भारतीय संविधान हे अतिशय अभ्यासपूर्ण तयार झालेल संविधान आहे : – मुख्य न्यायाधीश अंजू शेंडे
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
भारतीय संविधान अभ्यासपूर्ण झाल्यामुळे या संविधानात समानता आणि अखंडता दिलेली आहे प्रत्येकांना समानतेचा अधिकार दिलेला आहे हे संविधान सर्वात मोठे आणि प्रभावी आहे या मध्ये संपूर्ण अंमलबजावणी केलेली आहे संविधानात सर्व अधिकार शासनाच्या तसेच कायदेशीर योजनांची माहिती घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर होणारा अन्याय दुर करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी नळदुर्ग शहर व परीसरातील नागरीकांनी नळदुर्ग येथे सुरु करण्यात आलेल्या विधी सेवा चिकित्सालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिवच्या श्रीमती अंजु शेंडे यांनी या विधी सेवा चिकित्सालयाचे उदघाटन करतांना केले आहे.
नळदुर्ग येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (विधी सेवा चिकित्सालय ) योजना २०१० अंतर्गत “विधी सेवा चिकित्सालय” सुरु करण्यात आले आहे. नळदुर्ग शहरातील गाव चावडीच्या इमारतीमध्ये हे विधी सेवा चिकित्सालय सुरु करण्यात आले आहे. दि. ८ सप्टेंबर रोजी या विधी सेवा चिकित्सालयाचे उदघाटन श्रीमती अंजु शेंडे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव यांच्या हस्ते करण्यात आले.
या उदघाटन समारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन बाळासाहेब चौधरी, दिवाणी न्यायाधीश क. स्तर धाराशिव, मिलिंद निकम, अध्यक्ष,तुळजापुर तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर तुळजापुर, जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव वसंत यादव, नळदुर्ग नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, तुळजापुर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. बालाजी देशमाने, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे आदिजन उपस्थित होते.
प्रारंभी विधी सेवा चिकित्सालय कार्यालयाचे श्रीमती अंजु शेंडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यानंतर मल्लिकार्जुन मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विधी सेवा चिकित्सालया संदर्भात माहिती देतांना श्रीमती अंजु शेंडे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव यांनी महिलांची सुरक्षा तसेच सर्वांना समान कायदा याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी अन्यायाला बळी न पडता खंबीरपणे अन्यायाच्या विरोधात उभे राहावे. आपल्यावर होत असलेल्या अन्याया संदर्भात कायदेशीर बाबी समजुन घेण्यासाठी महिलांनी या विधी सेवा चिकित्सालयाचा लाभ घ्यावा. आज महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत. शासनाच्या विविध योजनांमुळे आज महिला सक्षम बनत आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती करून घेण्यासाठी महिलांनी विधी सेवा चिकित्सालयात येऊन प्रत्येक योजनांची माहिती करून घ्यावी असेही श्रीमती अंजु शेंडे यांनी म्हटले आहे.
यावेळी बाळासाहेब चौधरी, दिवाणी न्यायाधीश क. स्तर धाराशिव, मिलिंद निकम, तुळजापुर तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर तुळजापुर, जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव वसंत यादव यांनीही महिला सुरक्षासह विविध कायदेशीर बाबींची माहिती दिली.
या कार्यक्रमास नळदुर्ग शहरातील नागरीक, बचत गटांच्या महिला तसेच वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिमा देऊन तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत