जातींचं वर्गीकरण म्हणजे बहुजनातील एकत्र येणाऱ्या सर्व जाती-उपजाती समूहांना गुलाम करणं होय!
———————-विशाल हिवाळे
जातींचं र्गीकरण म्हणजे बौद्धांना टारगेट करणं.जातींचं वर्गीकरण म्हणजे बौद्धमय भारताच्या निर्मितीला खो घालण्याचं षडयंत्र. जातींचं वर्गीकरण म्हणजे ज्या जाती-उपजाती एकत्र येत आहेत त्यांच्यात यादवी निर्माण करणं.जातींचं वर्गीकरण म्हणजे आरक्षणाचं प्रमाण कमी करणं.वर्गीकरण म्हणजे मनूवादला वाव देणं.वर्गीकरण म्हणजे संविधानातील समता मूलक तत्त्वाला सुरूंग लावणं.वर्गीकरण म्हणजे शिक्षित झालेला मोठा समूह आर्थिक डुबणाऱ्या जहाजात ढकलणं.वर्गीकरण म्हणजे मनूवादी व्यवस्थेला पूरक काम करणाऱ्यांना पोसणं वर्गीकरण म्हणजे अंधश्रद्धा पाळणाऱ्या समूहांची वाढ करणं. वर्गीकरण म्हणजे परिवर्तन चळवळीला अडथळे आणणं. वर्गीकरण म्हणजे भविष्यात आरक्षणाचा अधिकार बाद करणं .वर्गीकरण म्हणजे बहुजनातील एकत्र येणाऱ्या सर्व जाती-उपजातींना गुलाम करणं होय..जातींचं वर्गीकरण म्हणजे व्यापक पातळीवर उभारत असलेल्या आंबेडकरवादाला रोखण्याचा मनूवादी प्रयत्न होय
या असंविधानिक वर्गीकरणाच्या निर्णयास विरोध करावाच लागेल. इतर SC कॕटेगिरीतील जाती समूहांना आरक्षण मिळत नाही हा अपप्रचार असून याचा प्रतिवाद करावाच लागेल.इतर 59 जातीं पैकी असंख्य लोक मोठया पदावर आहेत तर राजकीय क्षेत्रातही आमदार-खासदार , मंत्री आहेत.देशभरातही हिच परिस्थितीत आहे.छोटे-छोटे जात समूह हे वर पर्यत पोहचले आहेत.देशभरातली हि यादी दयाला लागलं तर वेळ अपूरा होईल.इतर जाती समूहांना प्रतिनिधीत्व मिळत नाही या छुप्या अजेंडया द्वारे संविधानिक मूल्यांवर आधारीत समतावादी राष्ट्र उभं राहु दयायचं नाही असं दिर्घकालीन षडयंत्र ब्राह्मण्यवादी व्यवस्थेने आखलंय.डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हा देश राष्ट्र म्हणून तयार झालेला नसून केवळ जातींचं कडबोळं आहे.संविधानाच्या माध्यमातून हा देश राष्ट्र म्हणून उभा राहताना जातीचं कडबोळं कायम कसा राहिल याची तजवीज सर्वोच्च न्यायालयाने करून ठेवलीय.आंबेडकरवादी समूहाला सर्व बहुजनांचं प्रबोधन व संघर्ष करत हा चक्रव्यू भेदावाच लागेल
—विशाल हिवाळे
(संविधान अभ्यासक आणि प्रचारक)
9022488113
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत