जयदीप आपटेच्या नावावर लपवणार पुतळ्याचा महाघोटाळा
दीपाली वारुले, फेसबुकवर
महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याच्या सत्तेतील दोन प्रमुख माकडांनी आता पार अब्रूच गेल्यामुळे नाईलाजाने का होईना माफी मागितली. तिस-या चाणाक्ष माकडाने मात्र अजूनही माफी मागितलेली नाही. मागणारही नाही. कारण त्या घर का भेदी जमातीचे महाराजांशी असलेले वैर सगळ्यांना माहिती आहे.
नंतर पंतप्रधानांनी देखील बरोबर सावरकर पुराण मधेच घुसडून धमकीवजा माफी मागितली. निवडणुका समोर असल्यामुळे आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांच्या महाराजांशी निगडित असलेल्या जाज्वल्य भावना लक्षात घेता आयुष्यात पहिल्यांदाच शेठने जाहीर माफी मागितली. नंतर नवीन पुतळा उभारण्यासाठी आणि पुतळा का कोसळला यासाठी मंत्रालयातल्या मर्जीतील उपमाकडांची चौकशी समिती नेमली. नेव्हीवाले बिचारे त्यांच्या कातडीची हमी घेऊन गप्प बसले असतील. त्यामूळे एकाही पत्रकाराने नेव्हीवाल्यांना एकही प्रश्न विचारला नाही. पत्रकार हे या प्रकरणात नेव्हीला सुरक्षित ठेवण्यामागे मोठं राजकारण आहे. कारण जर नेव्हीवाल्यांनी तोंड उघढले तर या माकडांची अब्रूच जाईल.त्यामुळे तेरी भी चुप. मेरी भी चुप.
आता सगळेजण जरी आपटे आपटे करत असले तरी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागे एकटा आपटे जबाबदार नाही. किंबहुना आपटे हा या सगळ्या घृणास्पद प्रकारासाठी केवळ नामधारी आहे.
मी कालच्या पोस्टमधे पुतळा उभारण्यासाठी लागणा-या परवानग्या आणि कंत्राटदाराची पात्रता याबद्दल इत्थंभूत माहिती दिली होती. त्यानुसार आपटे हा या कामासाठी पात्रच ठरू शकत नव्हता. ना आर्थिक निकषावर ना अनुभवाच्या निकषावर. शिवाय नेव्हीने देखील हा पुतळा स्वतःहून उभारला असल्याची शक्यता नाहीच. कारण नेव्ही म्हणजे ग्रामपंचायत नव्हे कसेही काम करायला. हा पुतळा उभारण्यामागे निव्वळ करोडो रूपये लुटणे हा एकमेव हेतू असावा. आता जर हे काम नेव्हीला दिले किंवा शासनाच्या एखाद्याच्या विभागाला दिले तर दोन तीन वर्षे होणार नाही आणि पारदर्शकता ठेवावी लागेल हे यामगच्या नालायक सूत्रधारांना ठाऊक असेल. त्यामुळे आपटे हा ओळखीचा चव्वन्नीछाप शिल्पकार हाताशी धरून सत्तेतल्या बड्या माकडाने सर्व नियम धाब्यावर बसवून त्याला नामधारी उभे केले असावे. आम्ही तुला एव्हढे मोठे काम देतो. तू फक्त कागदावर रहा. बाकी आमचा माणूस काम करेल आणि चेक तुला दिला की तू त्यातले तुझी मजुरी घेऊन बाकी भली मोठी रक्कम आम्हाला परत कर या सेटींगवर हे काम आपटेला देण्यात आले असावे. यासाठी कदाचित थातुरमातुर एस्टिमेट प्रचंड वाढवून घाईघाईत बनवण्यात आले असावे आणि पंतप्रधानांच्या दौ-याचे निमित्त साधून लवकरात लवकर करोडो रूपये फ्रॉड करून लाटण्यासाठी कुणालातरी हे काम करायला सांगितले असावे. कारण एव्हढ्या सगळ्या परवानग्या आणि तांत्रिक गोष्टी तसेच इंजिनिअरिंग काम आपटे करूच शकत नव्हता.
त्यामुळे मुळातच कुठल्याही तज्ञ स्ट्रक्चरल इंजिनिअर अथवा सिव्हील कंसल्टंटच्या देखरेखीखाली हे काम न केल्यामुळे थातुरमातुर पद्वतीने पुतळा उभा केला असावा. चबुत-याचे कामदेखील त्याच माणसाने केले असावे. घाईघाईत बेढब आणि सगळे इंजिनिअरिंग चे निकष धाब्यावर बसवल्यामुळे पुतळा कोसळला. त्या आधीच आपटेला सगळे पेमेंट दिले असावे आणि आपटेने ते मधल्या माणसामार्फत त्या बड्या माकडाला पोहोचवले असावे.
आता लोकांच्या संतापाचा सगळा फोकस आपटेकडे केंद्रित करून ही तीनही माकडे ह्यामागचा भयंकर घाणेरडा घोटाळा लपवू पाहात आहेत. लोकही बरोबर ह्या माकडांच्या जाळ्यात अडकून आपटे आपटे करत आहेत. आपटेची मुळात फरार होऊन देशविदेशात पळून जाण्याची ना हिंमत आहे ना औकात. त्याला बरोबर या माकडांनी लपवलेले आहे आणि पोलिसांना तोपर्यंत नौंटंकी करत त्याच्या काका मामा मावशीकडे जाण्यासाठी सांगत आहेत. आता पोलिस आणि ही माकडे बरोबर आपटेला लपवतील. त्याला तोपर्यंत पोलिसांसमोर काय बयान द्यायचे ते पढवतील. त्याला महिनाभरात जामीनाची हमी देतील. शिवाय मोठे आमिष दाखवतील. थोडा जनक्षोभ कमी झाला की मग डंका पिटत आपटेला पकडल्याची नौटंकी करतील. लोकदेखील पुन्हा आपटे आपटे करत मूळ मुद्दे विसरतील. आपटेला जास्तीत जास्त दोन तीन दिवस पोलिस कोठडी आणि नंतर महिना दिड महिना न्यायालयीन कोठडी मिळेल. नंतर पोलिस पुरावेच कमकुवत करून आपटेला जामीन कसा मिळेल ह्याची व्यवस्था करतील. तिकडे शासनाने बसवलेल्या समितीमधली मूक उपमाकडे आपटेवरच खापर फोडून मोकळी होतील.
लोकही काही दिवसांनी विसरतील.
हे सगळे असे होऊ नये म्हणून कुणीतरी न्यायालयात याचिका दाखल करून खालील मुद्द्यांची चौकशी करण्याची मागणी केली पाहिजे.
*सदर कामाचे अंदाजपत्रक कुणी तयार केले होते? किती रकमेचे होते?
*त्याला ताँत्रिक मंजुरी, परवानग्या घेतल्या होत्या का?
*हा पुतळा नेव्हीतर्फे उभारण्यात असल्याचे पत्र नेव्हीने शासनाला दिले होते का?
*नसल्यास शासनातर्फे हा पुतळा उभारला का?
*ह्या कामासाठी टेंडर्स मागवली होती का? त्याची माहिती.
*आपटेला वर्क अॉर्डर कुणी दिली?
*शासनातर्फे कुठला विभाग देखरेख ठेवत होता?
*किती महिन्यांची मुदत कार्यादेशामधे होती?
*आपटेला चेक कुणातर्फे देण्यात आला? नैव्ही अथवा शासन?
*आपटेच्या त्यानंतरच्या बॕंक ट्रांज़क्शन्सची चौकशी.
*ह्यामागे शासनाच्या कुठल्या माकडाकडून आपटेशी पत्रव्यवहार अथवा संपर्क झाला?
*नेव्ही आणि तेथील जिल्हाधीकारी या अधिका-यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे.
*आपटेला पोलिस कोठडीत या सगळ्या घाणेरड्या कटामागे कोण कोण आहे हे सांगण्याचे पोलिसांना आदेश देण्यात यावे.
*ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या जागी कुठल्याही नव्या बांधकामाचे नियोजन करण्यात येऊ नये.
*आपटेच्या फोनचा सगळा डेटा आणि कॉल हिस्ट्री जाहीर करावी.
हे सगळे केले तरच या भयंकर घोटाळ्याच्या मुळाशी पोहोचणे शक्य आहे. अन्यथा या तीन माकडांनी दिलेल्या मूर्खपणाच्या कारणांवर आणि ढोंगी माफीवर हे नीच लोक जनतेची बोळवण करतील आणि महिनाभराने आपटे तुरूंगातून सुटून बिनघोर आपल्या घरी घराला नवीन रंग देऊन मालकांना दुवा देत आरामात जगेल.
लोक मूर्खासारखे आपटे आपटे करत आपटत बसतील.
साक्षात महाराजांच्या नावाने केलेला एव्हढा भयंकर घाणेरडा घोटाळा तसाच दडून राहील.
***दीपाली वारुले, फेसबुकवर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत