अनुसूचित जाती वर्गीकरण विरोधात संविधान संरक्षण समितीची स्थापना
हरिभाऊ बनसोडे
धाराशिव …सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण व क्रीमिलेयर यासंदर्भात दिलेला निर्णय अनुसूचित जाती जमातीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे न्यायपीठापुढे क्रिमीलेयरचा विषय नसताना सुद्धा ते लागू केले जाऊ शकते असे सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना सुचित केले आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा तसेच जातगणना करण्यात यावी, मागासवर्गीयांचा शासकीय सेवेतील अनुशेष भरण्यासाठी कालबद्ध मोहीम राबवावी, मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे, खाजगी उद्योगधंद्यांना शासनाने केलेल्या अटी शर्थी प्रमाणे आरक्षण बंधनकारक करण्यात यावे ,कंत्राटीकरण पद्धती बंद करून सर्व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार संधी निर्माण करणे, याबाबत केंद्र व राज्य शासनाला निर्देशित करावे या अशा मागण्याचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांचे मार्फत भारताच्या राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुरमू.माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ,लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी ,महाराष्ट्राचे राज्यपाल ,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना या मागण्याचे निवेदन पाठविण्या चा निर्णय घेण्यात आला.
सदर बैठकीस प्राध्यापक महेंद्र चंदनशिवे ,प्राध्यापक डी.डी मस्के, प्राध्यापक रवी सुरवसे ,प्राध्यापक डॉक्टर दिनकर झेंडे ,जयराज खुने.व्ही.एस गायकवाड ,दादासाहेब जेटीथोर संजय कुमार वाघमारे ,पृथ्वीराज चिलवंत डॉक्टर रमेश बनसोडे ,प्राध्यापक अरविंद खांडके ,प्राध्यापक राम चंदनशिवे, प्राध्यापक डॉक्टर महादेव गायकवाड ,जनार्दन वाळवे, एन एल गोरसे एस बी वाघमारे अनंत वाघमारे ,श्रीमंत पालके, आनंद घाडगे ,अनुरथ नागटिळक.सुनील वाघमारे.शीलरत्न शिंदे ,चंद्रकांत ठोकळ ,राजेंद्र सर्वदे, प्रवीण जगताप ,प्राध्यापक एस कलासरे आदि.विविध क्षेत्रातील कर्मचारी, अधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सदर बैठकीत” संविधान संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली सदर समितीचे समन्वयकम्हणून एडवोकेट अजित कांबळे दहिफळकर यांची तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी हरिभाऊ बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे
हरिभाऊ बनसोडे
प्रसिद्धीप्रमुख संविधान संरक्षण समिती ,धाराशिव
मोबाईल क्रमांक 89 99 58 63 22
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत