येत्या दोन महिन्यात महाराष्ट्रात आमदार भरती जाहिरात २०२४ ते २०२९ निघणार आहे..
महाराष्ट्र विधानसभेत आमदार पदाच्या २८८ जागा त्वरीत भरणे आहेत,
सुवर्ण संधी–
आपली वाट पाहात आहे,
फक्त ५ वर्ष जाॅब करा, आयुष्यात परत कधीही काम करायची गरज लागणार नाही,
कोणत्याही अनुभवाची गरज नाही,
अशिक्षीत असलात तरी चालेल,
कोणताही गुन्हा केलेला असेल तरी चालेल,
कामकाज नाही केले तरी चालेल,
अनुभवाची गरज नाही,
कार्यालयात उपस्थित राहिला नाहीत तरी ₹ १,९०,०००/- पगार,
राहणे साठी मोफत निवास स्थान मिळेल,
कॅंटीन मध्ये स्वस्तात जेवण फक्त २०/- रूपये,
फोन साठी १५०००/- भत्ता,
विनामूल्य ३ टेलिफोन,
५०००० युनिट्स मोफत वीज,
४००० लिटर पाणी फुकट,
कुटुंबासह ३४ हवाई प्रवास विना मूल्य,
मोफत पेट्रोल,
पहिल्या एसी मधील अमर्यादित ट्रेन प्रवास किमान ५ वर्षांसाठी,
एक दिवस जरी आमदार म्हणून राहिले तर जुनी पेंशन योजना भेटणार हमखास,
प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी ₹२००० अतिरिक्त पेंशन,
कपडे धुवायला रोज ६०० रूपये,
रोजचा भत्ता रू २०००,
फर्नीचर साठी एक लाख रुपये,
ऑफिस खर्च ६०,०००/- महीना तसेच
इतर अनेक फायदे!
निवड प्रक्रिया सप्टेंबर २०२४ पासून सुरू होईल,
अंतिम यादी तयार होईल,
आमदार व्हा — आपल्या बरोबरीने आपल्या नातू पणतू यांचे पण भविष्य उज्वल करा,
आपण जनतेचे काम कराच अशी काही अट नाही,
आपले व आपल्या नातेवाईकाची कामे केली तरी चालेल.
आणि त्यातून वेळ मिळालाच तरच जनतेच्या अडचणींचा विचार करा..
जनहितार्थ..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत