भारतीय संविधानाचे संरक्षण करणारा सक्षम व दूरदृष्टीचा बलशाली उमेदवार आसावा– एस के भंडारे
भारतीय संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हे मानवी मुल्य सर्व भारतीय नागरिकांना देऊन समानता प्रस्थापित करुन विषमता नष्ट केली. सत्तेच्या व बहुमताच्या जोरावर काही सत्ताधारी, राजकारणी , संविधान विरोधक यांनी संविधानाने दिलेल्या सामाजिक अधिकार , शिक्षण व नोकरीतील आरक्षण इत्यादीमुळे मिळालेले अधिकार ,उच्च पदे घालऊन पूर्वीप्रमाणे चातुर्वर्ण्य लागू करण्यासाठी २०२४ मध्ये संविधान बदलण्याचा , आरक्षण मुक्त भारत करण्याचे विरोधकांचे काम चालू आहे. त्यामुळे आरक्षण समर्थकांनी संविधान बदलू नये म्हणून सक्षम उमेदवार निवडून आला पाहिजे तो भारतीय संविधानाचा कवच म्हणून तत्पर तयार असायल हवा
छत्रपती शिवाजी महाराज , फुले , शाहू , आंबेडकर महामानवाच्या समतावादी विचार धारेच्या संविधान समर्थक जनतेने बहुजन समाजातील प्रत्येक घटकातल्या मानसाला कळायला हवं उमेदवार सक्षम व दूरदृष्टीचा बलशाली आसायला हवा तरच बाबासाहेबांच्या संविधानाकडे कुणाची बघण्याची हिम्मत करणार नाही आसे परखड मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख जनरल एस के भंडारे यांनी केले .
नुकताच उमरगा जि धाराशिव येथे भारतीय बौद्ध महासभेची जिल्हा कार्यकरणी तथा जिल्ह्यातील आंबेडकर प्रेमी जनतेची महत्व पुर्ण बैठक संपन्न झाली त्या वेळेस ते बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष सुरवसे हे होते
तर प्रमुख पाहुणे भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षा विजयमाला ताई धावारे , जिल्हा सरचिटणीस विद्यानंद वाघमारे , जिल्हा कोषाध्यक्षा राजश्री ताई कदम जिल्हा पर्यटन विभाग उपाध्यक्ष विश्वास भाऊ पांडागळे , जिल्हा कार्यालयीन सचिव दादासाहेब बनसोडे वंचितचे नेते रामचंद्र गायकवाड आर पी आयचे नेते हरिष डावरे , एस के चेले , बसापाचे चंद्रकांत कांबळे , सेवा निवृत्त मुख्याध्यापक कैलास गवळी , ॲड पांढरे , अविनाश भालेराव , राजेंद्र सुर्यवंशी , मविआचे दिग्विजय शिंदे , पत्रकार दिलीप सुरवसे , झुंबर गायकवाड , सारीका कांबळे , लता कोल्हे , अरुणा सुर्यवंशी , जिवन सुर्यवंशी , किरण कांबळे ,
आकाश गंभीरे , दयानंद कांबळे
दिलीप गायकवाड , बलभिम गायकवाड, जालिंदर कांबळे सह बौद्ध उपासक व उपासिका व समता सैनिक दलाचे सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी उमरगा विधानसभा उमेदवार समन्वय समिती गठीत करण्यात आली यामध्ये ॲड हिराजी पांढरे , चंद्रकांत कांबळे ,
रामचंद्र गायकवाड , विक्रांत सुर्यवंशी , ब्रम्हानंद गायकवाड विद्यादेवी कांबळे , उषा गायकवाड , लता कोल्हे , बाबासाहेब जानराव , विद्यानंद वाघमारे , अकारा गंभीरे जीवन सुर्यवंशी .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कांबळे शेवटी आभार किरण कांबळे यांनी मानले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत