सांगलीतील सभेत राहुल गांधी यांनी SC/ST उपवर्गिकरणा व क्रिमिलियर संदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी.
-वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे
सांगली
दि. ४ सप्टेंबर २०२४
सुप्रीम कोर्टाने एससी एसटी आरक्षणातील उपवर्गीकरण व क्रिमिलियरची अट लागू करण्यासंदर्भात नुकताच निकाल दिला असून या निर्णयामुळे एससी, एसटी आरक्षणामध्ये वर्गीकरण करणे व आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी क्रिमिलियरची अट लागू करणे असा निकाल दिलेला आहे. या निकालानंतर काँग्रेसशासित तेलंगणाचे मुख्यमंत्री व कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी या निर्णयाचे स्वागत करून आपल्या राज्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केलेली आहे. आरक्षण संदर्भात काँग्रेसची ही दुटप्पी भूमिका कायमच राहिलेली आहे. आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी कायमच भूमिका घेत आलेली आहे. काँग्रेस आरक्षण वाद्यांच्या बाजूने भूमिका घेत असल्याचा फक्त दिखावा करते परंतु वस्तूस्थितीमध्ये आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेते यामुळे काँग्रेस आणि भाजपचा आरक्षणासंदर्भामधील अजेंडा एकच आहे हे उघड होते. या निकालानंतर राहुल गांधी प्रथमच महाराष्ट्रात म्हणजे सांगलीमध्ये येत आहेत समस्त एससी एसटी आरक्षणवादी वर्ग राहुल गांधी या सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती काय भूमिका घेतात याकडे लक्ष ठेवून आहेत राहुल गांधींनी सांगली येथील सभेमध्ये एससी एसटी आरक्षणातील उपर्गीकरणा संदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत