नळदुर्ग येथील शिवम् कॉम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने डॉ सुभाष राठोड यांचा सत्कार
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग तर्फे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,नळदुर्ग येथील प्राचार्य डॉ. सुभाष राठोड प्राचार्य पदी नियुक्ती झाल्यानंतर शिवम् कॉम्प्युटर एज्युकेशन सरकार मान्य सारथी नावाचा एक उपक्रम राबविला जातो त्या वेळेस त्यांचा सत्कार करण्यात आला .
ज्यामध्ये मराठा समाजातील युवांना वीस ते पंचवीस हजाराचे कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स अगदी मोफत आहेत. त्या कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वाटपाचा कोर्स चालू करत असताना त्या विद्यार्थ्यांकडून दोन हजार अनामत रक्कम जमा करण्यात आली होती ती रक्कम परत करण्यात आली .
कार्यक्रमास उपस्थित सर्व पाहुण्यांचं स्वागत शिवम कॉम्पुटर चे मुख्य प्रवर्तक सतीश पुदाले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. सानिका संतोष महाबोले हिने केले.या कार्यक्रमाला शशिकांत पुदाले , सुभाष राठोड , काही विद्यार्थ्यांचे पालक मल्लिकार्जुन गायकवाड, अवधूत चव्हाण हेही उपस्थीत होते.या सर्वांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती डॉ. सुभाष राठोड यांचे शाल, पुष्पहार व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात
आला. कू. बेले अदिती भागवत,गायकवाड तृप्ती मल्लिकार्जून,चव्हाण आकांक्षा अवधुत ह्या विद्यार्थीर्नीचे प्रमाणपत्र व त्यांनी दिलेली अनामत रक्कम ही परत करण्यात आली तसेच कू. गायकवाड शुभांगी भास्कर, जाधव सोनाली रमेश, मोटे संगिता, कदम तन्वी लक्ष्मण ह्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देण्यात आले.सारथी व कॉम्प्युटर संदर्भात विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन शिवम कॉम्प्यूटर चे मुख्य प्रवर्तक सतीश पूदाले यानी केले. डॉ. सुभाष राठोड यानी आपल्या सत्काराला उत्तर दिले शेवटी आभार पूनम जयसिंग बिसेनी यांनी केले.
या कार्यक्रमास पालक विद्यार्थी सहशिक्षक आदीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत