महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
“SC ST OBC च्या मनमस्तिष्कावर आरएसएस करतेय वार….!”
सतिशदादा इंगोले
कोण्या एका मनोज शुक्लाचा आरएस च्या समर्थनार्थ जो व्हिडिओ व्हायरल झालाय, तर हा मनोज शुक्ला आरएसएस च्या तालमीत घडलेला जातीवंत ब्राम्हण आहे , हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला पाहिजे, आणि गत राजेशाही काळात उघडपणे जातीय अत्याचार करणाऱ्या ब्राम्हणांच्या लाजिरवाण्या आणि तितक्याच घृणास्पद कार्यावर आजची त्यांची पिढी पडदा टाकू पाहतेय जेणेकरून, तुमच्या मनात त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण होऊन तुमचा त्यांच्या नालायकपणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, आणि ते आज संविधानिक स्वातंत्र्याच्या काळात आतून आतून तुमच्या हक्क अधिकारांवर गदा आणत राहतील, आणि तुमच्यातला तयार झालेला सॉफ्ट कॉर्नर त्यांच्या घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या विरोधात बोलणार नाही,आवाज उचलणार नाही,
हिंदू राष्ट्राची भाषा बोलणारा RSS हिंदू हा शब्द १९१८ च्या नंतरच नावारूपाला आणतो, कारण संपूर्ण जगावर एकछत्री राज्य करणाऱ्या ब्रिटीशांच्या साम्राज्यात पहिल्यांदा इंग्लंडमध्ये निवडणूक पध्दत सुरु झाली, आणि भारतातल्या ब्राम्हणशाहीने आपल्या जातीच्या अल्पमताचा भविष्यकालीन धोका ओळखला आणि हिंदू नावाच्या फसव्या शब्दाखाली संपूर्ण बहुजन वर्गाची बोळवण केली, आणि आजही त्याआधारे शोषण करणे सुरूच आहे, आपल्या सोईप्रमाणे धर्म, आपल्या सोईप्रमाणे देशप्रेम, आपल्या सोईप्रमाणे समाजकार्य आणि आपल्याच सोईप्रमाणे समान नागरी कायदा (UCC) निर्माण करू पाहणाऱ्या संधीसाधू धुर्त ब्राम्हणांची गॅंग म्हणजे आरएसएस, आणि त्या गॅंगचा पडदाफाश करण्यासाठी, SC ST OBC मुस्लिम अल्पसंख्याक विद्वानांनी समोर येऊन लढलं पाहिजे, तेव्हाच आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण सुरक्षित करू शकू, मुस्लिमांचा हितैशी म्हणणाऱ्या आरएसएस मध्ये जे मुस्लिम आहेत त्यांना भारतातील खरे मुस्लिम हे मुस्लिमंच मानत नाहीत, तर त्यांच्यातील असणाऱ्या शीया - सुन्नी वादातील काही पोटजातींना हाताशी धरून आरएसएसच्या दावणीला बांधून घेऊन स्वतःला मुस्लिम हितैशी म्हणवून घेण्याचा आटापिटा आरएसएस करते, त्यासाठी आपल्या महापुरूषांच्या विचारांचा अभ्यास करून त्यांच्या मार्गावर चालणे आवश्यक आहे,
UCC मनुवादी आरएसएसला त्यांचे अधिकार मजबूत करणारा पाहीले, त्यांच्या सोईचा, नाही तर बाबासाहेबांनी सर्वांना समान अधिकार मिळवून देणारंच संविधान लिहीलं आहे, आज समान नागरी कायद्यावर बोलणारा संघ, स्वातंत्र्यापुर्वी चार वर्णावर आधारीत व्यवस्थेचा सदैव समर्थक राहून, पाचव्या अतिशुद्र, अस्पृश्य जातींना कोणत्याच वर्णात,वर्गात समाविष्ट का करत नव्हता, आज अस्पृश्यांना IAS, IPS, पोलिस अधिकारी, प्रा. डॉ. इंजि. तहसीलदार, हे सगळे पद आरएसएस च्या समान नागरी कायद्यामुळे मिळाले की, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक समानतेच्या संघर्षमय लढ्यामुळे मिळाले...?
एवढं सोपं आहे आरएसएस च्या षडयंत्रकारी विचारांना समजणे , त्यामुळे आज जर स्वतःच्या पुर्वजांच्या अमानवी दुष्कृत्यावर पांघरूण टाकण्यासाठी त्यांची नवीन पिढी स्वतःचा मेंदू वापरत असेल, पैसा वापरत असेल, नोकरी व्यवसायातून वेळ काढून त्यांचं संघटन वाढवत असेल, तर आपण स्वतःला आंबेडकरवादी म्हणविणारे का अंधारात चाचपडत आहोत आजही.....? आम्ही शिकलो नाही...? आम्ही नोकरी उद्योगधंदे करून मोठे लखपती, करोडपती श्रीमंत झालो नाही....? झालो सगळं झालो....! ते - ते सर्व आम्ही मिळवलं जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं, पण सगळं मिळविल्यावर आम्ही मात्र सोयीस्कर जाणिव विसरलो, आणि आपल्या स्वार्थापायी आपल्या बापाच्या वैचारिक चळवळीपासून लांब जावून आपल्याच सत्यानाशाचे कारण ठरलो आणि ठरत आहोत, आमच्या विवेकबुध्दीचा आम्ही वापर करणे बंद केले किंबहुना आम्ही त्या बुध्दीचा फक्तं स्वतःच्या स्वार्थापुरता वापर करण्यात गुंतलो, एकीकडे बाबासाहेबांचे गरीब - अशिक्षित पण एकनिष्ठ अनुयायी बाबासाहेबांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी तन - मन - धन अर्पण करून समाजासाठी रस्त्यावर उतरून मनुवाद्यांशी दोन हात करायला सदैव तत्पर असतात तर दुसरीकडे आपल्या न्याय्य हक्क अधिकारांना वाचविण्यासाठी, मनुवादी सरकारांच्या विरोधात आंदोलन मोर्चे काढून अंगावर पोलिसांच्या लाठ्या झेलून अंगावर केसेस लावून घेतात आणि वर्षानुवर्षं कोर्टाच्या पायऱ्या चढत असतात, त्या स्वतःसाठी नाही तर बाबासाहेबांच्या त्या समाजासाठी, जो आजही मनुवाद्यांच्या षडयंत्राखाली गुलामीचं हीन आणि लाचार जीवन जगत आहे, पण आमचा शैक्षणिक तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेला बांधव बाबासाहेबांच्या चळवळीसाठी आणि बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून आंबेडकरी चळवळ सक्षम करण्यासाठी पुढे येवून कोणत्याच प्रकारचं सहकार्य करतांना दिसत नाही, आणि केलंही तर फक्तं समाजावर उपकार केल्यासारखं नावासाठी करतांना दिसतात, तेव्हा बाबासाहेबांच्या वैचारिक मानवतावादी चळवळीचा समतेच्या लढ्याचा रथ पुढे नेण्यासाठी निस्वार्थीपणे शिकल्या सवरल्या नोकरधारी वर्गाने समोर येणे गरजेचे आहे, त्याचबरोबर आरएसएसच्या सगळ्या उघड आणि छूप्या कट - कारस्थानांना समजून घेण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करणेही तितकेच महत्वाचे आहे, आरएसएसच्या कोणत्याही विचारांचं समर्थन करण्यापूर्वी आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळात जगणाऱ्या बाप- दाद्यांवर ब्राम्हणांनी केलेल्या अत्याचारांना एकदा आठवून बघायचं, उत्तर नक्कीच मिळेल, आणि त्या अत्याचारातून संपूर्ण मुक्ती मिळवायचीअसेल तर त्यासाठी राजकीय शक्ती उभी करणेही तितकेच महत्वाचे आहे, ती राजकीय शक्ती आद. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सशक्तपणे उभी राहत असतांनाच आपल्यातीलंच घरका भेदी, स्वतःला आंबेडकर घराण्याचा वारस सांगणाराच, ह्या बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय शक्तीला मनुवाद्यांच्या गळाला लागून तोडू पाहत आहे, आतापर्यंत ४९ गटं RPI च्या नावाने अस्तित्वात असतांना ५० वा गट फक्तं कॉंग्रेसच्या दावणीला बांधून घेण्यासाठी राजरत्न आंबेडकर नावाच्या एका तोतया वारसाने निर्माण करून, आंबेडकरी चळवळीची उरली सुरली लक्तरे फाडण्याचा निंदनीय प्रकार सुरू केला, त्यापासून सुज्ञ आंबेडकरी अनुयायांनी जागृकतापुर्वक विचार करूनच राजकीय नेतृत्व आणि पक्ष बळकट करावा, आणि खऱ्या अर्थाने संविधान वाचविणारा आपला हक्काचा वंचित बहुजन आघाडी, हा पक्ष सत्तेत पोहोचवून आद. बाळासाहेब आंबेडकरांना शक्ती प्रदान करावी, नाही तर संविधान वाचविण्याच्या नावाखाली, सत्तेत जावून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या SC ST च्या वर्गवारी च्या निर्णायाची अंमलबजावणी करण्याचा नालायकपणा करणाऱ्या कॉंग्रेसच्या नादी लागून पुन्हा स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेणार....!!! आंबेडकरी अनुयायांनी जागे होऊन निर्णय घेणे गरजेचे आहे,
क्रांतिकारी जयभीम 🙏🏻🙏🏻🙏🏻
"बंडखोर"
सतिशदादा इंगोले
संस्थापक अध्यक्ष
भारतीय संविधान सुरक्षा दल
मो. 8432439494
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत