कोणत्या जातीने अधिक लांभ घेतला व कोणत्या जातीने कमी लाभ घेतला याचा अभ्यास करावा
पंजाब सरकार विरुद्ध दावींदर सिंग या केसच्या निकाला मुळे (१) एस सी; एस टी; च्या 15 व ७ टक्के मध्ये असलेल्या जातींच सब क्लासिफिकेशन करून, कोणत्या जातीने अधिक लांभ घेतला व कोणत्या जातीने कमी लाभ घेतला याचा अभ्यास करावा, व राज्य सरकारने त्याप्रमाणे सब क्लासिफिकेशन करून ज्या जातींना मिळालं नाही, त्या जातीन बद्दल न्याय करावा, असा निकाल दिला.
(२) वरील निकषांचे अनुकरण करून, आमची अशी मागणी आहे की, सवर्ण जातीतील जातींमध्ये देखील कोणत्या जातींनी जास्ती लाभ घेतला व कोणत्या जातींनी कमी लाभ घेतला याचा सर्वेक्षण अभ्यास करावा व त्याच्यात देखील सब क्लासिफिकेशन करावे.
(३) कारण खुल्या वर्गातल्या जातींमध्ये देखील देखील काही जातीचे लोक जास्ती लाभ उठवत असतील, व खुल्या वर्गातील काही जातींना कमी लाभ मिळत असेल. त्यामुळे खुल्या वर्गातील देखील अन्यायग्रस्त जातींचा व लोकांचा विचार झाला पाहिजे व तिथे देखील क्रिमिलियर्स तत्व अमलात आले पाहिजे.
(४) कारण खुल्या वर्गाला देखील एक घटक न मानता त्यांच्यात प्रत्येक जातीचा वेगळा अभ्यास करून त्यांच्यातल्या वंचित जातींना न्याय दिला पाहिजे.
(५) त्यामुळे खुल्या वर्गत प्रवर्गात देखील न्याय हा प्रत्येक जातीपर्यंत पोहोचू शकेल. तसेच या निकालामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने हे अधिकार राज्य शासनाला देखील दिले आहे त्यामुळे ही गोष्ट अधिकच सोपी करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत