राष्ट्र निर्मिती की राष्ट्रघात?-भदन्त विमलकित्ती गुणसिरी
“२६ जानेवारी १९५० ला भारत एक स्वतंत्र देश होईल.(हर्षोल्लास) पण त्याच्या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेविल की पुन्हा गमावून बसेल? … इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय? याच विचाराने मी चिंताग्रस्त झालो आहे. जातींच्या आणि संप्रदायांच्या स्वरूपातील आपल्या जुन्या शत्रूंसोबतच भिन्न आणि परस्पर विरोधी विचारधारा असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांचीही भर पडणार आहे. भारतीय लोक आपल्या विचारधारेपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा विचारधारेला मोठे मानतील? मला माहित नाही. परंतु एवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वतःच्या विचारधारेला देशापेक्षा मोठे मानले, तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे गमाविले जाईल. या संभाव्यतेविरूद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी झटण्याचा आपण निर्धार केला पाहिजे.”
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा हा इशारा आज अक्षरशः खरा ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. आज देशापेक्षा आपल्या विचारधारेलाच मोठे मानून संविधानाची सर्व मूल्ये पायदळी तुडविण्याची भूमिका घेणारे पक्ष अस्तित्वात आलेले आहेत. ते राष्ट्र घडविण्याचे नव्हे, तर राष्ट्र बुडविण्याचे काम करीत आहेत, हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे. त्यांचे कार्य जनकल्याणाचे नव्हे, तर सर्वनाशाचे कार्य आहे. म्हणून प्रत्येक भारतीयाने संविधान प्रणीत मानवतावादाची कास धरून देशाचे रक्षण करण्यास सिद्ध झालेच पाहिजे. त्यासाठी खऱ्या भारतभूमीपुत्राच्या शिकवणीची म्हणजेच बुद्धाच्या शिकवणीची कास धरली पाहिजे. हा बाबासाहेबांचा संकल्प होता. त्यात गैर काय आहे?
बुद्ध आणि त्यांचा धम्म मूळ भारतीयच आहे ना? त्याची शिकवण शतप्रतिशत माणुसकीचीच आहे ना? याची देहा याची डोळा सर्व सुखाच्या प्राप्तीची शिकवण बुद्धच देतो ना? बुद्धामुळेच भारत जगात महान मानला जात आहे ना? विनाशापासून वाचविण्यासाठी युद्ध नको, बुद्ध हवा असे सर्व जग म्हणत आहे ना? बुद्ध हीच भारताची शान आहे, मान आहे, अस्मिता आहे ना? त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असायला हवा ना? मग या सत्त्याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर दुसरे वेगळे काय सांगत आहेत? भारत बौद्धमय होणे हेच सर्वकालीन सत्त्य आहे, हे भारतीयांना पटवून देणे हेच कर्तव्य बजावण्यास ते सांगत आहेत. ते राष्ट्रीय कार्य आहे, हेच या इशारातून स्पष्ट होते. हिंदू राष्ट्र म्हणून केवळ ब्राह्मणी विचारधारेला प्रोत्साहन देणे हा भारतीय जनतेचा सारासार विश्वासघात आहे. हे लक्षात घेऊन त्याचा आम जनतेने प्रतिकार केला पाहिजे. या सत्त्याचे आणि माणुसकीचे जनजागरण करणे हे बोधिसत्त्व चळवळीचे सारसर्वस्व आहे.
(पूज्य भदन्त विमलकित्ती गुणसिरी लिखित “प्रबुद्ध भारताचे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत