देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास मिटवायला निघालेली कॉंग्रेस…!!

भास्कर भोजने.

आंबेडकरी समुदायातील ज्यांना, ज्यांना वाटतेय की, कॉंग्रेस हा सेक्युलर विचारांचा राजकीय पक्ष आहे. ते प्रस्थापित मनुवादी कॉंग्रेस पक्षाच्या खोट्या प्रचाराचे बळी आहेत…!!
ज्यांना, ज्यांना मतांसाठी भाजप पेक्षा कॉंग्रेस बरी वाटतेय म्हणजे दगडापेक्षा विट मऊ वाटतेय, त्यांनी गांभीर्याने विचार करावा…!!
कॉंग्रेस हा पक्ष मुठभर ऊच्च वर्णियांचा पक्ष आहे मात्र सत्तेसाठी दलित,मुस्लीम,आदिवाशी अल्पसंख्याक समुदायाची मते मिळविण्यासाठी कॉंग्रेसने सेक्युलर असल्याचे ढोग रचलेले आहे. असे केवळ बोलून सिद्ध होणार नाही तर कॉंग्रेस पक्षाने विश्व रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासुन तर रिपब्लिकन पक्ष, भैय्यासाहेब आंबेडकर आणि आता प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंत आपला टोकाचा विरोध कायम ठेवला आहे…!!
म्हणून मी माझ्या मताच्या पुष्टि साठी १९२८ पासुनचे कॉंग्रेस पक्षाचे ऐतिहासिक दाखले देऊन माझे मत मांडतं आहे…. ! !

  • १९२८ साली कॉंग्रेस पक्षाने हिंदी स्वराज्याच्या राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यासाठी पहिली परिषद फेब्रुवारी १९२८ व दुसरी परिषद मे १९२८ मध्ये पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घेतली होती, त्या परिषदेचे निमंत्रण मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, शिख, अग्लो इंडियन, ब्रम्हणेत्तर तथा द्रविडी संस्थांच्या प्रमुखांना दिले होते मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दिले नव्हते…!!
    म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यावेळी विरोध केला होता…!!
  • १९३१ सालच्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत कॉंग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणून म. गांधी हजर होते. त्यावेळी म. गांधी यांनी मुसलमान, शिख, पारशी आणि अग्लो इंडियन यांच्या राखीव जागा आणि स्वतंत्र मतदार संघाला पाठिंबा दिला मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मागितलेल्या अस्पृश्य वर्गाच्या राखीव जागा आणि स्वतंत्र मतदार संघाला कडाडून विरोध केला…!!
    गांधीजी केवळ विरोध करुन थांबले नाहीत तर आंबेडकर हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नसुन मीच अस्पृश्यांचा खरा प्रतिनिधी आहे असा दावा ब्रिटिशांच्या समोर मांडला, त्यावेळी अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष एन. सी. राजा यांनी अस्पृश्यांची परिषद बोलावून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नांवे ठराव मंजूर करून असंख्य तारा ब्रिटिश सरकारकडे लंडनला पाठविल्या आणि आमचे खरे प्रतिनिधी डॉ आंबेडकर आहेत असे पटवून दिले…!!
  • दुसरी गोलमेज परिषद आटोपून म. गांधी २८ डिसेंबर १९३१ ला सकाळी मुंबई बंदरात उतरले तेव्हा आठ हजार अस्पृश्य बांधवांनी म. गांधी यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवला आणि धिक्काराच्या घोषणा दिल्या त्यावेळी मुंबई बंदरात मोठा राडा झाला होता…!!
  • ब्रिटिश सरकारने १४अॉगस्ट १९३२ ला जातिय निवाडा जाहीर केला, त्या जातिय निवाड्यानुसार मुस्लिम, शिख, ख्रिस्ती, अग्लो इंडियन, तथा अस्पृश्यांना राखीव जागा आणि स्वतंत्र मतदार संघ मिळाले परंतु म. गांधी यांनी अस्पृश्यांच्या राखीव जागा आणि स्वतंत्र मतदार संघाला विरोध करीत पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केले आणि अस्पृश्यांचे संयुक्त मतदार संघ हिसकावून घेतले.
    गांधीजींचे प्राण वाचविण्यासाठी जो करार केला गेला त्याला इतिहासात पुणे करार म्हणून ओळखले जाते तो पुणे करार २६ सप्टेंबर १९३२ रोजी ब्रिटिश विधिमंडळाने मंजूर केला होता…!!
    जसा कॉंग्रेसच्या पंडित मोतीलाल नेहरू यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला तसाच टोकाचा विरोध म. गांधी यांनी सुद्धा केला…!!
  • कॉंग्रेसचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा हिंदू कोड बिल आणि ओबीसी आरक्षण च्या ३४० व्या कलमाच्या अंमलबजावणी ला विरोध केला म्हणून १९५१ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता…!!
  • संविधान सभेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर निवडून जाऊ नये म्हणून कॉंग्रेस पक्षाने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मुंबई मध्ये पराभूत केले तेव्हा कॉंग्रेस पक्षाचे सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते की, डॉ आंबेडकर यांना संविधान सभेत रोखण्यासाठी आम्ही दारेच नाही तर खिडकीची तावदाने सुद्धा बंद केली आहेत…!!
    किती टोकाचा हा विरोध.?
  • १९५६ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्विकार केला आणि कॉंग्रेस पक्षाच्या नेहरुंनी लगेच घटना दुरुस्ती करून जाती आधारित आरक्षण केवळ हिंदू आणि शिख धर्मापुरतेच मर्यादित करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा टोकाचा विरोध केला…!!
    पंडित मोतीलाल नेहरू,आणि म. गांधी प्रमाणेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा टोकाच विरोध केला…!!
  • जिवंतपणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा टोकाचा विरोध करणा-या कॉंग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणा नंतरही आपला विरोध कायम ठेवल्याचे दिसते…!!
  • डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला देशातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारा नदी जोड प्रकल्प कॉंग्रेस पक्षाने ५०वर्षे सत्ता ऊपभोगली परंतु आंबेडकर विरोधापोटी तो प्रकल्प अद्यापही कार्यान्वित केला नाही…!!
  • डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे देहावसान दिल्लीत झाले सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाने मनावर घेतले असते तर त्यांचा अंतिम संस्कार दिल्लीत करुन त्यांचे भव्य स्मारक राजधानीत चैत्यभूमी म्हणून निर्माण करता आले असते परंतु नेहरुंनी तसे केले नाही, मुंबई मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतिम संस्कारासाठी कॉंग्रेस पक्षाची मुंबई महापालिकेत सत्ता असुनही शिवाजी पार्क येथील जागा नाकारण्यात आली म्हणून खाजगी जागा मिळवावी लागली यावरून कॉंग्रेस पक्षाचा द्वेष आणि विरोध स्पष्ट होतो…!!
  • कॉंग्रेस पक्षाच्या पंडित जवाहरलाल नेहरु, लालबहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, गुलजारीलाल नंदा, नरसिंहराव या पंतप्रधानांनी त्यांच्या अखत्यारीत असुनही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न किताब दिला नाही आणि संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा लावला नाही…!!
    मात्र कॉंग्रेस पक्षाने सचिन तेंडुलकर या खेळाडू ला राज्यघटनेत दुरुस्ती करून भारतरत्न किताब दिला…!!
  • डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर त्यांचे सुपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी बौद्धांना केंद्रात सवलती असाव्यात म्हणून सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाकडे अनेकदा मागणी करुन, आंदोलन करुनही कॉंग्रेस पक्षाने ती मागणी मंजूर केली नाही, आंबेडकरांचा टोकाचा विरोधच केला…!!
  • डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष खिळखिळा करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशातील रिपब्लिकन पक्षाचे पुढारी बी. पी. मौर्य यांना फितूर केले,महाराष्ट्रात सुद्धा भंडारे, तिरपुडे आणि त्यांचे सहकारी फितूर केले तर दुस-या बाजूने उत्तरेतील जगजीवनराम सारखे अस्पृश्य पुढारी हाताशी धरून आपला आंबेडकर विरोध कायम ठेवल्याचे दिसते…!!
  • १९९२ साली भारिपच्या तिकीटावर निवडून आलेला भिमराव केराम, २००० साली भारिप बहूजन महासंघाच्या तिकिटावर निवडून आलेले मखराम पवार, डॉ डि. एम. भांडे, रामदास बोडखे यांना कॉंग्रेस पक्षाने फोडून प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचा टोकाचा विरोधच केला आहे….!!
  • अकोला लोकसभा मतदारसंघातून आंबेडकर निवडून येऊ नये म्हणून महाराष्ट्रातील केवळ अकोला मतदार संघात दोन वेळा मुस्लिम उमेदवार देऊन मत विभागणी करुन कॉंग्रेस पक्षाने आंबेडकरांचा टोकाचा विरोध केला आहे…!!
    १९२८सालच्या हिंदी स्वराज्याच्या राज्यघटनेचा आराखडा तयार करण्याचे निमंत्रण देण्यापासून २०२३ च्या INDIA आघाडी मधील निमंत्रित करण्यापर्यंत कायमस्वरूपी कॉंग्रेस पक्षाने डॉ बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे सुपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर,आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा टोकाचा विरोध केला आहे…!!
    * २०२४ मध्ये कॉंग्रेस पक्षाचे सॅम पित्रोदा आणि सुधींद्र कुळकर्णी या दोघांनी सोशल मीडियावर ट्वीट करुन आणि प्रिंट माध्यमात लेख लिहून अशी मांडणी करायला सुरुवात केली आहे की, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रेय देणे चुकीचे आहे वास्तविक भारतीय राज्य घटनेमध्ये जवाहरलाल नेहरू यांचे योगदान खूप मोठे आहे.त्या लेखामध्ये सुधींद्र कुळकर्णी असा दाखला देतोय की, १९२८ सालच्या नेहरू रिपोर्ट वरुनच डॉ आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहले आहे. परंतु १९२८चा नेहरू आराखड्याचा मसुदा आणि भारतीय संविधानाचा मसुदा यामध्ये कमालीचा बदल आहे हे सुधींद्र कुळकर्णी यांनी जाणिवपूर्वक टाळले आहे.याचा अर्थ असा की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नांव मिटवून त्यांच्या जागेवर जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचा उल्लेख झाला पाहिजे ही अतिशय चिड आणणारी विकृत थिअरी कॉंग्रेस पक्षाचे सॅम पित्रोदा आणि सुधींद्र कुळकर्णी करीत आहेत.म्हणजेच कॉंग्रेस पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास मिटविण्याचा प्रयत्न करीत आहे….!!
    वैचारिक विरोध करणे आणि द्वेष करणे यामध्ये कमालीचे अंतर आहे. कॉंग्रेस पक्षाचे चरित्र ग्वाही देत आहे की, ते आंबेडकर या नावाचा द्वेष करतात.द्वेष करणे ही विकृती आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास मिटवायला निघालेल्या विकृत मनोवृत्तीच्या कॉंग्रेस पक्षाचे चरित्र लक्षात घेऊन आंबेडकरी जनतेने सावध व्हावे हीच अपेक्षा आहे….!!

या सर्व गोष्टींचा अदमास घेऊन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कॉंग्रेस पक्षाला ” जळतं घर ” म्हटलं होतं त्याची प्रचिती आजही येतं आहे…!!
जयभीम.
@.. भास्कर भोजने.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!