राज्यातील बहिणींनो,मुलांसाठी शैक्षणिक सवलती तरच मतदान,जोर लावून मागणी करा-विजय अशोक बनसोडे
राज्यातील बहिणींनो,मुलांसाठी शैक्षणिक सवलती तरच मतदान,जोर लावून मागणी करा अन्यथा “मी,पुन्हा येईन” च्या ऐवजी “तो मी नव्हेच” नावाचे नाटक सुरु होईल !
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी एक लाख 71 हजार 401 बहिणी ठरल्या पात्र, उस्मानाबाद जिल्ह्यात एक लाख 79 हजार एकूण अर्ज 838,तर 8000 त्रुटी अर्ज मध्ये आहेत. यासाठी खुद्द भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि शिंदे पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी हातात रजिस्टर घेऊन गावो-गाव फिरत आहेत. कारण लवकरच विधानसभा निवडणुका होतील आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी या तीन ही पक्षांची कार्यकर्ता पदाधिकारी नेतेमंडळी गावागावात वार्डा-वार्डात फिरून नोंदी करून घेत आहेत.
मध्य प्रदेशातील “लाडली बहण” या योजनेची कॉपी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने या योजनेची घोषणा करून तीन महिन्यासाठी प्रत्येकी पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला देण्याचे आश्वासन दिलेले आहे.मध्य प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टी सरकारने लाडली बहण या योजनेचा निवडणुकीत भरपूर फायदा घेतला. तर आपल्या जात बांधवांच्या डोक्यावर फळ फळा मुतणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार, खासदारांना दर महा मिळणाऱ्या मानधनासाठी नजरेआड करून बहिणींनी भरघोस अशी “मते”भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात टाकली.
आता महाराष्ट्र मध्ये सुद्धा महाराष्ट्राचे फडणवीस,पवार,शिंदे सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या दोन वर्षात जे पाप केले ते पाप धुवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून एक ही महिला वंचित राहू नये,यासाठी खुद्द आमदार,खासदार खासदार जनतेचे प्रतिनिधी,शिंदे-पवार-फडणीस पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी गावा-गावांमध्ये रजिस्टर घेऊन फिरताना दिसत आहेत. आमदार,खासदार तर चक्क आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगत आहेत की,यांचा आपल्याला निवडणुकीमध्ये योग्य असा वापर करून घ्यायचा आहे.त्यामुळे या कामावर नीट-नेटके लक्ष ठेवा.खरं तर हा निवडणुकीत वापर करून घेण्याचा कावा खुद्द महिलांनीच ओळखला पाहिजे.
राज्यातील लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये पुरवण्याचं सॉंग करणारे सरकार करत आहे.महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पायमल्ली करणाऱ्या,त्यांचे शैक्षणिक पंख छाटणाऱ्या,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उध्वस्त करणारे फडणवीस,शिंदे,पवार सरकार अवघ्या 4500/- रुपयांमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये येण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जेवढी काळजी घेतली जात आहे,तेवढीच काळजी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या विविध योजनांची का घेतली जात नाही ? मागच्या काही दिवसा अगोदरच महाराष्ट्र सरकारने राज्यातील सामाजिक न्याय विभागाचा अनुसूचित जाती व जमातीच्या कल्याणाचा निधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना व वारकरी महामंडळावर का खर्च केला ? खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या रकमेत कोणत्याच परिवाराचा घर संसार एक महिना सुद्धा चालू शकत नाही.परंतु याच लाडक्या बहिणीची मूलं-बाळांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेतले तर त्यांचे उभं आयुष्य सुधारले जाऊ शकते.या गोष्टीकडे मात्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करत आहे ?
महाराष्ट्र राज्यातील तमाम अनुसूचित जाती व जमातीच्या माता भगिनींनी लक्षात घ्यावं, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पैसा आपल्याच करातून गेलेला आहे.तो तुम्ही अवश्य परत मिळवावा,परंतु याचा निवडणुकीमध्ये फायदा फडणवीस,शिंदे, पवार यांना नये याची मात्र दक्षता घ्यावी लागेल.केंद्र आणि राज्यांमध्ये मागच्या दहा वर्षापासून अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पंख छाटण्याचे काम हेच सरकार करत आहे.भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा वर टाच आणण्याचे काम हेच सरकार करत आहे.राज्यातील सरकारी नोकरी असो,विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती असो,बेरोजगारांच्या उद्योग व्यवसायाचा प्रश्न असो किंवा अनुसूचित जाती जमातीवर होणारे अन्याय अत्याचार असो याबाबतीत हे सरकार कधीच गंभीर होत नाही.राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पिळवणूक करण्याचे काम केले आहे,हे आपण कदापी विसरू नये.
या खोटारड्या आणि लबाड सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणे म्हणजे एक प्रकारे आपल्याच पोटच्या मुलां-बाळावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या मोबदल्यात मलाई खाण्यासारखे आहे.तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेताना आपण जागरूकपणे पावले टाकण्याची गरज आहे,1500/- रुपये मिळवण्या सोबतच शैक्षणिक सवलतीची जोर लावून मागणी करा,कारण साधारणपणे सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागेल व ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुका होतील आणि नावे सरकार स्थापन होईल व पुन्हा “मी,पुन्हा येईन” च्या ऐवजी “तो मी नव्हेच” नावाचे नावे नाटक सुरु होईल.
विजय अशोक बनसोडे
लेखक / संपादक 8600210090
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत