समतावादयाची फाटाफुट अहंकार व व्यक्तींवादी भुमीकामुळे विषम व्यवस्था कायम ठेवणारी संघटना मजबूत होत आहे
खुजे बहुजन उंचे वामन ! – विनायकराव जामगडे
वर्ण समाज व्यवस्थेविरुद्ध अनेक लोकांनी चळवळी करुन समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. समाज व्यवस्थेत बेचैन निर्माण झाल्यावर समाजव्यवस्थेच्या ठेकेदारांचे धाबे दणाणले. त्यांनी ह्या चळवळीत घुसुन वैचारिक मतभेद निर्माण करुन चळवळी विस्कळीत करण्याचे काम केले. तर कधी उघड विरोध केला चळवळीच्या म्होरक्याला बिघडविणयाचे काम केले. त्याला सत्तेचे पैशाचे आमिष दाखवून चळवळ दाबण्याचा प्रयत्न केला. व त्याला बेईमान होण्यास प्रवृत्त करण्यात आले . विद्रोह होऊ नये याची दक्षता घेतली जाते. समाज व्यवस्थे विरूद्ध असलेला संत चळवळीला ईश्वरी चरणी लिन करून त्यातिल विरोधी सुर दडपून टाकला.
उच्च जातीची अधी सत्ता कसी ऐइल या करीता त्यांनी अनेक तरुणांचे आयुष्य बर्बाद केले. परंतु ते तरुण कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धी पासून अलिप्त राहीले ध्येय हे प्रमुख ठेउन साधनांचा वापर करीत राहिले. अनेकांची नावेही माहित नाही परंतु त्यांनी केलेल्या कामामुळे संघटना मोठी झाली. विषम व्यवस्थेची मुळे खोलवर रुजली गेले. ध्येय निष्ट तरूणांची फोज उभी करण्यास ते यशस्वी झाले.
रा. स्व. स. स्थापणा १९२५ साली झाली. प्रथमता: लहान मुलांना गोळा करून मैदानी खेळ सुरु केले. वैचारिक पेरणी करिता बैठका घेऊन प्रशिक्षण दिल्या गेले. प्रशिक्षित स्वयम् सेवक देशभर डोक्याला कफन बांधुन हिंडत राहिला. संपुर्ण भारत देशात रा. स्व. संघाचे जाळे विणल्या गेले. सघटन मजबूत केले. त्याच दरम्यान डा.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. उदिष्ट समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुत्व न्यायाची समान संधी या जीवन मुल्यांवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्याचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयातभर लढले. अन्याय अत्याचारा विरुद्ध समता सैनिक दलाचे सैनिक तुटुन पडत. जीवनाची पर्वा न करता समता सैनिक दलाच्या सैनिकानी समतेसाठी संघर्ष केला. सघटनेचा धाक निर्माण झाला.शिस्तप्रिय लढाऊ संघटना म्हणुन नावारूपास आली.
समाजात भितीयुक्त दहशत निर्माण करुन विषमता वाद्यांच्या छातीत धडक बसली. त्यांना भिती वाटुन लागली की अशीच घोडदौड सुरू राहिली तर समाजव्यवस्था उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. म्हणुन ही चळवळ कमकुवत कशी होईल याचा विचार करु लागले. परंतु बाबासाहेबा समोर त्याचे काहीही चालले नाही. ते बेचैन होऊ लागले. डाॅ. आबेडकराचे महापरिनिर्वाण झाले व टपुन बसलेल्या गिधाडानी लचके तोडण्यास सुरुवात केली. बाबासाहेबानी हिरोईझमचा विरोध करुन व्यक्ती वादापेक्षा संघटनेला महत्व दिले.परतु हिरोईझमचा उपयोग करून संघटनेत फूट पाडली व आज ऐक दिलं के तुकडे इधर बिखरे उधर बिखरे अशी अवस्था झाली आहे. सघटनेत एका व्यक्तीचे नेतृत्व तयार होत आहे ती व्यक्ती म्हणजे संघटन अशी अवस्था झालेली आहे. प्रत्येक जण म्हणतो की मी म्हणतो तोच आंबेडकरवाद. मलाच आंबेडकरवाद समजला आहे. बाबासाहेबानी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले त्याचे अनुयायी जात पोटजातीचा उपयोग करुन ब्राह्मणवादाला मजबूत करीत आहेत. त्यांनी फेकलेल्या सत्तेचे तुकडे चघळण्यातच धन्यता मानत आहे. जे काही मिळाले ते व्यक्तीला मिळाले त्यामुळे दोन चार लोकांचे भले झाले त्याची गरीबी दूर झाली.
परंतु समाज गरीबीत अज्ञानात पडलेला आहे. त्याच्याकडे कोणाचेही लक्ष नाही. जो शिकला आरक्षणाचा फायदा घेऊन अधिकारी झाला. त्याला आपली नोकरी वाचविण्यासाठी कसरत करावी लागते. त्याला वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी सारी कार्य कुशलता पणाला लावावी लागते. तो लाचारी पत्करतो वेळप्रसंगी समाजाच्या लोकांना जवळ भटकू सुद्धा देत नाही. समाजापासुन जितके दूर राहता येईल तशा प्रयत्न करतो. ज्यावेळी त्यांची नोकरी धोक्यात येते त्यावेळी त्यांना समाजाची आठवण येते. माझ्यावर अन्याय झाला अशी बोंब मारून समाजाची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतो. समाज अशा अधिकाऱ्याकडून मोठ्या अपेक्षा बाळगतो परंतु अधिकारी आपण व आपले कुटुंब ह्या व्यतिरिक्त विचारच करत नाही.
संघटनेचा समाजाचा फायदा फक्त आपल्या बढतीसाठी व समाजात स्थान मिळविण्यासाठी करीत असतो. वरच्या्च्या पाया पडतो व समाजाला लाथा मारण्याचे काम करतो. आजही शिकलेल्याचा साधन संपन्न लोकांचा एक वर्ग व असंख्य गरीब अज्ञानीलोकाचा एक वर्ग अशी समाजाची अवस्था आहे.
राजकारण सुद्धा व्यक्तींसाठीच केले जाते. निवडणुकीतिल समझोते हे समाजाला समोर ठेवून केले जात नाही तर व्यक्ती ही महत्वाची आहे कधी एक जागाही न घेता निवडणुक समझोता केला जातो कारण त्यात नेतृत्वाचे भले असते. आमदार खासदार मागच्या दाराने होता येते. किंवा महामंडळाचा अध्यक्ष होऊन लाल दिव्याचा गाडीच्या उपयोग घेता येतो. मेढरी समाज अश्या फसव्या नेतृत्वाच्या मागे धावत असतो विषम व्यवस्था उध्वस्त करण्यासाठी संघटनेचा उपयोग व्हायला पाहिजे त्याठिकाणी व्यक्ती विकास हा प्रमुख उद्देश असतो. कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ह्या म्हणी प्रमाणे समाज विकासात असे नेतृत्व अडथळा निर्माण करते.
आंबेडकरी चळवळ ही कमकुवत झाली आहे. निवडणुक आली की एकतेचा टाहो फोडायचा वेळ प्रसंगी एक होण्याचे नाटक करायचे निवडणुक संपली की जैसे थे परत आप आपल्या घरट्यात जाऊन आपला गोतवळा सांभाळायचा. सत्तेच्या भोवती फिरत राहायचे व आपले व आपल्या सोबतयाचे भले झाले की समाजांचे भले झाले असे समजायचे. समाजाची उंची वाढो किंवा घटो याची फिकिर यांना नसतेच. बिचारी गरीब जनता बाबासाहेब यांच्या नावाने मरमिटणयास तयार असते. याचाच फायदा असे फसवे नेतृत्व घेत असते.
नेत्यांपेक्षा संघटना मोठी!
समाजात सामाजिक क्रांतीचे चक्र गतिमान न होता ते तिथे थांबले आहे. आज गरज आहे ते चक्र गतीमान होण्याचे कारण विषमतावादी आक्रमक असून ते अनेक रूप धारण करून समाजाला विषमतेच्या खाईत लोटत आहे. समाजात नेहमी भांडणे होतील ह्या दृष्टिने प्रयत्न केला जात आहे. ज्या प्रमाणात धार्मिक उत्सव करून वेद, यज्ञ संस्कृतीचा पुन्हा जीवित केल्या जात आहे. विषम व्यवस्था कायम ठेवणारी संघटना मजबूत होत आहे. कारण त्याचे उद्दिष्ट संघटना मजबूत करण्याचे असते त्यांच्यासाठी व्यक्ती गौण असतो. असे किती व्यक्ती येथिल व जातील याच्यासाठी संघटनेचा वापर करू दिला जात नाही. ते सतर्क असुन संघटने प्रती कटिबद्ध आहेत त्यांना संघटना महत्वाची आहे कारण त्यांना माहित आहे संघटनेशिवाय ध्येयपूर्ती होऊ शकत नाही.
सघटनेविरूदध कोणीही मोठा माणूस असु दे ते त्याला महत्व देत नाही.देशाचा पंतप्रधान संघाच्या सरसंघचालकाला वंदन करतो कारण संघटन मोठे आहे याची जाणिव त्याला आहे. व्यक्ती संघटनेला वाहून घेत असल्यामुळे अंतिम निर्णय हा संघटनेचा असतो. म्हणुन रा.स्वं. संघाच्या अनेक शाखा उपशाखा कार्यरत आहेत. त्यांचे नेते काहीही बोलत असले तरी संघटनेच्या मुद्द्यावर एकमत असते आणि म्हणून तथाकथित पुरोगामी म्हणणाऱ्याला काखेत घेऊन चालण्याची कसरत करण्यास अटलबिहारी वाजपेयी यशस्वी झाले. त्यांची उदारवादी भूमिका असल्याची समाजात प्रतिमा निर्माण करून उग्रवादी व उदारवादी अशा दोन्ही भूमिकांचा समन्वय साधतात. त्यांच्या संघटनेत फूट दिसत नाही कारण त्यांचे स्वप्न हिंदुराष्ट्राचे असून त्यादृष्टीने प्रयत्न आहे. त्यांना हिंदू राष्ट्र पाहिजे आहे. ज्या दिवशी ते पूर्ण पूर्ण बहुमताने निवडून येतील त्यादिवशी ते आपला कार्यक्रम बिन दिक्कत राबवतील व त्यादृष्टीने यांची वाटचाल आहे. त्यांना रोखणारा दुसरा संक्षम असा पक्ष नाही. प्रत्येक पक्ष विभाजित असुन ब्राह्मणवादी छावनीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे वावरण्याच्या प्रयत्नात आहेत. समतावादयाची फाटाफुट अहंकार व व्यक्तींवादी भुमीका याला कारणीभुत आहे. जात पोटजात वंश प्रादेशिक वाद यातच गुंतून विषमता वाद्यांना वाट मोकळी करून देत आहेत ब्राह्मणवादी आपली सत्ता कायम टिकविण्यास यशस्वी होत आहे.ते समतावादया समोर आव्हान आहे.
विनायकराव जामगडे
मो.९३७२४५६३८९, ७८२३०९३५५६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत