महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बौद्ध धम्म विधी सोवळ्याचा विषय नसून व्यवस्था परिवर्तनाची चळवळ आहे:– प्रबुद्ध साठे

भाळवणी (करमाळा) :– बौद्ध धम्म हा भाषणाचा, नुसत्या प्रवचनाचा भाग नाही, तो आचरणाचा आहे, बौद्ध धम्माचे आचरण केल्यास माणसांना सुखाची अनुभूती येते, बौद्ध धम्म विधी सोवळे चा विषय नसून प्रचलित विषमता व ब्राम्हणी व्यवस्था परिवर्तनाची चळवळ आहे असे प्रतिपादन चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियान प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले, ते करमाळा तालुका येथील भाळवणी येथे बौद्ध धम्मातील श्रावणी पौर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते,, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला बौद्ध धम्म दिला, त्याचेच अनुपालन केले पाहिजे,

, पंचशील व बावीस प्रतिज्ञा चे अनुपालन केल्यास व्यवस्था परिवर्तनाची चळवळ गतीमान होईल, बौद्ध धम्मानुसार स्वतः मध्ये बदल करून समजात तसे परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित बौद्ध होणे व धम्म क्रांती होय असेही प्रबुद्ध साठे यांनी म्हटले,, यावेळी धम्म जागृती अभियान मधील बारामती, इंदापूर, माळशिरस, करमाळा, पंढरपूर, माढा, फलटण, दौंड कर्जत, माण खटाव इत्यादी तालुक्यातील उपासक उपासिका उपस्थित होते, याप्रसंगी पूज्य भन्तेजी कुलदीप (संभाजीनगर) , भन्तेजी कल्याणबोधी यांनी धम्मदेसना दिली,

आयु, दादा धेंडे यांनी श्रावणी पौर्णिमेचे आयोजन केले होते, सूत्रसंचालन मिलिंद मिसाळ गुरुजी यांनी केले, आभार हरी वाघमारे यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशालीताई धेंडे, महेश धेंडे, विशाल धेंडे, शुभम कडाळे भैरवनाथ धेंडे, कुणाल धेंडे, अण्णा वाघमारे, अजय पोळ यांनी प्रयत्न केले

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!