सोलापुर –हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली जोमात मात्र खड्ड्या मुळे राष्ट्रीय महामार्ग कोमात
रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता झोपीचे सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करावं
जर कोणाचा आपघात झाला तर कंपनीवर व अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार .
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
सोलापुर –हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग बसस्थानकासमोर सर्वत्र खड्डेच, खड्डे पडले आहेत. या खड्ड्याकडे पहिल्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग आहे की, ग्रामिण भागातील एखादा रस्ता आहे असे वाटत आहे इतकी वाईट अवस्था या महामार्गाची झालेली आहे.
राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यामुळे इतकी वाईट अवस्था झालेली असताना राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी मात्र याकडे पाहायला तयार नाहीत. आज या महामार्गावरून नळदुर्ग बस स्थानका समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात उमरग्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना महामार्गावरील पडलेल्या या खड्ड्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. जीव मुठीत घेऊन वाहन चालक आपले वाहन पुढे घेऊन जात आहेत. त्याचबरोबर खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा याठिकाणी अपघात होऊन महामार्गावरील वाहतुक तासंतास बंद पडत आहे. आठवड्यातुन चार, पाच वेळेस नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच, लांब रांगा लागण्याच्या घटना घडत आहेत. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी किंवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी ज्या कंपनीची आहे ते याकडे पाहायला तयार नाहीत. त्यांना वटणीवर आणण्यासाठी वाहनचालक व त्रस्त नागरीकांनी फुलवाडी येथील टोलनाक्यावर आंदोलन करून त्यांची मस्ती जिरविणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील फुलवाडी येथील टोलनाक्यावर वाहनचालकांकडुन टोल मोठ्याप्रमाणात वसुली केला जात आहे मात्र महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम टोल वसुली करणारी कंपनी करत नाही ही दुर्दैवाची बाब आहे.
दि. ७ सप्टेंबर पासुन गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवापुर्वी या महामार्गावरून नळदुर्ग, जळकोट, उमरगा यासह कर्नाटक राज्यात मोठमोठ्या गणेश मुर्ती वाहनातुन नेल्या जातात अशावेळी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे गणेश मुर्तीला इजा झाली तर त्याला जबाबदार कोण. असा प्रश्न गणेशभक्तांमधुन विचारला जात आहे. त्यामुळे ७ सप्टेंबरपुर्वी राष्ट्रीय महामार्ग विभाग व टोल वसुल करणाऱ्या कंपनीने नळदुर्ग बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावेत अशी मागणी गणेशभक्तांनी केली आहे.
खड्डे बुजविण्याचे काम थातुरमातुर न करता पुन्हा त्याठीकाणी महामार्गावर खड्डे पडु नयेत अशाप्रकारे खड्डे बुजविण्याचे काम होणे गरजेचे आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत