जय भीम हेच मातंग समाजाचे खरे अभिवादन:– प्रबुद्ध साठे
टेंभुर्णी (नांदेड) :– जय भीम या केवळ अभिवादना साठी नव्हे तर जय भीम या मूल्य व स्वाभिमान साठी, जातीअंताचा लढा व मानवी समता, प्रतिष्ठे साठी पोचीराम कांबळे यांनी बलीदान दिले, त्यामुळे जय भीम ला नाकारणारी मातंग समाजाची परंपरा असूच शकत नाही तर जय भीम साठी जीवाचे बलीदान देणारी परंपरा व इतिहास आहे, याचे उत्तम उदाहरण व प्रेरणा म्हणजे नामांतरवीर शहीद पोचीराम कांबळे यांचे बलीदान होय,,,, जय भीम हेच मातंग समाजाचे खरे अभिवादन असे प्रतिपादन चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख व भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले, ते ते नांदेड जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे नामांतर लढ्यातील पहिले शहीद पोचीराम कांबळे यांच्या बलीदान स्मृती दिनानिमित्त जाहीर अभिवादन सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते, याप्रसंगी देहूरोड धम्म भूमीचे विकास प्रणेते व पोचीराम कांबळे स्मारक साठी पुढाकार घेतलेले व या शहीद परिवाराचा दरवर्षी सन्मान करणारे भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड, सत्यशोधक महासंघाचे अध्यक्ष डि एस नरसिंगे सर, लसाकम चे संस्थापक अध्यक्ष नरसिंग घोडके, , मा, मच्छिंद्र गवाले, , धम्मानंद सोनकांबळे, डॉ उत्तम इंगोले, उपप्राचार्य उत्तमकुमार कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते,,, प्रबुद्ध साठे आपल्या अभिवादन पर भाषणात पुढे म्हणाले बौद्ध आणि मातंग याना जोडणारा दुवा म्हणजे पोचीराम कांबळे यांचे बलीदान, त्यांचा शहीद दिन 4 आगष्ट हा दिवस जय भीम चा स्वाभिमान व प्रेरणा दिवस म्हणून पाळावा, या प्रसंगी भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात नामांतरवीर शहीद पोचीराम कांबळे यांच्या वर हिंदी चित्रपट काढण्याची घोषणा केली,, तसेच डॉ किर्तीपाल गायकवाड यांच्या सत्यशोधक ग्रंथाचे प्रकाशन ही करण्यात आले, सूत्रसंचालन पी एल दाढेराव यांनी केले , या अभिवादन सभेस महाराष्ट्रातील विविध मान्यवर , मोठ्या संख्येने उपस्थित होते, या निमित्त पोचीराम कांबळे यांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत