जुनी पेंशन लागू करणे व इतर मागण्यासाठी धरणे आंदोलन संपन्न :-सुरेंद्र टिंगणे
राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन (इंटक )च्या वतीने शुक्रवार दि. 9/08/2024ला दुपारी1.30ते 2वाजेपर्यंत सिव्हिल कार्यालय हिरवळीवर संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे यांच्या नेतृवांत भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने जुनी पेंशन बाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी. महानगर पालिकेने महागाई भत्त्याची थकबाकी गणपती स्थापने पूर्वी देने. सुधारित दराने वाहतूक भत्ता लागू करणे, पदोन्नती व सर्व रिक्त पदे भरण्यात यावे व इतर मागण्यासाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने मागण्याची दखल घेऊन मंजूर केल्या नाही तर लवकरच तिव्र आंदोलन करण्यात येईल असे संघटनेच्या वतीने जाहीर केले.
आंदोलनात सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भीमराव मेश्राम, रंजन नलोडे, प्रवीण तंत्रपाळे, देवराव मांडवकर, महेंद्र बोस, दत्ता डहाके, आदीने आंदोलनात संबोधित केले संजय मोहले, अभय अप्पनावर, कुणाल यादव, मंगेश राऊत, विनीत टेम्बूरणे, मनीष दूधमोगरे, विकास सरोदे, सतीश जनवारे,प्रफुल्ल टिंगणे, देवानंद वाघमारे, अनिल दवंडे, सुषमा खुडसाम आदीने आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत