अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोकाला दोष देवून बौद्ध धर्म विलुप्त होण्याचे चौथे कारण सांगतात. ते म्हणतात -
भारतातून बौद्ध धर्म लोप झाला त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो
प्रश्न असा निर्माण होतो की, जो धर्म इतका श्रेष्ठ होता व त्याचा प्रसार इतका झाला होता त्याचा भारतातून लोप कसा झाला ?
या प्रश्नाची उत्तरे अनेक असली तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो. अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता यामुळे मी त्याला दोष देत आहे. सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत बौद्ध धर्माशिवाय अशा अनेक धर्मांना प्रचाराची मुभा देऊन ठेवली होती की , जे बौद्ध धर्माचे कट्टर दुश्मन होते. यामुळे बौद्ध धर्माच्या विरुद्ध असणाऱ्या धर्मांना आपली शक्ती वाढविण्याची पुरेपूर संधी प्राप्त झाली व हाच बौद्ध धर्माला पहिला आघात होय असे मला वाटते
संदर्भ – खंड. 18 भाग – 3.पृष्ठ. क्र. 208 – 209 पैरा – 3 व 2.
आता ब्रह्मा, विष्णू , महेश या तिन्ही देवांची निर्मिती ( जन्म नव्हे ) कशी झाली ते पहा.....
श्री नावाने ओळखण्यात गेलेल्या " श्री " देवीने स्वर्ग जग निर्माण केले. या देवीनेच " ब्रह्मा विष्णू , महेश "यांची निर्मिती केली. देवी भागवतात असे सांगितले आहे की , देवीने आपले तळवे (हाताचे ) एकमेकावर घासले. एक फोड उठला. या फोडातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. ब्रह्मदेव जन्माला येतात. देवीने लग्न करण्याबद्दल इच्छा प्रदर्शित केली. ब्रह्मदेवानं नकार दिला. कारण त्याच्यामध्ये देवी ही त्याची आई देवी रागावली. तीन क्रोधाग्नीन ( हाच क्रोधाग्निन शब्द - " भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म " या ग्रंथात आहे ) ब्रम्हाला जाळून खाक केले. भस्म भस्म केले. पुन्हा देवीने तळवे घासले पुन्हा फोड आला. आता त्यातून " विष्णू " निर्माण झाला. देवीने विष्णूला ही विवाह बद्दल विचारले. विष्णूने ही आईशी विवाह करण्यास नकार दिला. देवीने या मुलालाही जाळून भस्म केले. पुन्हा तिसऱ्या वेळी देवीने तळवे घासले तिसरा फोड आला. त्यातून तिसरा मुलगा निर्माण झाला तो म्हणजे " शिव ". देवीने शिवाला विवाह बद्दल विचारले. शिव म्हणाला , " मी लग्न करीन पण तू दुसरा देह धारण केला तरच ! देवीने संमती दिली. " ही रक्षा तुझ्या दोन भावांची आहे. मी त्यांना जाळून भस्म केले. कारण त्यांनी माझ्याशी विवाह करण्यास नकार दिला.
शिव म्हणाला , ' मग मी एकटाच लग्न कसा करू ? तू आणखीन दोन स्त्रिया निर्माण कर मग आम्ही तिघे लग्न करू.
देवीने आणखीन दोन स्त्रिया निर्माण केल्या. मग तीनही देवांची लग्न झाली.
संदर्भ – हिंदुत्वातील कुटप्रश्न. अनुवाद – डॉ. न. म. जोशी. पृष्ठ. क्र. 83 – 84.हा पुरावा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ” देवी भागवत ” मधून घेतलेला आहे…
मग प्रा. नाखले सर ब्रह्मा विष्णू , महेश हे बौद्ध भिक्खू होय , बोधिसत्व होय. कोणत्या आधारावर ते म्हणतात.?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धर्मशास्त्रवेत्ता होते. त्यांनी त्यांच्या ह्यातीत अनेक धर्माची पुस्तके पानोनिपान चाळून हा लाभ मला विविध धर्माचा तुलनात्मक अभ्यास केल्याने झाला असे जर म्हणत असतील तर त्यांना बुध्दाची शिकवण आणि रामायण महाभारतातील शिकवण यामध्ये बरीच तफावत आढळून आली. त्याबद्दल ते काय म्हणतात पहा -
लहानपणी माझ्या अभिनंदना प्रित्यर्थ जी पहिली सभा घेण्यात आली तिचे अध्यक्ष श्री. दादा केळुसकर होते. त्यावेळेला मी सभेत काय वेडेवाकडे बोल बोललो ते मला आता आठवतही नाही. भाषण संपल्यानंतर केळुस्कारांनी गौतम बुद्धाचे छोटेसे चरित्र मला बक्षीस म्हणून दिले. रामायण महाभारतासारखे बरेच ग्रंथ मी वाचून काढले होते. तसेच हेही पुस्तक मी वाचले. " परंतु बुद्धाची शिकवण व इतर धर्माची शिकवण यात बरीच तफावत आहे असे मला आढळून आले." पुढे या पुस्तकासारखी नवीन नवीन पुस्तके जसजशी मी वाचू लागलो तसं तसा माझ्या डोक्यात नवा प्रकाश पडू लागला. बुद्ध धर्म कशा व हिंदू धर्म कसा दोहोत किती भेद आहे, किती निराळी दृष्टी आहे हे मला कळू लागले
संदर्भ – खंड. 18 भाग – 3 पृष्ठ. क्र. 426.खालचा पैरा. सविस्तर माहितीसाठी पृष्ठ. क्र. 431 ते 434 एकाग्रतेने अध्ययन करावे. शेवटी निष्कर्ष अंति बुद्ध धर्मच कसा जगाला तारणारा आहे. बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी लिहिताना आणि सांगताना ते म्हणतात –
समता प्रेम बंधुभाव या सर्व गोष्टी जगाच्या उद्धाराकरता आवश्यक असतील तर त्या बुद्ध धर्मात सापडतील. मी आज वीस वर्षे प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आहे. सर्वधर्माचा अभ्यास केल्यावर जगाला बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे , असे माझे मत आहे
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्र. 229.
पुढे ते म्हणतात –
विचार करा ! हा देश एका काळी सुसंस्कृत झाला होता म्हणून सांगतात………….. या हिंदू धर्मात 5 कोटी अस्पृश्य आणि 5 – 10 कोटी लोक चोऱ्यामाऱ्या करणारे कां आहेत ? कारण या धर्मात दोष आहे
नवीन कार्य पाडून बघा , त्याचा अभ्यास करा , त्यात सामील व्हा
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्र. 229.पैरा – 2 , 3 आणि 4. सविस्तर वाचा.
हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर.
दि. 10 सप्टेंबर 24.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत