जागतिक रोगाचा जागतिक डॉक्टर, डॉ. भिमराव आंबेडकर..
अस्पृश्य समाजात भारतात डॉक्टर झालेले एकदम भारतात नंबर एक हुशार मुलगा म्हणजे, सुभेदार रामजी आंबेडकर यांचे पुत्र, यांनी तर आपल्या समाजाल्या लोकांना तोंडात बोटे घालायला लावले हे मात्र निश्चित केले, जेव्हा लंडनहून पत्राने कळविले होते तेव्हाच असे चर्चा सुरू होती, डॉ, बाबासाहेबांना पि, एच डी, डॉक्टरेट्स पदवी बहाल करण्यात आली, तेव्हा ता.८.६.१९२७, सालं होते, भिमराव आंबेडकर आपल्या मायदेशी परतले तेव्हा चाळीतल्या लाहान मोठ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला, काही आयाबायाला माहीत नव्हते, तेव्हा त्या आयाबाया म्हणतं होत्या आम्ही तर नविनच आयकत आहोत, हे डॉक्टर झाले म्हणून तेव्हा गंगाधर खुप सिरेश होता तेव्हा एक ख्रिश्चन महिला डॉक्टर होत्या त्यांना बाबासाहेब घेऊन आले? ख्रिश्चन बाई पाहुन आयाबाया कुजबुज करु लागल्या, माय यांना हे शोभते का व हेंच तर डॉक्टर झाले म्हण, मग या बाईला कशाले आनल आसनं, डॉक्टरने औषध लिहून दिले, डॉ, बाबासाहेब आंबेडकर बाहेर औषध आनन्यासाठी गेले की बाया आई रमाबाई जवळ गेल्या, आनं कशा म्हणतात का गं रमा, साहेब म्हणं डॉक्टर झाले, आनं ती बाई जातीची ना पातीची तिला घेऊन आले,
रमाबाई कपाळावर हात मारत म्हणाली, आवं आत्या, हे औषधाचे डॉक्टर नाहीत, बरं मग कशाचे डॉक्टर झाले, रमाबाई म्हणाली, आपल्या समाजात केवढा मोठा रोग पसरला कुणी कुणाला हात लावु देतं का, तुम्हीचं सांगा, किती दुरदुर करतात, ह्यो रोग नष्ट करायचे ते डॉक्टर झाले,आस्स व्हय, मग तर लई चोखटं व्हईन आपलं, काहीबी हो पण पुढचे लोक तर साबुद व्हतीलं ना, माणसावरच्या रोगावर आपल्या समाजात हेच तं अस्पृश्य निवारन रोगाचे डॉ,आंबेडकर झाले, पहिले लोक होते तुरळक डॉक्टर पण, बहुजनांच्या अंगनात उभे राहात नव्हते, आता बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि फुलेंच्या शिक्षणातून महिला पुरुष एका एका स्नायुचे डॉक्टर आज गल्लोगल्ली झाले आहेत, पण डॉक्टर जिवक आणि डॉक्टर यशवंत फुले यांच्या सारखे होने नाही, जसे की बुद्धाने जिवकला दिक्षा देऊन प्रवरजीत केले नाही,तु डॉक्टर आहे ना,मग समाजाची आणि भिक्षूची सेवा करत जा, कासीबाईचा पुत्र माहात्मा जोतिबा फुले यांचा दतक पुत्राला फुलेने डॉक्टर का केले, की बहुजनांच्या घरी कोणताच उचेवर्णीय डॉक्टर येत नाही, त्यांना हात लावत नाही, म्हणुन डॉक्टर केले, तेव्हा ते रोग्याच्या घरी जाऊन ते काळजी घेत होते, तेव्हा पासुन डॉक्टर रोग्याच्या घरी जाऊन उपचार करीत होते,
पण जसे जसे डॉक्टरांचे काॅम्पुटेशन सुरू झाले, तेव्हा डॉक्टरच्या दवाखान्यात उपचार घेत आहेत, कारणं इथे आता एकात्मता नांदत आहे,आज सर्व जातीधर्माचे डॉक्टर झाले आहेत,जर डॉक्टर ही पदवी डॉ, बाबासाहेबाने अंमलात आणली नसती तर, काय प्रस्थिती निर्माण झाली असती, हा आहे डॉ, बाबासाहेबांच्या शिक्षणाचा भारत, पण फुले शाहू आंबेडकर यांनी माणवाचे हितं केले त्यांची आठवण कुठे आहे, या थोर विभुतीचे विचार अंगीकारले तरच आपण आपली पुढें वाढणारी पिढी आणि परंपरा सुखकर होईल हिच अपेक्षा ठेवतो
लेखक : बबनराव मोरे समाज भूषण हिंगोली, प्रचारक, गौतम घंनसावंत, सिध्दार्थ खिल्लारे & ग्रृप ७२१८५०६४४६
दिनांक : २.९.२०२४ वेळ ६,३५ सकाळी
━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═━═
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत