महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

मुंबईत बसुन नामांतर केलं ती चुक झाली….!! शरद पवार.

प्रा.भास्कर भोजने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या मते नामांतर केलं ती चुक झाली….!!
औरंगाबाद येथील दौ-यात शरद पवार साहेब यांनी जाहीर पणे म्हटले आहे की, नामांतर केलं ती चुक झाली….!!
औरंगाबाद विद्यापीठ नामांतराचा इतिहास नव्या पिढीला माहित नाही….!!
मित्रहो,औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी आंबेडकरी संघटनांनी १९७६ साली केली…
म्हणून मराठवाड्यातील बौद्ध आणि मातंग समाजातील माणसांची अतिशय क्रुरपणे हातपाय तोडून.डोक्यात दगड घालून,रात्रीच्या अंधारात घर बाहेरुन पेटवून देऊन, चौकात होळी पेटवून होळीच्या आगीत जाळून, वस्तीवर जमावाने हल्ला करुन, भर रस्त्यावर जमावाने बेदम मारहाण करुन, शेतात एकटं गाठून,सतत सोळा वर्षे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात एकूण ३०० पेक्षा जास्त माणसांची अमानुष पणे हत्या करण्यात आली….!!
मराठवाड्यातील बौद्धांच्या शेकडो वस्त्या जाळण्यात आल्या. हजारो महिलांची अब्रू लूटण्यात आली. गावा गावात जातीय दंगली पेटवून बौद्ध समाजावर बहिष्काराचे शस्त्र वापरुन मराठवाड्यात बौद्ध समुहाचं जगणं कठीण झालं होतं. खेड्यात जीथं बौद्ध समुह अल्पसंख्याक आहे तिथं दहशतीच्या सावटाखाली जीव मुठीत धरुन बौद्ध समाज जगतं होता हा मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्याचा इतिहास आहे….!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नांव विद्यापिठाला द्या म्हटले तर बौद्ध समुहाची करोडो रुपयांची संपत्ती जाळली, शेकडो मुडदे पाडले, हजारो महिलांची अब्रू लुटली, हजारो तरुणांना जेलात डांबून त्यांचे शैक्षणिक,व नोकरी विषयक भविष्य अंधकारमय केले ,गरीबांचं हातावर पोट असलेल्या खेडूत समुहाचं जगणं कठीण झालं हे कुणाच्या शासनकाळात.? उत्तर आहे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असतांना…!!
हा सगळा अन्याय आणि अत्याचार करणारा वर्ग कोणता होता.?? उत्तर आहे मराठा समाज. शरद पवार साहेब यांचा मतदार. शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वातील सहकार क्षेत्रातील सहकारमहर्षी. गावा गावात प्रतिष्ठीत असलेला शिक्षणमहर्षी, सहकारमहर्षी, जिल्हा परिषदेतील सत्ताधारी, आमदार, खासदार यांचे कार्यकर्ते….!!
कोंबींग अॉपरेशन च्या नावाखाली हजारो आंबेडकरी सुशिक्षित पदवीधर तरुणांना जेलात डांबले कुणी.?? उत्तर आहे शरद पवार साहेब यांच्या गृहखात्याने…!!
१९७६ साली सुरू झालेला नामांतराचा संघर्ष १९९३ पर्यंत सुरू होता. एवढा अमानुष अन्याय आणि अत्याचार ज्या शासन कर्त्यांच्या काळात झाला. त्या शरद पवार साहेब यांची नैतिक जबाबदारी काहीच नाही का.??
तेच शरद पवार साहेब म्हणतात मी मुंबईत बसुन नामांतर केलं ती चुक झाली…!!
शरद पवार साहेब यांना पुरोगामी समजून जे जे आंबेडकरवादी विचारवंत आहेत, की जे फक्त निवडणुकीत गांडुळा सारखे ऊगवतात आणि ज्ञान पाजळतात त्यांनी या विषयावर आपले मतं मांडले पाहिजे….!!
साधं एका विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नांव द्या म्हटलं तर आंबेडकरी समुहावर दहशत निर्माण करुन त्यांचं जगणं कठीण करुन सोडायचं…!!
आंबेडकरी स्वायत्त राजकारण ऊभं राहू नये म्हणून आंबेडकरी समाजातील जोकर व्यक्तीला नेता म्हणून पुढे करतं, मंत्री बनवून आंबेडकरी समाजाच्या बोकांडी बसवून आंबेडकरी राजकारण पांचट करायचं पाप करणा-या दगाबाज नेत्याला कुणी पुरोगामी म्हणतं असेल आणि शरद पवार यांची वकीली करीत असेल त्या गाढवं प्रवृत्तीच्या लोकांनी आता आपलं ज्ञान पाजळलं पाहिजे…!!
ऐन निवडणुकीच्या तोंडावर घराबाहेर पडून प्रबोधनाच्या नावाखाली प्रस्थापितांची दलाली करण्यापेक्षा तुमच्या बौद्धिक क्षमतेचा योग्य कसं लावण्याची ही वेळ आहे…!!
नामांतर केलं ही चुक झाली म्हणणा-या शरद पवार यांच्या संदर्भात आंबेडकरी विचारवंताचं काय म्हणणं आहे…?जयभीम…!!🙏
ऋण निर्देश:-
प्रा.भास्कर भोजने,फुले (आंबेडकर विद्वत सभा सेल) यांच्या सोशल मिडीआ प्लॅटफॉर्म वरून साभार..

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!