भारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार

समाज आणि व्यक्ती.


ज्या प्रमाणे थेंब समुद्राच्या पाण्यात टाकला असतांना त्याचा लोप होतो.
तसा माणसाचा तो तो केवळ समाजात राहिला म्हणून त्याचा लोप होऊ शकत नाही.
‌त्याचे जीवन स्वतंत्र असते.त्याचा जन्म समाजाच्या सेवेकरिता नसून आत्मोन्नती करिता आहे.ह्याच एकाच कारणामुळे सुधारलेल्या राष्ट्रात एका माणसाला दुसऱ्या माणसास आपला गुलाम करून ठेवता येत नाही.
ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला मान्य होऊ शकत नाही.
तसेच ज्या धर्मात एका वर्गाने विद्या शिकावी.
दुसऱ्या वर्गाने शस्त्र धरावे तिसऱ्या वर्गाने व्यापारी करावा.व चौथ्याने नुसती सेवा करावी.असे आहे.
तो धर्म मला मान्य नाही.विद्या प्रत्येकाला हवी शास्त्राची दरकेला जरुरी आहे.सर्वाना पाहिजे.
ही गोष्ट जो धर्म विसरतो व जो धर्म
एकाला सज्ञान करण्याकरिता बाकीच्यांना अज्ञानात ठेवतो तो धर्म नसून लोकांना बौद्धिक गुलामगिरीत
ठेवण्याचा कावा आहे.
जो धर्म एकाच्या हातात शस्त्र देतो व दुसऱ्याला निशस्त्र देतो तो धर्म काहींना धनसंपादनाचा मार्ग मोकळा ठेवतो व बाकीच्यांना आपल्या जीविकेकरिता दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची अनुज्ञा देतो तो धर्म नसून ती स्वार्थपरायणता आहे.
हिंदूधर्मातील चातुर्वर्ण्य हे असे आहे.
त्याविषयी माझे मत काय आहे हे मी स्पष्टपणे मांडले आहे. हा हिंदुधर्म तुम्हाला हिताचा आहे की काय याचा तुम्ही विचार करा.
व्यक्तीच्या आत्मोन्नतीला पोषक असे वातावरण उत्पन्न करणे ही धर्माची मूलभूत कल्पना आहे.
हे जर मान्य केले तर हिंदूधर्माने तुमची आत्मोन्नती कधी ही होऊ शकणार नाही.
व्यक्तीच्या विकासाला तीन गोष्टींची आवश्यकता आहे. सहानुभूती,समता, आणि स्वातंत्र्य हिंदू धर्मात या तिन्हीपैकी एकतरी बाब तुमच्याकरिता उपलब्ध आहे असे तुम्हाला म्हणता येईल काय ?

महामानवाचे विचार 🌻🙏

संदर्भ —डाॅ बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय गाजलेली
भाषणे
पुष्ठ क्रमांक —२३
शशांवा.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!