माणूस म्हणून विकसित होणे हेच माणसाचे ध्येय असावे:– प्रबुद्ध साठे
कुर्ला नेहरूनगर (मुंबई) — बावीस प्रतिज्ञा हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्म व केलेल्या धम्म क्रांतीचे संविधान आहे, यामध्ये पंचशील, अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता, समता, विज्ञाननिष्ठ हे बौद्धमं धम्माचे तत्त्वज्ञान असून त्याचे आचरण करून माणसांनी स्वतः मधील माणूस विकसित करावा, व समाजामध्ये तसा मानवतावाद रुजवणे हेच धम्माचे कार्य आहे , यासाठी माणूस म्हणून विकसित होणे हेच हेच माणसाचे ध्येय असावे असे प्रतिपादन चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियान प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले , ते मुंबई कुर्ला नेहरूनगर येथे वर्षावास निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर सेवा मंडळ आणि महिला मंडळ धम्मकुटी बुध्द विहार नेहरूनगर कुर्ला यांच्या वतीने आयोजित धम्म प्रवचनात बौद्ध धम्मातील तत्त्वज्ञान व समाजातील अंधश्रद्धा या विषयावर बोलत होते.
यावेळी प्राचार्य डी एन संदनशिव साहेब, धम्म प्रचारक सुरेश त्रिभुवन गुरुजी, डि, के जाधव, आयुष्यमती निता केदारे,, कविता जाधव, संध्या पगारे, रोहिणी पंडित,, तेजस वाघमारे, किशोर पंडित, सुनील कांबळे, अशोक अहिरे काका, अरुण अंबावडे, निता शिरसाठ, रेखा गायकवाड, सुप्रिया मोरे, सुरेखा खरात, मोरे मावशी, अलका लिंबसकर, करुणा अंबावडे, लता गायकवाड, कल्पना सोनवणे, मनिषा कांबळे, सातपुते मावशी सुमन भालेराव, पंकज भारती, अरविंद पवार इत्यादी उपासक उपासिका अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत