वेगळी संस्कृती व धर्म हवा–विनायकराव जामगडे
जो समाज ब्राह्मणी वर्चस्वानी पूर्णपणे गुलाम झालेला आहे. ज्यांना स्वतःबद्दल जाणीव नाही ज्याला परंपरेने चालत आलेले खरे वाटते. नव्हे त्याची अढळ निष्ठा आहे समाज अजगर समान थंडगार पडलेला आहे पिढ्यानपिढ्या संस्कारीत असलेल्या समाजात जनजागृती करणे त्यास आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणे हे फार कठीण काम आहे . एकीकडे लोकात मोठ्या प्रमाणात धार्मिक उन्मादाचे वातावरण पसरविले जात आहे.बहुजनला हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली एकत्र करून त्यांना
त्याच अवस्थेत राहण्यास बाध्य करीत आहेत प्रसिद्धीची सर्व माध्यमे त्यांना साथ देत आहेत देशात हिंदू हाच प्रमुख धर्म असून त्यांचेच राज्य देशावर असले पाहिजे. बाकीच्यांना हिंदू मोठा भाऊ असल्यामुळे ते जे सांगतील त्याचे अनुकरण करावे. आपल्या बुद्धीचा वापर करू नये स्वतंत्रपणे विचार करून या देशात सर्वांना समान वागण्याची जी संधी राज्य घटनेने दिली आहे.तीचा उपयोग करु नये
त्यासाठी प्रयत्नशील असून तशी मानसिकता निर्माण करून बहुजन समाज गुंगीत ठेवीत आहेत.
कांचीपुरम च्या पिठाच्या शंकराचार्य अनेक असंवैधानिक कार्यात गुंतुन लक्षन ब्राह्मण समाजाच्या शंकराचार्य ह्या व्यवस्थापकास आपले ऐकत नाही ; पितळ उघडे पाडण्याची धमकी देतो. वरिष्ठाकडे तक्रार करतो त्याचा खून केला गेला. संशयित आरोपी म्हणून शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना भारतीय दंड संहितेनुसार अटक केली. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंगाची लाहीलाही झाली व हा संपूर्ण हिंदू धर्मावरच घाला पडलेला आहे हिंदू धर्म धोक्यात आला आहे अशा प्रकारच्या वल्गना करून देशात दुषीत वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करीत होते. वास्तविक कायद्यासमोर सर्व समान आहेत एकदा गुन्हा सर्व सामान्य माणसाने केला असेल तर त्याला ज्या पद्धतीने वागविले त्याचप्रमाणे एखाद्या प्रमुखाला वागविले तर त्यात बिघडले कुठे तसेही शंकराचार्यां करिता त्याचा स्वयंपाक करण्याकरिता ब्राम्हण व्यक्तीची नियुक्ती कैली होती. त्यांच्या आवडीनुसार भोजन दिल्या गेले त्यांना संपूर्ण धर्मविधी करण्याची मोकळीक दिली पूजा अर्चना करण्याची मुभा दिली तरी त्यांचा छळ झाला अशा प्रकारच्या अफवा पसरवून समाजाचीदिशाभुल केली सर्वसामान्य माणसाला पोलीस अशी वागणूक देतात काय ॽ सर्वसामान्य माणूस या देशाचा नागरिक नाही काय ॽ त्याला भारतीय घटनेने अधिकार दिलेले नाही का ॽ मग एकाला विशिष्ट सेवा व गरीबमाणूस असेल तर त्याला दुसरी वागणुक हा कायद्यासमोर समान न्याय झाला काय ॽ माणुस गरीब असेल त्याला प्रतिष्ठा नसेल व त्यांच्याजवळ आपल्या विरूद्ध लावलेल्या आरोपासऺबऺधी कायद्याची बाजु लढणारा सक्षम वकील ठेवण्याची कुवत नसेल तर तो गुन्हेगार नसूनही त्याला शिक्षा भोगावी लागते. परंतु संपत्ती व प्रतिष्ठेच्या जोरावर गुन्हा करून ही मोकळे सुटतात. ज्या पद्धतीने शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांना अटक झाली त्याविरुद्ध वातावरण तयार करून धार्मिक भोळ्या अनुयायास प्रोत्साहित केल्या जात होते त्यासाठी समाजातील प्रतिष्ठीत न्याय विधीचा उपयोग केला जात होता.राजकिय पुढारी ह्या कामात पुढाकार घेऊन शासन यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होते् खोट्या आरोपात फसविले असा कांगावा करीत होते. तर तामीळनाडुच्या माजी मुख्य मंत्री पोलीसाजवळ सबळ पुरावा असल्याचे सांगत होते. झालेली अटक कायदेशीर असल्याचे सांगत कोर्टानी दोन महिने जमानत होऊ दिली नाही म्हणजे कोर्टासमोर निश्चितच पुरावे असले पाहिजे.कायदयाने होत नाही त्यासाठी झुंडशाही करून समाजात वातावरण गडुळ करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
बहुजन समाजाला याची जाणीव झाली असल्यामुळे तो या आंदोलनात भाग घेत नाही तर तटस्थपणे पाहत आहे. हेच ब्राम्हणवादयाना सलत आहे.आम्ही हुकुम दिला. पिठाच्या शंकराचार्यांलाअटक होते तरी हा बहुजन समाज रस्त्यावर येत नाही जाळपोळ करत नाही.आत्महत्या करीत नाही यांचा संताप त्यांना येत आहे म्हणून ते नेहमी आरोळ्या फोडण्याचे काम करीत आहेत.मोठमोठया वल्गना करीत आहेत.खोटया अफवा पसरवित आहेत. तुरूंगात असताना शंकराचार्य यांना मादक द्रव्य पाजल्याचे भारताचे माजी मानव संसाधन मंत्री रा.स्वयं संघाचे एकनिष्ठ कार्यकर्ते व भाजपाचे माजी अध्यक्ष प्रा. मुरली मनोहर जोशी सांगत सुटले.तरी बहुजन समाज उठत नाही.याचा अर्थ बहुजन समाजावर असलेली पकड ढिली झाली आहे.याची जाणीव होत आहे म्हणून ते पिसाळलेल्या गत वागत आहेत.हा बहुजन समाज आपल्या आवाक्याबाहेर गेला तर आपले कसे होईल याची चिंता त्यांना सतावित आहे.. म्हणून परत राम मंदिराचा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न करीत आहे शंकराचार्यांचा मुद्दा घेऊन धार्मिक भावना भडकतील अशा प्रकारचे आंदोलन दक्षिण भारतात करण्याचा प्रयत्न करीत आहेत.ज्यादक्षिण भारतानी ब्राम्हण वर्चस्व झुगारले आहे . त्यांना संपुर्ण देशात भटकंती करण्यास भाग पाडले त्यांना दक्षिण भारतात आपल्या बळावर राज्य करू दिले नाही. त्याचा वचपा काढण्याचा शंकराचार्यचा अटकेचा प्रचार करून प्रयत्न करीत आहे. दक्षिणेतील जनता सुजान आहे. त्यांना खरे खोटे काय आहे ते कळते.पेरियार रामास्वामी याची चळवळीचे मूळ खोलवर रूजले आहे.राजकिय भांडणे काही असले तरी ब्राम्हणी चाल ओळखण्या इतके सूज्ञ ते नक्कीच आहेत.ब्राम्हणी चालीची डाळ शिजू देणार नाही.म्हणून ब्राम्हण मुख्यमंत्री असून सुद्धा ती उघडपणे भुमीका घेऊ शकली नाही.कारण तामीळनाडु जनतेच्या तीव्र भावना असून जनतेची मागणी असल्यामुळे जयललीता आपला पक्ष सांभाळण्यासाठी शंकराचार्यांच्या विरूद्ध उभी ठाकली. जनचळवळीचा प्रभाव आहे.
आता शिवधर्म स्विकारण्याचा सोहळा संपन्न एरवी ज्या समाजाने ब्राह्मणी गुलामी स्वीकारली होती. आपल्या डोळ्यांवर झापडे बांधली होती. त्यातील सुजाण लोकांनी त्याविरुद्ध आवाज बुलंद करून शिवाजी महाराजांची मातोश्री जिजामाता यांच्या जन्म दिवसाच्या मुहुर्त साधून बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे मोठ्या प्रमाणात सुशिक्षित अधिकारी विचारवंतांनी शिवधर्माची स्थापना करून ब्राम्हणी धर्माला धक्का दिला. बहुजनातील सधन असलेल्या वर्गानी जर प्रामाणिकपणे ब्राम्हणी धर्माची शवचिकित्सा करून त्याचे रूप समाजासमोर आणने अत्यंत आवश्यक आहे. ती जनमानसात रूजली पाहिजे नाही तर काही लोक सोडुन गेले त्याचा परिणाम होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १४/१०/१९५६ ला बुद्ध धम्म स्वीकारला. त्यावेळी अशिक्षित , ज्यांनी पिढ्यांनी पिढ्या देवधर्म पुजण्यात बर्बाद केला. धर्मानुसार आचरण करण्यात आपले आयुष्य संपविले.त्यांनी एकाक्षणात बाबासाहेबांचा आदेश म्हणुन देव घराबाहेर फेकले.कोणतीही हिन्दु पध्दतीचा स्वीकार करण्यास नकार दिला आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता बहिष्कार अन्याय अत्याचार सहन केला परंतु हिंदू देवतेचा व पद्धतीचा त्याग केला. आपली विहारे वेगळी बांधुन व भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेबांचे पुतळे उभारून आपली वेगळी संस्कृती उभी केली. गावा गावात भजन मंडळी निर्माण केली. आपले उत्सव वेगळे साजरे केले. प्रबोधनाची सतत चळवळ राबवित आहे.काही विकृत्या आल्या असतील तरीही ब्राम्हणी संस्कृती विरूद्ध लढण्याची पूर्ण तयारी आहे.बाम्हणी गुलामी विरूद्ध लढणाऱ्याचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत.
ह्या देशातील बहुजन समाजानी दलीत समाजाकडे दोस्त म्हणून पाहिले पाहिजे कारण साऺस्कृतीकदृष्टया दोघेही गुलाम आहेत.ब्राम्हणी गुलामी विरूद्ध लढणाऱ्याचे स्वागत करण्यास उत्सुक आहेत.
ब्राम्हीणी जोखड फेकण्यास बहुजनांनी पुढाकार घ्यावा.ब्राम्हीणी व्यवस्थॆने जे जाती जातीत विभागुन एकमेकांपासून तोडण्याचे काम केले.एक जात दुसऱ्या जातीपेक्षा वरचढ आहे.ही जातीयतेची उतरंड केली आहे. तीला सुरंग लावणे आवश्यक आहे केवळ व्याख्यानात लेखनापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृती होणे आवश्यक आहे.ज्यानी ज्यानी ब्राम्हणी संस्कृती विरूद्ध दंड थोपटले आहे.त्यानी आपल्या संघटने मार्फत जे ब्राम्हणी धर्माचे भक्ष्य ठरले आहे.अशा सर्व जातींना एकत्र आणून त्यांना समदुखाःची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे.केवळ उच्च वर्ग मध्यम वर्गापुरती ही चळवळ न राहता जनसामान्यांची चळवळ होणे आवश्यक आहे.वरच्या जातीच्या लोकांनी सामुहिक रित्या तीचा अंगिकार केला तरच उपयोग होऊ शकते अन्यथा त्यांचा काही एक फायदा होणार नाही उलट ते आपल्या ध्येयाप्रती सजग असल्याची खात्री होईल व आपणांस बुद्धीभेदाच्या चक्रव्युहात अडकविल्याशिवाय राहणार नाही .आपली संस्कृती ही वेगळी असली पाहिजे त्याचे रितीरिवाज नाकारण्याची प्रामाणिक इच्छा असली पाहिजे तरच ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध लढणे शक्य होईल ह्या दृष्टीने विचार होऊन कृती होणे अत्यंत गरजेचे आहे.
समाजातील सर्व शोषित जातीनी एकत्रपणे यांच्यावर विचार करून बहुजन समाजाची संस्कृती सिंधु संस्कृती बळी राजा उत्सव अब्राम्हणी परंपरांचा स्विकार करून आपली सांस्कृतिक ओळख करून ती संस्कृती प्रस्थापित करून समविचाराच्या लोकांसोबत एकत्र येणे काळाची गरज आहे.
विनायकराव जामगडे ९३७२४५६३८९
७८२३०९३५५६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत