रस्त्यावरची पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी….
सुखदा प्रधान
टि. चंद्रशेखर ठाणे महापालिका आयुक्त असताना त्यांनी तलावपाली, स्टेशन वरच्या फेरीवाल्यांना हटवणे, अनधिकृत बांधकामे पाडणे वगैरे करत ठाणे सुंदर बनवायचा प्रयत्न सुरू केला होता. त्या काळात मी आज दिनांक ची ठाणे प्रतिनिधी म्हणून फोटोग्राफी चं काम बघत होते. त्या अनुषंगाने रोजच त्यांची भेट व्हायची.
एकदा त्यांच्या दालनात बसुन गप्पा मारत असताना मी तळ्यावर च्या पाणीपुरी वाल्यांना हाकलल्या बद्दल नाराजी व्यक्त केली. सोपान बोंगाणे , अशोक नेर्लेकर वगैरे जेष्ठ पत्रकार पण होते. चंद्रशेखर यांनी हसत हसत सांगितल की उद्या संध्याकाळी माझ्या घरी ये आणी तुझी फेवरेट पाणीपुरी कुठे मिळते, तिकडे माझ्या पत्नी ला पण घेऊन जा. पण माझ्या साठी एक स्टोरी कर.
सकाळी ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मधे जा आणी त्यांच्या OPD मधल्या त्वचा रोगाच्या पेशंट ना भेट, त्यांच्या समस्या जाणून फोटो काढ, लिहा त्यावर मग संध्याकाळी पाणीपुरी ची पार्टी माझ्या कडुन!
दुसऱ्या दिवशी मी आणी आमचा वार्ताहर अरुण मुरकर तिथे गेलो. मुख्य चिकित्सा अधिकार्यांना भेटलो आणी त्यांच्या च बरोबर opd मधे आलो. त्या तीन तासात मी जे काही बघीतलं ते आयुष्य भर विसरणार नाही. 99% हाताचे त्वचा रोगी हे पाणीपुरी वाले होते. जे केमिकल पाण्याची चव वाढवण्यासाठी टाकतात त्यामुळे त्यांची त्वचा जळते आणी गळायला लागते. हातात किडे पडतात. पण पापी पेट का सवाल म्हणत ते काम करत रहातात. त्यांच्या हातानी ते इंफेक्शन पाण्यात जातं. त्या वेळी त्या रोग्यां कडून मी जे काही ऐकलं , त्यांच्या हातांची जी अवस्था बघीतली , त्या नंतर माझी रस्त्यावर पाणीपुरी खाण्याची हिम्मत झाली नाही.
🎂सेम कंडीशन रस्त्यावर च्या लिंबू सरबत, गोळा वगैरे वाल्यांची होती पाणी कुठलंही वापरायचं कारण स्विटनर नी चव बदलते. गोडवा आणायला हॉस्पिटल मधुन expire झालेले सलाईन वापरायचे. ते स्वस्त पडतात म्हणून! आता कायदे कडक झाल्यावर हे कमी झालं असेल पण बंद होणं शक्य नाही. माझी मोठी नणंद सरकारी डॉक्टर आहे . तीनी सांगितलं होतं की पुर्वी युपी मधल्या सरकारी हॉस्पिटल मधे mortuary मधे AC तेवढे चांगले नसायचे. तेव्हा प्रेते ठेवायला बर्फाच्या लाद्या वापरल्या जायच्या. दर रोज रात्री काही लोक त्या वापरलेल्या लाद्या घेऊन जायला ठेले / हातगाड्या घेऊन यायचे, आणी नंतर नेउन विकायचे. तो बर्फ हे गोळा वाले, लिंबू सरबत वाले विकत घेऊन जायचे.
हे वाचल्यावर तरी तुमचे डोळे उघडतील… कदाचित.
– सुखदा प्रधान
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत