यांना उमेदवारी देत आहेत.काही ठिकाणी तर ताटाखालचे मांजराला उमेदवारी देत आहेत.कारण राजकीय पक्षांचा हेतू आहे, आमदार कितीही नालायक असो किंवा निष्क्रिय असो पण आपल्याला सरकार बनविण्यासाठी कामाला आला पाहिजे. आपले सरकार बनवून तिजोरी लुटता आली पाहिजे.आपल्या जिल्ह्यातील आमदारांनी चोरलेली संपत्ती तुम्ही मोजू शकता पण त्यांच्या नेत्यांची संपत्ती अमाप आहे.भुई काट्यावर सुद्धा मोजली पाहिजे.कोठून आणली इतकी संपत्ती?हा चोरीचा माल आहे.कष्टाचा नाही.
एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील,दादा भुसे यांना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी चार पाच वेळा उमेदवारी दिली.तेंव्हा हे गद्दार नव्हते का?तर मग ठाकरेंना सोडून गेले तेंव्हाच कसे गद्दार वाटले?जोपर्यंत हे आमदार ठाकरेंच्या कामाचे होते तो पर्यंत सज्जन होते का?जर होते तर मग अचानक गद्दार कसे काय झाले? अचानक बदल झाला असेल का?पण नाही.हे आज जसे आहोत तसे कालही होते.पण कालपर्यंत ठाकरेंच्या फायद्याचे होते.आता नुकसानीचे बनले आहेत.मला नाही वाटत कि,याला राजकारण म्हणावे.
जळगावचे आमदार दारू विकतात.कोणतेही सरकारी कामात मदत करीत नाहीत.त्या बदल्यात साडी, चोळी,भांडीकुंडी ,देणगी देतात.यासाठी आमदार निवडून देतो का?हे मोदींना, फडणवीस यांना माहिती आहे.तरीही नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस त्यांनाच उमेदवारी देतात.का?हा माणूस पैसा कमवून देतो शिवाय आपल्या पक्षाला सरकार बनविण्यासाठी समर्थन देतो.म्हणजेच हे राजकीय नेते त्यांच्या मतलबाचा आमदार निवडून आणतात.लोकांच्या फायद्याचा नाही.
जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन शेतकऱ्यांना कुठेही मदत करीत नाहीत.लोकांना ते आता नकोत.तर मग नवीन उमेदवार बुद्धिमान , उच्चशिक्षित ज्ञानी प्रामाणिक दिला पाहिजे.आपला उमेदवार त्यांच्या पेक्षा कसा चांगला,हे सांगता आले पाहिजे.लोकांना पटले पाहिजे .आम्हाला सरकार दरबारी मदत करणारा आमदार पाहिजे आणि पवारांना फक्त हात वर करणारा होयबा आमदार पाहिजे.यात पवारांचा हेतू चांगला नाही.लोकांनी राष्ट्रवादी चा उमेदवार देताना त्यांचा हेतू आणि मतदारांचा हेतू लक्षात घेऊनच मतदान केले पाहिजे.कोण आपल्या कामाचा?त्यालाच मतदान केले तर तो तुम्हाला सरकार दरबारी मदत करू शकतो.त्याची पारख त्याच्या कामाच्या अनुभवातून केली पाहिजे.त्याची जात,त्याचा धर्म,त्याचा पक्ष ,त्याची संपत्ती पाहून चांगला म्हणणे चुकीचे ठरणार आहे.आतापर्यंत चुकीचे ठरलेले आहे.पुन्हा तशी चूक मतदारांनी करू नये.

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!