वर्षावास एक सुवर्णसंधी.
आषाढ पौर्णिमेस वर्षावास अर्थात बौद्ध संस्कृतीचे ज्ञान पर्व सुरु होत आहे ते अश्विन/कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत चालू राहील…तथागतान्चे प्रथम धम्म प्रवचन अर्थात धम्मचक्कपवत्तन सुत्ताचे प्रथम उच्चारण झाले.आणि पृथ्वीवर प्रथमच प्रक्षेपण झाले धम्मधारेचेआणि त्यानंतर सतत चार महिने धो धो पाऊस पडला ज्ञानाचा सतत. आणि मानवाचे बुद्धिवैभव वाढतच राहिले अंधार अज्ञान अविद्या यान्चा सतत कणाकणाने नाश होत आहे म्हणून आपली मुले आजही नवीन ज्ञान घेण्यासाठी वर्षावासातच नवीन वर्गात प्रवेश घेतात अशा तर्हेने वर्षावास या ना त्या प्रकारे चालू आहे.आपणही या वर्षावासात काहीतरी नवीन ज्ञान घेण्याचा/देण्याचा संकल्प करूया चार महिन्यातच पूर्णत्वास नेऊ या! हा बौद्ध संस्कृतीचा सम्यक संकल्प आहे.अज्ञान हे खरे दुःखाचे कारण आहे ते नष्ट करण्यासाठी सर्वोत्तम काळवेळ अर्थात वर्षावास समोर उभा आहे चला त्याचे नियोजन करूया..
जागा कोणतीही चालेल विहार राहते घर. उपलब्ध सर्व उपासक उपासिका बालक बालिका यांनी एकत्र जमावे ठराविक वेळेला त्रिशरण पंचशील घेऊन ज्ञान देणाऱ्या कोणत्याही ग्रंथाची निवड करा त्याचे वाचन निरूपण करा यासाठी कोणत्याही विशिष्ट व्यक्तिची गरज नाही..वर्षावास सर्वांसाठी खुला आहे.आदरणीय भिक्षुसंघ असेल तर दुधात साखर.उत्तम योग. हा कार्यक्रम एक ते दीड तासापेक्षा अधिक काळ चालू देऊ नये.सत्कार सन्मान स्वागत या काळात करू नये कुणीही वाचन/निरुपण करावे रोज आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा असे आपल्या सोयीने ठरवून चार महिने नियमित करावे ज्या कुणाचीही वाणी स्वच्छ स्पष्ट असेल अशा कोणत्याही वयाच्या स्त्री वा पुरुषास ग्रंथ वाचनाची संधी द्यावी बाबासाहेबांचा कोणताही ग्रंथ उदा भारतीय संविधान अनाहिलेशन ऑफ कास्ट इ. अथवा त्रिपिटक् साहित्यातून ग्रंथ निवडवा थोडा बदल म्हणून महिन्यातून एकदा एखादया अभ्यासू वक्त्याला संधी देण्यास हरकत नाही.त्यात मेडिकल सायन्स, अर्थशास्त्र, मानसशास्त्र या विषयांना प्राधान्य द्यावे.
लक्षात ठेवा हा काळ फक्त ज्ञान देण्याघेण्याचा आहे त्यावरच भर दिला पाहिजे कार्यकर्ता पदाधीकार्यांचे फालतू स्वागत सत्कार करून टाईमपास करू नये..प्रामाणिक पणे वर्षावास केल्यास खूप फायदा झाल्याचे जाणवेल…यात फक्त दहा मिनिटां चे अनापान सत्र फार अवश्यक आहे या काळात शक्य असेल तसे अष्टमी पौर्णिमा उपोसथ धारण करणे सुद्धा चित्त शुद्धीस उपयुक्त आहे. …
चला तर तथागतांनी प्रस्थापित केलेला वर्षावास प्रसन्नचित्ताने संघ होऊन संपन्न करू या..
भवतु सब मंगलम
नमो बुद्धाय 🌹 जय भीम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत