आरोग्यविषयकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
Food Terrorism is the silent killer in India.
प्रा. डॉ. आर.जे. इंगोले
कोल्हापूरचे संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराज एका ठिकाणी म्हणाले होते की, “ जर ब्राम्हण एखाद्या गोष्टीला चांगलं म्हणत असेल तर काहीतरी गडबड आहे म्हणून समजा.” हे छत्रपती शाहू महाराज यांचे वाक्य आपल्याला खूप कांही सांगून जाते आणि आपल्याला किती सावध असले पाहिजे याची जाणीव सुद्धा करून देते. पण हीच गोष्ट आपल्या अनेक विद्वान आणि विचारवंत लोकांना समजली नाही आणि त्यामुळे ते फसतात आणि आपल्या समाजाला सुद्धा फसवतात. मागे कांही वर्षापूर्वी साहित्यातील एक पुरस्कार होता आणि तो ब्राम्हणमान्यता असलेल्या विद्येची देवता सरस्वतीच्या नांवे होता इतर साहित्यिक आणि विचारवंत यांनी स्वीकारला पण आदरणीय प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांनी नाकारला पण आता हा सावधपणा सर्वांमध्ये येत नाही. कारण हे ब्राम्हण लोकांच्या गोड बोलण्याला आणि षडयंत्राला बळी ठरले. ब्राम्हण ही जगातील अशी एकमेव जात आणि की, ते आपल्या समोर एक बोलतात आणि त्याचा खरा अर्थ दुसराच असतो आणि दूसरा अर्थ समजण्यासाठी त्याला एक वेगळे कौशल्य आणि बुद्धिमत्ता लागते. यापेक्षा महत्वाचे म्हणजे आपल्या महापुरुषांच्या विचाराशी पक्की बांधिलकी लागते.जर आपण पैसा ,पद आणि पोरगी यापैकी एखाद्याला जरी बळी पडलो तर मग आपला आणि आपल्याकडुन अपेक्षा ठेवणार्या समाजाचा अपेक्षाभंग होतो हे निश्चित आहे . ब्राम्हण लोकांनी पूर्वीपासून भारतीय समाजात एक विशिष्ट भीती निर्माण करून त्यांचे वर्चस्व समाजावर कसे निर्माण होईल याची पूर्ण दक्षता घेतली आहे. आणि त्यामुळे सांस्कृतिक दशहतवाद त्याचे एक साधन आहे आणि या लेखात आपण जो विषय घेतला आहे त्याचे शीर्षक आहे food Terrorism म्हणजे अन्नाचा दशहतवाद. लोकांना असे वाटेल की, असा कुठे दशहतवाद असतो का ? पण हे सत्य आहे म्हणजे आपल्या बहुजन समाजाला पोषक अन्न नाही मिळाले पाहिजे. आता हा लॉन्गटर्म परिणाम करणारा घटक आहे. यात ते एक तर आपल्या बहुजन महिलांना महिन्यातील अनेक कारणे सांगून उपवास करायला लावतात आणि आपल्या महिला धर्मवेडया असल्यामुळे अनेक दिवस उपाशी राहतात. याचा परिणाम असा होतो की, त्यांना होणारी मुले कमी वजनाची आणि कमजोर होतात आणि एकदा मूल कमजोर झाले की, मग पुढे त्याच्या बुद्धीचा विकास होत नाही आणि हा विकास होऊ नये आणि आपल्या समाजात कोणी विद्वान होऊ नये हे त्यांचे मोठे षडयंत्र आहे. आणि उपवासाला असणारे पदार्थ सुद्धा पोषक नसतात एक तर साबुदाणा सारखे पदार्थ पचायला जड आणि आरोग्याला घातक आहेत ते यांनी खाण्यास सांगितले आहेत. आणि दूसरा मोठा प्रॉब्लेम म्हणजे श्रावण महिना, ,शनिवार ,सोमवार,शुक्रवार आणि इतर अनेक प्रसंगी मांसाहार करू नये असे ब्राम्हण सांगतात. यामुळे आपले बहुजन आर्थिक कुवत असूनसुद्धा कमजोर होतात आणि त्यामुळे पुढील पिढीत कोणी धाडसी आणि बुद्धिमान होऊ नये असे यांचे षडयंत्र आहे. आणि २०१४ नंतर तर अनेक कारणे सांगून या बहुजन समाजाला जास्तच मानसिक गुलाम केले आहे.
२०१५ यावर्षी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार ज्या व्यक्तीला मिळाला त्या व्यक्तीचे नांव डॉ.डटेन त्यांनी भारतातील वास्तव जगासमोर मांडले आणि ते वास्तव म्हणजे भारतातील लोकांच्या उंचीचा त्याने अभ्यास केला आणि असा निष्कर्ष काढला की, आपल्या देशातील लोकांची ऊंची साधारण ५.६ फुटापेक्षा कमी असण्याचे कारण आपला DNA नसून आपल्या लोकांना पोषण आहार मिळत नाही हे आहे. आणि त्यावर त्यांनी “ The Great Indian Poverty’ या नांवाचे पुस्तक लिहले आहे. याचा अर्थ आपल्या देशात अनेक पिढयापासून आपल्याला मानसिक आणि शररीरिक कमजोर करण्याचा प्रयत्न या ब्राम्हणी व्यव्यस्थेने सुरू केला आहे. देशात खाजगीकरण १९९१ ला झाले आणि यामुळे सामान्य जनता यांचे शिक्षण आणि नौकर्यातील आरक्षण बंद झाले. यामुळे मग रोजगार कमी झाला आज आपण जर पाहिले तर वंचित घटक खूप हलाखीत जीवन जगत आहे. कुठे तरी कंत्राटी कामगार म्हणून दहा –वीस हजार रुपये महिना यावर त्याची गुजराण करीत आहे. आणि मग मुलांचे शिक्षण ,अरोग्य सुविधा ,पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक बाबी या दुर्मिळ झाल्या आहेत. आणि परत देव आणि धर्माच्या आड आपल्या बहुजन समाजाचे शोषण चालू आहे. यात आंबेडकरी समाजाने थोडी प्रगती करण्याचे कारण त्यांनी हिंदू प्रथा ,देव आणि कर्मकांड १४ ऑक्टोबर १९५६ लाच नाकारले आहेत. आणि त्यामुळे मग इतरांना हे डोळ्यात सलत आहे. आज आपल्या बहुजन समाजाच्या डोक्यात हे फिट बसवले आहे की, ब्राम्हण हे श्रेष्ठ असतात. याबद्दल एक विश्लेषण असे आहे की, पांडुरंग वामन काने याने एक पुस्तक लिहले “ धर्मशास्त्राचा इतिहास ” या पुस्तकाच्या लेखणाबद्दल त्यांना भारतरत्न ही पदवी मिळाली. त्यांचे हे पुस्तक लिहण्याचे काम 55 वर्ष चालले आणि पाच खंडात हे पुस्तक पुण्याच्या भांडारकर संस्थेने ते प्रसिद्ध केले. या पुस्तकात पांडुरंग काने असे म्हणतात की, “ संपूर्ण जग देवाच्या सत्तेखाली आहे. सगळ्या जगावर देवाची सत्ता चालते. देवावर मंत्राची हुकूमत आहे. मंत्र देवापेक्षा मोठे आहेत, आणि मंत्र ब्राम्हणाच्या ताब्यात आहेत.” म्हणजे विचार करा अगोदर सर्व सांगितले आणि शेवटी सर्वांच्या वर ब्राम्हण नियंत्रण करणारा आहे. एका बाजूला लोकांना सांगायचे की, हे जग ब्रह्माने उत्पन्न केले आहे आणि दुसर्या बाजूला सर्वात वर ब्राम्हण आहे. यालाच म्हणतात ब्राम्हणी कावा आणि हा कावा आपल्या बहुजन समाजाच्या लक्षात आला नाही. याचा अभ्यास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता आणि म्हणून १९३५ ते १९५६ या २१ वर्षात भारतातील सर्व धर्म ग्रंथांचा अभ्यास करून मग शेवटी त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह नागपुर येथे बौद्ध धम्म स्वीकारला. आणि त्याप्रसंगी त्यांनी एक वाक्य म्हटले होते की, “ आज मी नरकातून मुक्त होत आहे.” म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्माचा किती खोलवर अभ्यास होता आणि दुसरे म्हणजे या धर्माने किती त्रास दिला होता याची आपणास कल्पना येईल.त्यामुळे आज सर्व बहुजन समाजाने या धर्मात असणार्या निरर्थक बाबी वर लक्ष देण्यापेक्षा आपली आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती करावी. आज आपले बहुजन तरुण अनेक देव देवताच्या नांवे पायी यात्रा काढतात आणि त्यांना पाहिल्यावर असे वाटते की, हे पक्के हिंदू धर्माचे मानसिक गुलाम झाले आहेत. म्हणजे पायी जात असतांना काही जुलै औगष्ट सारख्या पावसाळ्यात या यात्रा असतात. आणि मग पाऊस ,वादळ अशी स्थिती असतांना कुठे यांना जेवण मिळणार या सर्व बाबी अनिश्चित आहेत. आणि यांनी हा विचार केला पाहिजे की, आपण या यात्रा काढल्या पाहिजे असे सांगणारे लोक कोणीही असतील तर त्यांची मुले या यात्रेत आपल्या सोबत का नाहीत ? याचा विचार केला पाहिजे. आणि अशा अनेक बाबी आहेत की, आपल्याला प्रथा ,परंपरा सांगणारे लोक म्हणजे भटजी असतात आणि त्यांची मुले अशा कार्यक्रमात कधीच नसतात. याचा विचार पण केला पाहिजे. म्हणजे अनेक धार्मिक स्थळी अनेक विधी आपले बहुजन लोक करतात पण जे विधी करणारे आहेत त्यांनी कधी स्वत: विधी केले आहेत का ? हा प्रश्न आपणास पडला पाहिजे. बहुजन उपास करतता , पायात चप्पल घालत नाहीत , अशाने आपले बहुजन एक तर शारीरिक कमजोर होतात. मानसिक गुलाम होतात आणि आपण जे महत्वाचे काम आहे आणि ते म्हणजे शिक्षण ते आपण करीत नाही. आणि यांचा उद्देशच आहे की, आपले बहुजन तरुण शिकले नाही पाहिजे कारण शिक्षण हे व्यवस्थेला प्रश्न विचारण्यास भाग पाडते. आणि त्यामुळे हे मोफत रेशन देतील ,अनेक योजना आणतील , जसे आता महाराष्ट्रात लाडकी बहीण सारखी फसवी योजना सुरू केली आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला १५०० रुपये महिना द्यायचा आणि तिच्या मुलीवर म्हणजे यांच्या भाचीवर शाळेत अत्याचार होतांना बघ्याची भूमिका घायची असा कोणी मामा असेल का ? म्हणजे हे सर्व नाटक आहे आपल्याकडुन मते घेण्यासाठीचे हे आता स्पष्ट झाले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जे वित्त सचिव असतात त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, हे आपल्या राज्याला आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. आणि आताच CAG ( Comptroller and Auditor General of India ) सारख्या संस्थेने आपल्या राज्यावर झालेल्या कर्जाचा बोजा यावर कडक ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे अशा फसव्या योजना आपल्याला अपंग बनवतात. अशा योजनापासून आपण सावध असले पाहिजे. आज आपल्या देशात करोडो लोक आहेत की, ज्यांना दोन वेळचे जेवण मिळत नाही हा वास्तव सर्वे आहे. आणि आपण इकडे शक्तीशाली भारत ,आणि विश्वगुरू सारख्या घोषणा करीत आहोत ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. म्हणजे इकडे लोकांना भावनिक आवाहन करायचे आणि दुसरीकडे समाजाची लूट करायची हे धोरण आहे. म्हणजे घोषणा भ्रष्टाचार मुक्त भारत असे म्हणायचे आणि आज आपण काय पाहत आहोत की, संसद भवन गळत आहे , राम मंदिर गळत आहे ,समृद्धी महामार्ग हा पूर्ण होण्याच्या आधीच त्याला तडे गेले आहेत आणि आता मालवण मधील छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा 36 हजार कोटी खर्च करून उभा केलेला पुतळा अचानक कोसळला आता याला काय म्हणावे ? आणि ज्याने हे काम केले तो फरार आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र उभा केला ,स्वराज्य निर्माण केले त्यांनी कधी सांगितले का मावळ्यांना उपास धरायला आणि असे विधी करायला सांगितले होते का ? कधीच नाही उलट अशाने मावळे कमजोर झाले असते. आणि असे नारायण नागबली आणि इतर विधी करायला त्यांना वेळ होता का ? आणि जेंव्हा प्रतापगडावर अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा महाराजावर वार करण्यास पुढे आला तेंव्हा तेंव्हा छ्त्रपती शिवाजी महाराज त्याला ब्राम्हण आहे म्हणून सोडले नाही तर, “ ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा बाळगतो.” असे म्हणून एका कुलकर्णीचे दोन कुलकर्णी केले आज कोणता मावळा आहे अशी हिंमत करणारा ? आज सर्व मावळे या ब्राम्हण समाजाचे ताब्यात आहेत. त्यांचा एक शब्द टाळत नाहीत. त्यांच्या आदेशाने सर्व कार्य पार पाडतात. आज आपल्या देशात आणि राज्यात जे सरकार चालले आहे त्याचे नियंत्रण व्हाया दिल्ली ते नागपुर असे आहे. त्यामुळे आपण सावध असले पाहिजे. या आधुनिक पेशवाईला रोखले पाहिजे आणि हे आपल्या प्रत्येक शिवराय आणि भीमराय यांच्या अनुयायाचे प्रथम कर्तव्य आहे. आपणच आता पुढाकार घेऊन आपल्या बहुजन समाजाला एकत्र घेऊन ही सामाजिक लढाई जिंकावी लागेल. आता आपल्या महापुरुषांचा लढा पुढे न्यावा लागेल. म्हणजे आपले सर्व महापुरुष आणि समाजसुधारक जर आपण पाहिले तर चार्वाक पासून आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्व वेगवेगळ्या काळात जन्मले आणि त्यांनी त्यांचे समाजासाठीचे कार्य केले आणि त्यांचे विचार एक होते. म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराजांना कधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी पाहिले नाही कारण कालावधी वेगवेगळा आहे पण भारताचे संविधान लिहताना छ्त्रपतींचे स्वराज्य त्यांच्या डोळ्यासमोर होते. त्यांचे गुरु तथागत बुद्ध यांना कधी पाहिले नाही पण लोकशाहीची संकल्पना त्यांनी बुद्धापासून घेतली आहे. महात्मा फुले आणि संत कबीर हे त्यांचे दोन गुरु पण त्यांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काळ वेगवेगळा आहे पण एकत्र बांधण्याचे काम विचार करीत असतात. आज सुद्धा आपल्या देशात अनेक विचारवंत आहेत कधी ते भेटले नाही पण विचारामुळे ते एक आहेत. आणि आपल्याला या भटा विरोधात लढाई करण्यासाठी सुद्धा सर्व बहुजन समाज एकत्र यावा लागेल मग आपली लढाई अशक्य नाही. ब्राम्हण आपल्यात अनेक कारणाने फुट पाडतात. आणि म्हणून ते राज्य करतात. यापैकी एक म्हणजे आपल्यावर असणारा हिंदू (वैदिक) धर्माचा पगडा हे आहे. त्यामुळे मेंदू आपला असतो पण आपण निर्णय मात्र ब्राम्हणांच्या मेंदूने घेतो. आणि इथेच आपली चूक झाली आहे. ब्राम्हण सांगतात उपवास धरा आपण धरतो ,ब्राम्हण सांगतो पुजा करा ,ब्राम्हण सांगतो नागबली करा ,ब्राम्हण सांगतो सत्यनारायण करा असे अनेक विधी आपण करतो कारण आपला मेंदू आपण वापरत नाही. भारतात तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन असा एकमेव मुख्यमंत्री आहे की, त्यांनी त्यांच्या राज्यात जे मंदिरात पुजारी आहेत त्यात सर्व जाती आणि धर्माचे लोक काम करतील असा आदेश काढला आहे. राजकीय सत्ता सर्वात मोठी असते . भारतातील साधारण १० ते १२ मांदिरे अशी आहेत की, त्यांचे उत्पन्न आपल्या देशाच्या बजेटच्या पाच पट आहे. आणि ब्राम्हण समाजाची लोकसंख्या 3 टक्के आहे. पण आपण यांना हा पैसा दिला आहे. जर हाच पैसा आपण आपल्या देशातील गरीब जनतेला दिला तर आपल्या देशातील अनेक समस्या जसे शिक्षण ,आरोग्य, रस्ते ,पाणी , वीज ,रोजगार असे प्रश्न मिटतील आणि आपला देश जगात महासत्ता होईल. पण आपण आपला मेंदू जर आपले लोक वापरत नसतील तर मग असेच होणार आहे. देशातील अनेक मंदिरात पैसे मोजण्यासाठी माणसे बोलवावी लागतात आणि ते पैसे असे फेकतात की, असे वाटते एखादा शेतातील एखादा शेतमाल आपण फेकत आहोत. एवढा अमाप पैसा आपण वाया घालवत आहोत. एक तर सरकारने याचे राष्ट्रीयकरण करावे किंवा जनतेने हे दान बंद करावे. असे झाले तरच आपल्या देशातील बहुजन समाज पुढे जाईल आणि देशात आर्थिक आणि सामाजिक समानता येईल. पण यासाठी सरकार आपल्या विचाराचे असावे लागते. इथे आपलेच लोक प्रतींनिधी आहेत पण त्यांच्या डोक्यात मनुस्मृतीचे विचार आहेत. आज आपल्या अनेक बहुजन महिला आणि पुरुष यांना अनेक बाबा आणि माता यांच्याकडे दर आठ दिवसाला एक बैठक घेतात आणि त्यांच्या डोक्यात असेच समाज मागे नेणारे विचार भरवतात. पुढे मग हेच अनुयायी लोक त्या समाजविरोधी विचारांचा प्रसार समाजात करतात. त्यांनी असे अनेक शहरात केंद्र तयार केले आहेत. यासाठी या बैठका बंद करून आपल्या तरुण पिढीला आपल्या महापुरुषांचा इतिहास आपण सांगितला पाहिजे. आज समाजात आपले अनेक बहुजन लेखक आणि विचारवंत आहेत. त्यांची पुस्तके आपण आपल्या तरुणांना वाचायला दिले पाहिजेत. अनेक वैचारिक कार्यक्रमांना घेऊन गेले पाहिजे. असे म्हणतात की, “ पुस्तक वाचल्यावर मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाल्यावर माणूस कुठेही नतमस्तक होत नाही.” हे अभियान आपणास करावे लागेल. आणि आज कोकणात एक निवृत्त पोलिस अधिकारी मारोती काका जोशी हे समाजाला जागृत करण्यासाठी एक अभियान राबवत आहे आणि ते म्हणजे “ ब्राम्हण घरात घेऊ नका.” आता असे जर आपल्या देशात झाले तर पुढील काळात समाजात होणारा फार मोठा अनर्थ टळेल. आज समाज एका वेगळ्या मार्गाला जाण्याचे अवस्थेत आहे तो जाणार नाही. आज प्रत्येक भागात असे जोशी काका तयार झाले पाहिजेत. आपण सेवेतून निवृत्त झाल्यावर काय काम करावे याचे एक उत्कृष्ट उदाहरण हे आहे. आपल्याला ईश्वर या कल्पनेने आज सर्वात जास्त गुलाम केले आहे. यासाठी आपण चार्वाक ,बुद्ध ,संत गाडगेबाबा , संत कबीर , संत तुकाराम ,महात्मा फुले , आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर छ्त्रपती शिवाजी महाराज , छ्त्रपती संभाजी महाराज ,सावित्रीबाई फुले ,राष्ट्रामता जिजाऊ,माता रमाई, अहिल्याबाई होळकर यांचे विचार आणि कार्य तरुण पिढीला सांगितले पाहिजे म्हणजे पारायण खरं तर यांच्या विचार आणि कार्याचे झाले पाहिजे पण आपण हे कार्य सोडून काल्पनिक देव आणि अनावश्यक विधीच्या मागे लागलो आहोत. प्रसिद्ध हिन्दी साहित्याचे अभ्यासक आणि कवी हरिवंशराय बच्चन एका कवितेत असे म्हणतात की,
क्या बात करे इस दुनिया की, हर शख्स के अपने अफसाने है |
जो सामने है , उसे लोग बुरा कहते है , और जिसे देखा नही उसे खुदा कहते है ||
याबाबत आणखी एका ठिकाणी असेच म्हटले आहे की,
“ ईश्वर खरोखरच नाही हे कोणत्याही नास्तिकापेक्षा मंदिराच्या पुजार्याला जास्त माहीत असते.”
प्रा. डॉ. आर.जे. इंगोले
नाशिक ( 9423180876)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत