बेझणबाग मैदानावर; आनंदाची कारंजी उडणार !

विख्यात वरिष्ठ पत्रकार माननीय रणजित मेश्राम सर…
बौध्दांतील तरुण उद्यमी नवनव्या झेप घेत आहेत. यातलाच एक कृतीगट ‘प्रवर्तन इव्हेन्टस’ पुन्हा आनंदीआनंद घेऊन येत आहे.
त्यांचे आयोजनात बेझणबाग मैदानावर (उत्तर नागपूर) येत्या १ फेब्रुवारी ते ४ असा चार दिवसीय रंगारंग ‘एक्स्पो-२४’ होत आहे.
या एक्स्पो च्या यशस्वीतेसाठी रजनीश थुल (आर्थिक सल्लागार), विक्रम बोरकर (सी ए), हितेश पिल्लेवार (मासे घरपोच व स्टेशनरी), अमोल नगरारे (टुरिझम), विजय म्हस्के (कॅटरर्स), नयन लोखंडे (गृहस्वच्छता साहित्य उत्पादन),शुभम मांडवकर (कापड उद्योग), प्रवीण कडबे (सोलार), हिमांशू खणखणे (आय टी) आणि वैशाली गोस्वामी (मसाले उत्पादन) हे प्रवर्तक अथक परिश्रम घेत आहेत. या तरुण मित्रांचा उद्देश स्पष्ट अन् स्वच्छ आहे. नवे उद्योजक आणि लोक (ग्राहक) यांना जोडणे ! आपण माध्यम होणे. एकाच छताखाली हे होण्यासाठी, ‘National Trade Fair’ चे आयोजन करणे. यंदा हा तिसरा प्रयत्न आहे. नवी उर्मी व स्वप्न घेऊन हे तरुण झटत आहेत. यावेळी त्यांनी इंदोरा चौकीवर छानसे कार्यालय थाटले. संवाद सोपा झाल्याने आनंदी आहेत. घरच्या कामासारखा त्यांचा राबता पाहून यशाची आश्वस्तता वाढते. सध्या लोकसंग्रहावर ते केन्द्रित आहेत. Micro, Small, Medium स्तरावरील उद्यमी, महिला उद्योजक यांना प्रोत्साहित करणे. सेवा उद्योगांचा (service sector) परिचय करून देणे. लोकांत प्रचार, प्रसार करणे यावर भर देऊन आहेत.
हे करतांना मनोरंजन व चविष्ट व्यंजन यांची सोय व्हावी, इकडेही लक्ष आहे.
याच तरुणांनी गेले वर्षी पश्चिम नागपुरात ‘मांडे उत्सव’ हा ‘फुडोत्सव’ घेतला होता. हा उत्सव गाजला व तितकाच चर्चिला गेला ! यावर्षी चिटणवीस सेंटर ला ‘मांडे उत्सव’ घेण्याचा त्यांचा बेत आहे.
सध्याच्या एक्स्पो साठी ते नवीन कल्पना घेऊन आहेत. उद्योगरत अशा १०० उद्योजक व त्यांचे उद्योग यांची पानभर सचित्र माहिती लोकांना नि:शुल्क द्यावी असा त्यांचा मानस आहे. ‘व्यापारी’ नावाची माहिती पुस्तिका देण्यावर त्यांचे काम सुरू आहे. धडपड सुरू आहे. अपेक्षित १२० ‘स्टाल नोंदणी’ पूर्ण झालीय. सकाळी १० ते रात्री १० अशी या रंगारंग उद्योग मेळ्याची वेळ आहे.
बौद्ध तरुणांचे हे प्रयत्न सफल व्हावे. लोकांनी आवर्जून जावे. तेव्हाच प्रयत्न फळतील .. फुलतील .. !
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत