महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव असलेल्या सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव पदावरून हटवण्याच्या हालचाली ?
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव असलेल्या सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव पदावरून हटवण्याच्या हालचाली सरकारकडुन सुरू झाल्या आहेत यात एक तर सुजाता सौनिक यांनी स्वतः हुन स्वेच्छा निव्रत्ती घ्यावी किंवा राज्याच्या निवडणूक आयोगाच्या मुख्य पदावर जावं मात्र सुजाता सौनिक यांनी या दोन्हीही आँफर नाकारल्या आहेत कारण एक तर श त्या 2025मध्ये म्हणजे एक वर्षाने निव्रत होणार आहेत आणि दुसरं म्हणजे मुख्य सचिव पदावरून साईड पोस्टवर जाणं महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदावर पोहचणार्या सुजाता सौनिक या बौद्ध आहेत याही पेक्षा त्या महिला आणि संवैधानिक प्रक्रियेने कर्तव्य बजावणार्या अधिकारी आहेत मग एवढ्या मोठ्या पदावर आणि पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणुन निवड झालेली असताना त्यांच्यावर अशा पद्धतीने का प्रेशर आणलं जातयं तर याला कारण ही तसच आहे यात राज्यात गाजत असलेली लाडकी बहीण योजना.जी की येत्या आँक्टोबर नंतर म्हणजे जानेवारी की काय या दरम्यान लागणारी विधानसभा निवडणुक डोळ्यांसमोर ठेवून जाहीर केली आहे आणि या योजनेतील महिलांना 1500रूपये महिनाही सुरू झालाय.ही योजना सरकारच्या तिजोरीतुन सुरू केलीय.पण राज्यातील महिलांची संख्या बघता लाडक्या बहिणीसाठी बजेट कमी पडत आहे.आणि मग पाण्याआधी वळण बांधायच्या ऐवजी पाणी आल्यावर बांध फोडु पहाणारे अन बजेट वळविण्यात महारथ हासिल करणारे दादा लोकं अर्थात “तिन तिघाडे अन नव बिघाडे”यांनी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं बजेट लाडक्या बहिणीकडं वळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत
यात खास करून सामाजिक न्याय विभागातील म्हणजे बार्टी,सारथी,आर्टी महिला बाल कल्याण मधील एकात्मिक बालविकास या योजनेतील पोषण आहार,राशन या वेगवेगळ्या योजनेतील बजेट एकट्या लाडकी बहिण योजनेत वळवत आहेत ज्याला सुजाता सौनिक यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे आणि हा मुद्दा सरकार पक्षातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रहमंत्री यांना सहन होत नसल्याने आणि येत्या तिन चार महिन्यात निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींच्या बजेटचे वांधे होऊन ऐन निवडणुकीत मताच्या बाबतीत 'वासलीचा बाजार' होईल म्हणुन सुजाता सौनिक यांची वरील दोन्ही पैकी एक कारण देऊन ऊचलबांगडी करत त्यांच्या फेवर मधील अधिकार्यांची तिथे वर्णी लावत जनतेच्या विकासासाला चुना लावत पिडीतांचे हक्क मारत पुन्हा सत्तेवर यायचं असा तिघाडी सरकारचा प्लान आहे आणि यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे संविधानाच्या चौकटीत राहून आपलं कर्तव्य बजावणार्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा बळी जाण्याची शक्यता आहे यासाठी त्यांच्यावर काही तरी मोठं बालंटही आणलं जाण्याचीही शक्यता आहे.
आज जर वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा पैसा एकट्या लाडक्या बहीण या योजनेत वळवला तर राज्याच्या विकासाचं धोरणच कोलमडु शकतं राज्याच्या विकासाच्या बाबतीत सगळ्यात जास्त बजेट सामाजिक न्यायविभाग आदिवासी विभाग(मंत्रालयात या विभागांच्या दारांसमोरच जास्त गर्दी दिसते )इकडे असतं यामध्ये मनोधैर्य योजना अँट्रासिटी ची मदत या योजनेतील मदत गेल्या वर्षभरापासून तर पिडीतांना आणखी मिळाली नाहीच पण जर मंजूर असेल तर तीही वळवली जाणार आहे बार्टी मध्ये संशोधन करणारे हजारांवर विद्यार्थी आहेत त्यांच्या फेलोशिपवर गदा येणार आहे एकात्मिकचं बजेट वळवलं तर माता मुलं यांच्यांवर परिणाम होणार आहे आपल्याला माहीत नाहीत अशा कित्येक योजना सरकार या एका योजनेत मर्ज करत आहे या सगळ्या बाबींचा अभ्यास आणि त्याबाबतचे कर्तव्य सुजाता सौनिक यांना माहिती असल्याने त्यांनी मंत्रीमंडळातील मुख्य तिघांना स्पष्टपणे नकार कळवला आहे यामुळे जाणिवपूर्वक सुजाता सौनिक यांना त्रास दिला जात आहे अशी आतली माहिती आहे
तरी आपण सर्वांनी सुजाता सौनिक या संवैधानिक कर्तव्य बजावणार्या महिला अधिकारी आहेत त्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहुया सरकारने त्यांच्यावर दबाव टाकुन निचपणाचा कळस गाठु नये ही निषेधासहीत तिघाड्या सरकारला विनंती
⚔️Wesupportsujatasaunik⚔️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत