तथागतांचा प्रभावशाली व कल्याणकारी बौद्ध धम्म आचरणात आणल्यास यश निश्चित :- कदम
वर्षावास कार्यक्रमात गुणवंताचा
गुणगौरव सोहळा संपन्न
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
तथागतांचा धम्म हा जगातला एकमेव धम्म आहे तो कल्याणाचा मार्ग सांगतोडॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि तो धम्म आचरणात आणला ज्या बाबासाहेबांनी आपल्याला विशाल सागरा सारखा कल्याणकारी धम्म दिला त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार आचरणात आणल्यास प्रत्येक मानवाची युवक व युवतीची यशस्वी वाटचाल होण्यास वेळ लागणार नाही शिवाय आपल्या गावातील बौद्ध विहार हे संस्काराचे प्रमुख साधन आहे या विहारात कल्याणचा मार्ग सांगितला जातो संस्काराचे धडे दिले जातात कारण जीवनाच्या आयुष्यात येत असताना संस्कारक्षम पिढी घडवणे प्रत्येक मानव संस्कार शील असणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी किमान दर रविवारी विहारात जाऊन तथागत गौतम बुद्धांची प्रदीप्त मूर्ती आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाना वंदन करावं आणि संस्कार क्षम जीवन जगण्यासाठी आपण ही जगाव आणि इतरांना ही सांगावं असे परखड मत भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव [ दक्षिण ] विभागाच्या जिल्हाध्यक्षा राजश्रीताई कदम यांनी केले .
नुकताच श्रावस्ती बुद्धविहार ढोकी येथे दिनाक १० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी वर्षा वास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी त्या कार्यक्रमाच्या प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होत्या .
ढोकी गावात यशस्वी विद्यार्थ्यांचा वर्षा वास व धम्म प्रवचनाच्या कार्यक्रमात गुणगौरव व कौतुक करण्यात आले . यावेळी प्रा.डॉ.दिनकर झेंडे भारतीय बौध्द महासभा उस्मानाबाद, तसेच महिला विभागाच्या उपाध्यक्ष शीला ताई चंदनशिवे, जिल्हा संस्कार उपाध्यक्ष विजय अशोक बनसोडे, तालुका सरचिटणीस उमाजी गायकवाड, सोनार गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रथमता महामानव व आपल्या आदर्शांच्या प्रतिमा चे पूजन करून सामूहिक त्रिसरण पंचशील घेतल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नुकतेच सी आर पी एफ मध्ये रुजू झालेले आयु.नितीन जाधव यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा डॉ.दिनकर झेंडे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन साळुंखे यांनी केले, तर शेवटी आभार आप्पासाहेब कांबळे यांनी मानले. यावेळी गावातील बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत