भारताच्या सुप्रीम कोर्टाचा पंजाब राज्य विरूद्ध दविंदर सिंग या खटल्याचा निकाल..आरक्षण…क्रिमी लेयर आणि चर्मकार युवक …..!!
जय रविदास मित्रांनो….
सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या पंजाब राज्य विरूद्ध दविंदर सिंग या खटल्यामधीलनिकाल हा चर्मकार समाजांतील युवकांना एक इशारा आहे. काळ बदलतो आहे,स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे झाली. आरक्षणाने एस सी प्रवर्गातील चर्मकारांची सामाजिक आर्थिक ,शैक्षणिक , प्रगती क्रिमी लेयरची अट लावण्याएवढी झाली आहे का?.
याचा थोडा विचार करा .
स्वातंत्र्यापूर्वी मनू पुरस्कृत चातुर्वर्ण्य आधारीत परंपरागत चांभारी धंदा होता.घरे शेती, होती.ती उच्चवर्णीय
भांडवलदारांच्या हाती गेली.
चर्मकार आपली गावं घरे,शेती ,धंदा सोडून शहरात आला.झोपडपट्टीत राहू लागला .ग्रामीण उत्पादकाचा तो शहरी कामगार झाला .आरक्षणाने जर त्यांची आर्थिक प्रगती झाली असती तर,बाटा,लान्सर,प्युमा,
नायके, वुडलॅड ईत्यादी उद्योगपतींच्या ऐवजी ,
कांबळे,वाघमारे,गवळी,आबनावे सारखी चर्मकार उद्योगपती घराणे उदयाला आलीअसती… किंव्हा प्रत्येक चांभारवाडा हा “लेदरहब” म्हणून उदयाला आला असता. तसे झाले आहे का? शैक्षणिक क्षेत्रात चर्मकार बाबासाहेबांच्या संविधानामुळे शिकला पण किती शिकला…? सन्माननिय अपवाद वगळता विद्यार्थी मॅट्रिक पर्यतच जातात.पुढील शिक्षण अप्राप्य करून ठेवले आहे.चर्मकार लोकसंखेच्या प्रमाणात किती टक्के कलेक्टर, कमिशनर,सचिव,कुलपती,कलेक्टर,कमिशनर,सचिव,कुलपती,हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट जज्ज असे उच्च पदावर पोहचले आहेत….? पूर्वी एस सी प्रवर्ग चातुर्वर्ण्य पुरस्कृत चतुर्थ वर्णात होतो .आता सरकार पुरूस्कृत चतुर्थ श्रेणीतील श्रमिक झाला आहे… होतो आहे…शैक्षणिक अवस्था व व्यवस्थाच अशी आहे की, खालच्या जातीतील मुले,मुली सर्वसाधारणपणे दहावी जाऊन नापासच व्हावीत..जेणेकरून सरकारी वा खाजगी क्षेत्रातील नोकरीत तो पट्टेवाला शिपाई,ड्रायव्हर, हवालदार, नर्स, आया ,सफाईगार अशा सेवेकरी श्रमिकांचा पुरवठा व्हावा. सरकारया नौकरीत कित्येक वर्षे भर्ती बंद आहे. बढतीत आरक्षण बंद आहे.
अपवादात्मक परिस्थितीत एखादा एस सी प्रवर्गातील चर्मकार उच्चपदी व उच्च श्रेणीत पगारदार झाला म्हणजे पुर्ण चर्मकार समाज सुधारला असे म्हणता येणार नाही.अश्या परिस्थितीत सवर्णाच्या बरोबरीने आर्थिक उन्नती झाली समजून क्रिमी लेयरची अट सर्व एस सी समाजावर लावणे ही नव विषमताच ठरेल. राजकिय क्षेत्रात किती चर्मकार नेते आहेत.? देशात एस सी एस टी लोकसंख्येत चर्मकार प्रथम क्रमांकावर आहे. आतापर्यंत किती चर्मकार प्रधानमंत्री झालेत. महत्प्रयासाने एखादा चर्मकार नेता नावा रूपाला येऊ लागला कि,कट कारस्थान शिजवून त्यांचा राजकिय कडेलोट करण्याचे राजकारण केले होते.जाते. स्व.बाबूजी जगजीवनराम यांचे उदाहरण आहे. त्यांना दोन वेळा प्रधान मंत्रीपदाची संधी आली होती परंतू सतत पन्नास वर्षे संसद सदस्य म्हणून गिनीज बुकमधे रेकॉर्ड असलेले ,निव्वळ चर्मकार म्हणून त्यांना बदनाम करून, या संधीपासून वंचीत ठेवले. संसद बरखास्त केली. परंतू त्यांना प्रधानमंत्री होऊन दिले नाही. बाबूजी चर्मकार म्हणून ते चर्मकारांचेच भले करतील या भाबड्या प्रेमातून लिहीत नसून, एक एस सी प्रवर्गातील प्रमुख जातीचे प्रतिनिधी म्हणून एक भारतीय म्हणून त्यांना संधी मिळणे हे लोकशाहीचे व संविधानानाचे फळ ठरले असते. पण त्यांना डावलले गेले. राजकारणात चर्मकार हा पंचपक्वान्नातील लिंबू लोणचं झाला आहे. अश्या परिस्थितीत चर्मकार तरूण युवकांनी काय करायला पाहिजे?…
माझ्या मते सर्व प्रथम जाती व धंदयाबद्धलचा असलेला न्यूनगंड सोडला पाहीजे.जगातील सर्व मुस्लीम एक आहेत.ख्रिश्चन एक आहेत. बौद्ध एक आहेत,कामगार एक आहेत. तसे, जगातील सर्व चर्मकार एक आहेत. ही एकीची भावना मनात रूजवायला पाहीजे. चर्मकार जगात सगळीकडे आहेत. पाश्चात्य देशात चर्मकाराना “शू मेकर” म्हंटले जाते .शुमेकर या संबोधनाने जाती ऐवजी कारागीराचा (Guild) बोध होतो. या शु मेकरानी जर्मन राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती , फ्रेच राज्यक्रांती करणारे अनुक्रमे अडाल्फ हिटलर, स्टॅलिन, नेपोलियन बोनापार्ट तसेच अमेरिकेन अध्यक्ष अब्राहम लिंकन वैज्ञानिक लुई पाश्चर, ब्रेल वी असे दिग्गज माणसे जगाला दिली.
इतकेच नाहीतर, “युजेन शुमेकर” नावाच्या चर्मकार खगोल शास्त्रज्ञ्याची समाधी चंद्रावर नासा या अमेरीकन संस्थेनी बाधलेली आहे. ही परंपरा हा इतिहास आहे हे युवकांनी मनात ठेवले पाहिजे. चर्मकार म्हणून आम्ही कश्यातच कमी नाही. सर्वत्र मी “द बेस्ट” च राहील ही ऊर्मी बाळगायला हवी . नौकरीच करायची आहे तर, सरकारया नौकरया असू दे नसू दे , मी एम पी एसी, युपी एस सी स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकतो, खाजगी क्षेत्रात ,आय टी इंजिनिअर, डॉक्टर, वकील ,प्राध्यापक, वैज्ञानिक बनू शकतो ह्या विश्वासाने शाहू फुले आंबेडकरी संत रविदासांच्या विचारातून प्रेरणा घेऊन, मला आई वडिलाचे ,समाजाचे ऋण फेडायचे आहे या भावनेतून “आय वुईल बिकेम दि बेस्ट” या ध्येयाने स्वंय प्रेरित होऊन, आळस झटकून कामाला लागले पाहीजे. नाहीतर
गळ्यातील मडके,व पाठीवरील खराटा आपल्या स्वागतास अधीर झालेले आहे..!सावध व्हा, देव संकटात नाही.धर्म संकटात नाही.चर्मकार संकटात आहेत.शिकलो नाही .नौकरी नाही म्हणून निराश राहू नका.आपल्याकडे कौशल्य आहे.कष्टाचे भांडवल आहे.स्वाभिमानाचे तेज आहे.आपली लढाई संपलेली नाही…!
जय रविदास जय भीम
लेखक अँड आनंद गवळी
[BA;(eco) MLL &LW.;LLM. ]
राष्ट्रीय उपाध्यक्ष,
राष्ट्रीय चर्मकार महासंघ
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
भारतीय दलित
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत