महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

संतुष्ट न होता… पुढे चला…

भीमप्रकाश गायकवाड,


आदिवासी बांधवांमध्ये झपाट्याने होत असलेला बदल लक्षणीय आणि आश्वासक होय. या बदलाची बीजे आहेत ते भारतीय संविधानात !
दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो.
जंगलामध्ये वास्तव्य करणारा मूळ निवासी समूह समाजाच्या मुख्य प्रवाहात नसल्याने शिक्षण, आरोग्य, रोजगार या सर्वांपासून कोसो दूर होता. या मूळ निवासी आदिम जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 या दिवशी International Day of Indigenous People अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला. त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने या जमातींच्या मुलभूत सुविधा पुरविण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली.
जागतिक स्तरावर या हालचाली तशा खूप विलंबाने झाल्या असल्या तरी भारतात मात्र 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अस्तित्वात येताच #पायाभरणी केली गेली. संविधानातील एकूण 22 भाग, 12 अनुसूची व 395 अनुच्छेदांपैकी सर्वाधिक अनुच्छेद आदिवासी समाजाच्या हीत रक्षणासाठी आहेत ! अनुसूचित जमातीच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आरक्षणासह विविध तरतुदींचा यात समावेश आहे.

आदिवासी म्हणजे जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज असणारी ओळख आता आदिवासी समाज झपाट्याने पुसत मुख्य प्रवाहाची वाट धरत आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील दिवसेंदिवस वाढत असून संविधानाला उमलणारी ही रानफूलं होत ! भूतकाळापासून बोध घेत वर्तमानाचं भान ठेऊन हा समाज भविष्याचा वेध घेत आहे. परंतु त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी येथील मनूवादी सातत्याने प्रयत्नशील असून त्यांची #आदिवासी ओळख पुसून त्यांना #वनवासी संबोधणं असंच एक कुटील कटकारस्थान होय. उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण करत असताना आदिवासींना ढाल-तलवार करुन मनुवाद्यांनी रामाच्या नावावर गुजरातमध्ये अक्षरशः नरसंहार घडवून आणला हा ताजा इतिहास नजरेआड नाय करता येणार !
ह्या कटू स्मृती न विसरता त्यापासून बोध घेत उज्ज्वल इतिहास निर्माण करण्यासाठी पदरात टाकलेल्या ‘रबरी शिक्क्या’वर संतुष्ट न होता बिरसा मुंडाचा तीर आता मनुवाद्यांच्या दिशेनं चालवायला हवा !
विकासवाटेवर असलेल्या आदिवासी बांधवांना शंबुख-शबरी-शुर्पनखाचं स्मरण करून जागतिक आदिवासी दिनाच्या क्रांतिकारी शुभेच्छा !
महान नि #आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

आज महामहीम राष्ट्रपती महोदया आपली आदिवासी भगिनी आहे.
अजून काय अपेक्षित आहे भारतीय संविधानाकडून ?

जय भीम !
जय संविधान !!
जय भारत !!!

भीमप्रकाश गायकवाड,
‘मूकनायक’
रविराजपार्क, परभणी
( 9 ऑगस्ट, 2024)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!