श्राद्ध पक्ष: एक अंधश्रद्धा
धर्माच्या धंद्याचे सर्वात हास्यास्पद आणि विकृत रूप असेल तर तो आहे पितृपक्ष…
श्राद्ध आणि त्यातील विधी. माणसे जिवंत असताना त्यांना छळतील आणि मेल्यावर त्यांच्या नावाने गळे काढत श्राद्ध करुन गोडघोडही खातील. अशी भयंकर मूर्ख आणि विरोधाभासी गोष्ट आपल्या धर्मातच सापडते
पुनर्जन्म आहे असे मानले तर घरातील वडीलधारी मंडळी मृत्यूनंतर पुढच्या जन्मात कुठेतरी जन्माला आली असतीलच ना? मग त्याच वेळेस त्यांचे आत्मे अवकाशात लटकून खीर-पुरीसाठी कसे काय तळमळत असतात? जर पुढचा जन्म हा चौऱ्याशी लक्ष फेऱ्यातून होणारा असेल तर सगळ्यांचे पितर नेमके कावळेच कसे काय होतात? पुनर्जन्म झाला तर ते अंतराळात कसे काय लटकू शकतील? हा साधा कॉमनसेन्सचा प्रश्न कुठल्याही शाळेत शिकत असणाऱ्या मुलालाही पडतो तर मग शिक्षित आणि उच्चशिक्षित लोकांना तो का पडू नये?
धर्ममार्तंडांच्या हातातले ते एवढे मठ्ठ बाहुले कसे काय होतात? अंतराळात लटकणे खरे असेल तर पुनर्जन्म चुकीचा ठरतो. आता गंमत म्हणजे या दोन गोष्टीत एकच सत्य असू शकतं, हे सांगायलाही कुण्या विचारवंतांची गरज नाही
आपल्या लबाड पुरोहित पंडितांना दोन्ही हातात लाडू हवे असतात. त्यामुळे मरण्याआधी पुढच्या जन्म सुखाचा जाण्यासाठी ते विधी करायला लावतील आणि मृत्यूनंतरही पितरांचा धाक दाखवून त्यांच्या मुलांच्या सुखासाठी कर्मकांड करायला लावून त्यांच्याकडूनही आपल्या पोटोबासाठी खीर-पुरीची व्यवस्था करत राहील. असे केल्याने सुख-समृद्धी येईल असा दावा केला जातो, परंतु इतिहास साक्षी आहे की, हजारो वर्षे हे सर्व करूनही ही धार्मिक माणसे गरीबच राहिली आहेत. आणि जे मुळातच श्रीमंत आहे ते पितरांच्या नावाखाली फक्त आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी श्राद्ध पक्ष करत असतात. म्हणूनच श्राद्धाचे सोंग प्रत्येक घराघरात अत्यंत गांभीर्याने केले जाते… तेही सु(?)शिक्षित कुटुंबात! खरंच किती लाजीरवाणा प्रकार आहे हा!! थोडक्यात काय तर हिंदू धार्मिक हे प्रचंड दांभिक असतात हेच खरे
कावळा!मेलेले मासे, उंदीर, बेडूक, सडलेले मांस खातो. तो मांसाहारी जास्त अन् शाकाहारी कमी हे सत्य लोकांना रोज माहीत असूनही कावळ्याला शाकाहारी समजून, त्यात पूर्वजांचे आत्मे आल्याची अफवा पक्की करून पितृपक्ष खेळ मांडला जातो. शिवाय कावळा कधीच वड पिंपळाची फळे खात नाही. ती खातात वटवाघळे, मैना, चिमण्या.. कावळे अपरिहार्य कारणामुळे चुकून ही फळे खातील. अन् वड पिंपळ यातून जास्त ऑक्सिजन बाहेर पडतो याला कोणता ही शास्त्रीय आधार नाही. त्यापेक्षा कडुनिंब बरा..
🦅7219017700🦅
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत