भगवान आणि बोधिसत्व
मानिक वानखेडे,
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जेंव्हा जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की, ख्रिश्चन धर्मांचे आणि मुस्लिम धर्माचे जसे एक एक ग्रंथ आहेत, जे वाचन करण्यास सोपे आणि सहजतेने उपलब्ध होणारे आहेत. परंतु बुद्धाच्या धम्मावर असा एकच ग्रंथ नाही. त्यांच्या धम्मावर एक दोन नाही तर तब्बल ७३ ग्रंथ ब्राम्हण बौद्ध भिक्षूने जेवढी जास्तीत जास्त भेसळ करता येईल तेवढी भेसळ करून कपोलकल्पित रचलेली आहेत. उदाहरणार्थ – अभिधम्मपिटक निव्वळ कचऱ्याचे पेटारे आहे. ख्रिश्चन धर्माचे बायबल त्यांना आदर्श वाटला होता. म्हणूनच त्यांनी त्याच बायबलच्या प्रभावामुळे बौद्ध धम्मावर एक ग्रंथ लिहिण्याचे योजिले आणि त्याप्रमाणे आराखाडा तयार केला. त्यानुसार त्यांनी दि गाॅस्पेल ऑफ दि बुद्ध हे नाव बायबलच्या प्रभावामुळे योजिले.
गाॅस्पेलचा अर्थ येशू ख्रिस्ताची शिकवण. ( नव्या करारातील चार ग्रंथापैकी कोणताही एक ज्यात येशू चे जीवन आणि शिकवणीचे वर्णन आहे. येशुपदेश )
ह्याप्रमाणे त्यांनी दि गाॅस्पेल ऑफ दि बुद्ध च्या साठ प्रति मुद्रित करून घेतल्या व भारतातील व भारताबाहेरील बौद्ध पंडितांना तसेच इतर विद्वानांना ( कसले पंडित आणि कसले विद्वान ! ) पाठवून त्यांना अभिप्रायाची विनंती केली. पण अपेक्षेप्रमाणे त्यांचे अभिप्राय आले नाही. त्यानंतर त्यांनी स्वतः चिंतन करून आराखाड्यात बदल करून दि गाॅस्पेल ऑफ दि बुद्ध ह्या शिर्षकात बदल करून दि बुद्ध ॶॅन्ड हिज धम्म हे यथार्थ भारतीय नाव दिले.
अर्थात बुद्ध आणि त्यांचा धम्म. पण ज्यांचा भेसळ करायचा मुळ स्वभावच आहे ते भेसळ करणार नाही तर ते ब्राम्हण कसले ? आणि आपण त्यांच्या कावेबाजीला फसलो नाही तर आपण पढतमुर्ख कसले ?
जर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाला भगवान म्हणायचे असते तर त्यांना God, Bhagwan ह्या शब्दाचा उपयोग करून God Buddha and his Dhamma किंवा Bhagwan Buddha and his Dhamma असे इंग्रजी शिर्षक दिले असते. ह्याचा अर्थ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाला भगवान म्हणायचे नव्हते असा होतो. मग ही भेसळ कोणी आणि कशी केली ? तर सर्वप्रथम THE BUDDHA AND HIS DHAMMA ग्रंथाचे सर्वप्रथम हिंदी अनुवाद करणारे भदंत आनंद कौशल्यायन ह्यांनी. हे हिंदी, इंग्रजी, पाली, संस्कृत भाषेचे विद्वान होते. तरीही ते मुळ ब्राम्हण होते. त्यांनी आपल्या ब्राम्हणी प्रवृत्तीनुसार त्यात भगवान शब्द घुसाडला आणि त्या इंग्रजी ग्रंथाचे भगवान बुद्ध और उनका धर्म असा हिंदी अनुवाद केला. पण आम्ही उच्च शिक्षित असूनही त्या भगवान आणि धम्म ऐवजी धर्माला स्वीकार केले. कारण आम्हाला हिंदू धर्मातील देव, भगवान, ईश्वर ह्यांची आदत असल्याने भगवान शब्दाची फारच आवड आहे.
वास्तविक भगवान हे संबोधन मात्र आहे. बुद्ध म्हणतात –
“आणि आनंद ! भिक्खू परस्परांशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात ; पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे, ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारेल तेव्हा त्याच्या नावाने, गोत्र नावाने किंवा ‘मित्र’ म्हणून त्याने त्याला संबोधावे व कनिष्ठ जेव्हा जेष्ठाला हाक मारेल तेव्हा त्याने त्याला भगवान किंवा भन्ते ( ‘lord ‘ or ‘ Your reverence ‘ ) असे संबोधावे” पाहा – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रुष्ठ क्र, ४१४ – ४१५ अनु क्र. ३
ह्यावरून आपण समजू शकतो की, भगवान म्हणजे देव, ईश्वर, परमेश्वर नसून फक्त संबोधन मात्र आहे.
पण नाही ! आम्हाला तर भगवान पाहिजे. मग बुद्ध रूपात का होईना !
जर भगवान ह्या शब्दाचा सधी विग्रह केला तर —
भगवान = भग + वान
भग = व्रण,क्षत,छिद्र, जखम.
वान = ह्या शब्दाचा मराठीत अर्थ नाही
पाली शब्दकोश नुसार
भगवा : Worshipful, venerable, blessed,holy (भगवन्त्) पृष्ठ क्र ७२ पहिला शब्द
हाच शब्द पृष्ठ क्र ६३९ मध्ये दिलेला आहे, तो असा —
a consonant is dropped at the end of a word.e.g. :– भगवान् –> भगवा.
ह्यात कुठेही भगवान हा शब्द नाही. ह्यातील शेवटचा न् लंगडा आहे.
काहीजण कुतर्क करतात भग म्हणजे नष्ट आणि
वान म्हणजे तृष्णा
हा अर्थ ओढून ताणून तथागताला भगवान बनविण्याची केविलवाणी धडपड होय. कारण
भग्गो = Broken (भग्न -भञ्ज )
वानं = Sewing सीने का कार्य
वानं = Desire, lust पाहा – पाली शब्दकोश पृष्ठ क्र ३९४ खालून सहावा, सातवा
जर आपणास तृष्णा नष्ट करणारे असे म्हणायचे असेल तर
भग्गोवानं असा उच्चार करावा लागेल. कारण मराठी भाषेत भगवान करताच येत नाही. कारण
भग्गो आणि भग तसेच
वान आणि वानं चे अर्थ वेगवेगळे आहेत.
वान शब्दाचा अर्थ मराठीत आहेच नाही.
तरीही आपण उच्च शिक्षित असूनही भगवान म्हणण्याची काय आवश्यकता आहे ? कारण तथागतांनी स्वतःला कुठेही ते बुद्ध किंवा भगवान आहेत असे म्हटले नाही. ते स्वतःला काय म्हणतात ते
पाहा —
“ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवांचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष, आणि मनुष्य होतो ; पण आता मी आसवांन पासून मुक्त झालो आहे आणि मुलाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणे माझी आहे.”
म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत (ज्ञानी पुरुष )असे समज. पाहा – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रुष्ठ क्र,२९२ अनु क्र.५ आणि ७. प्रकरण ४. ज्ञानी पुरुष. चतुर्थ खंड भाग चवथा
हा संदर्भ डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अंगुत्तर निकाय, चतुक निप्पात, चक्कवग्गो मधून घेतलेला आहे. ह्यातही देवाचे अस्तित्व नाकारणाऱ्या बुद्धाच्या तोंडी देव शब्द टाकलाच.
वरील अनु क्र ६ मध्ये सुद्धा Enlightened One चा तथागत असा अनुवाद करण्याची आवश्यकता नसतानाही तथागत आणि कंसात ( ज्ञानी पुरुष) असा अनुवाद केला आहे.
म्हणून भगवान ह्या शब्दाची संधी विग्रह करण्याची मुळीच आवश्यकता नाही.
परंतु हिंदू धर्मातील देव, देवता, भगवान, ईश्वर ह्यांची पूजा अर्चा करण्याची सवय पूर्वजांपासून जडल्यामुळे भगवान मग तो दगडाची मूर्ती असो की हिंदू धर्मातील राम, कृष्ण, विष्णू, महेश असो की बौद्ध धम्मातील बुद्ध !
ज्याप्रमाणे समाजातील जात ही जात नाही अगदी त्याचप्रमाणे भगवान सुद्धा काही केल्या जात नाही.
एवढेच नाही तर
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा जगातील नामांकित विश्वविद्यापिठातून अनेक पदव्या २०-२० तास उपाशीपोटी राहून परीक्षा देऊन प्राप्त केल्या त्यांना सुद्धा जगलात तपश्चर्या करणाऱ्या बोधिसत्वाच्या रांगेत बसवतात. बोधिसत्वाने कोणती परीक्षा उत्तीर्ण केली ? कोणते प्रमाणपत्र मिळविले ? जगात Symbol of knowledge ज्ञानाचे प्रतीक, भारतीय राज्यघटना चे शिल्पकार, आणि अनेक पदव्या प्राप्त केल्या तरीही ह्यांना त्या पदव्यांचे मोल समजले नाही, पण बोधिसत्व हे संबोधन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त केलेल्या अनेक पदव्यांपेक्षा श्रेष्ठ ठरवतात असे हे बुद्धीमान ?
मानिक वानखेडे, वर्धा
9860761826
धम्म संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत