महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बहुजनानी व्यापक चाल घ्यावी!–विनायकराव जामगडे

ब्राह्मणी व्यवस्थेचे मूळ खोलवर रुजले असून प्रत्येक्षात जरी दिसत नसले तरी ही व्यवस्था सातत्याने वावरत असते . धार्मिकतेच्या नावानी उन्माद मांडला जातो ‌.सतत पुजन, हवन, यज्ञ, आख्यान,व्याख्यान, प्रवचनाच्या माध्यमातुन समाजाला बांधून ठेवल्या जाते . गोबेलच्या नीती नुसार एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली तर ती खरी ठरते. त्याप्रमाणे सतत साध्वी,साधू, संतांची प्रवचने आयोजित करून वारंवार लोकांच्या गळी उतरविले जाउन त्यांना भारावून टाकले जाते. आपणही पुजापाठ करणारे कमी पडायला नको. म्हणून कोवळ्या मुलासहीत आरत्या ओवाळल्या जाऊन मुलावर संस्कार पडुन धार्मिक प्रवृत्तीच्या पुजापाठात गुंतविला जातो त्यांचे मन हे दुसरे कोणतेही तत्वज्ञान ऐकण्याच्या मनस्थितीत नसते . ब्राह्मणी गुलामीचे पाश आवळल्या जाऊन त्यातुन बाहेर पडत नाही स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने विचारच केला जात नाही . त्याची धारणा झाली असते की देवानंतर ब्राह्मण श्रेष्ठ आहेत व आपण कनिष्ठ आहोत . म्हणुन ब्राह्मण शाही विरुद्ध बोलणे त्याला आवडत नाही त्यालाच चिड व राग येतो. आपण कितीही शिकलो तरी आपले स्थान दुय्यम आहे .अशी बहुजन समाजाची मानसिकता आहे. ह्या गुंत्याच्या बाहेर पडण्याची त्याची इच्छा नाही तर त्याच कोशात गुंडाळला जातो .
बहुजन समाजाची संस्कृती प्रगतीकारी संस्कृती होय .ते या देशाचे मूळ रहिवासी असून ते प्रगत होते नागरिक सुविधा त्यांना मिळत होते. बंधुभाव नांदत होते. कोणीही उच्च नाही कोणही श्रेष्ठ नाही अस्पृश्यता पाळली जात नव्हती. सर्व गुण्यागोविंदाने जगत होते. परंतु आर्यांनी या देशावर घोड्यावर स्वार होऊन आक्रमण केले .ते गाफील असताना त्यांच्यावर चढाई केली व त्यांना हरवून प्रदेश काबीज केला .आपले गुलाम केले. आपली विषमतावादी संस्कृती मूळ संस्कृतीवर लादली . मूळच्या आराध्य दैवताना दैत्य ठरविले. त्यांना शत्रु ठरवून गावकुसा बाहेर टाकले .आपले विषमतावादी देव येथील मूळं लोकांच्या माथी मारले. त्याला पुरक साहित्य निर्माण करून त्याची मानसिकता बोथट केली . त्यांना संवेदनाहीन केले. आपल्या संस्कृतीचे दास केले. गुलामीची व्यवस्था स्वीकारण्यास बाध्य केले. मूळ रहिवासी यांचे देव दैत्य ठरविल्यानंतर ते आपले नुकसान करणारे आहेत,अहितकारी आहे त्याच्या प्रती समाजात भिती निर्माण करुन त्यांच्या विषयी घृणा निर्माण केली. आपल्या देवाची देऊळ बांधून त्याची पूजा अर्चना करणयास सुरुवात केली . त्याच्या देवळात अस्पृश्यता पाळली जाते परंतु शेतातील दैत्याची पुजा करण्यास आडकाठी नाही. आजही शेतकरी आपल्या शेतातील पिकांचे संरक्षण करण्याकरिता दैत्यांला नवश बोलतातव व जेव्हा माल निघतो तेव्हा त्याचा नवश फेडला जातो. शेताच्या बांधावर असलेला दैत्य शेतक-यांचे रक्षण करतो. त्याची कोणीही पुजा करु शकत असल्यामुळे त्यांच्याजवळ समता आहे. परंतु गणपतीच्या देवळात किंवा मारुतीच्या देवळात सर्वांना प्रवेश नसतो. कारण हे देव आर्या चे आहेत येथील मुळ रहिवाशात भेद पाडुन त्यांना विभक्त केले. स्त्रियांना देवळात जाण्यास व पुजा करण्यास बंदी असून अस्पृश्यांच्या सावलीचा सुद्धा विटाळ होतो. म्हणुन अस्पृश्यांना देवळाला त्यांच्या सावलीचा स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागते. देवानीच विषमता निर्माण केली असुन सर्वांनी ती देवाज्ञा म्हणुन स्विकृत करावी आज्ञेचा कोणीही भंग करु नये .जे काही या जन्मी भोगत आहे ते मागच्या जन्मी केलेल्या पापाचे प्रायश्चित होय. म्हणुन निमुटपणे सहन करावे . अशाप्रकारची मानसिकता तयार केली जाऊन कोणी जर त्याविरुद्ध बोलण्याची हिंमत केली तर त्याचा राग व चिड येऊन देवाज्ञाचा् भंग केल्या बद्दल देहातांची शिक्षा करण्यास कमी करत नाही. ज्यांनी व्यवस्था लादली त्याचीच सेवा करण्यात स्वतःला धन्य मानतात. ब्राह्मणी व्यवस्था येथील मुळ जनतेत भेद निर्माण करून विषम व्यवस्थेचे संगोपन करत असतात. जो आपल्या सारखा सम दुःखी आहे. ज्या व्यवस्थेत जगतो‌ त्यात व्यवस्थेतही जगतो तरी त्यांच्या बद्दल घृणा व्यक्त करतो व हे सर्व देवांच्या नावाने करिता असल्यामुळे समाधान व्यक्त करतो . त्याला आपल्यावर लादल्या गेलेल्या गुलामीची जाणीव नसते. परंपरेने चालत आल्यामुळे आपणही त्यांचा स्वीकार करावा त्याची अवहेलना करू नये ब्राह्मणी संस्कृतीच्या संरक्षणासाठी छातीचा कोट करुन बहुजन समाज पुढे सरसावतो. आपल्यापेक्षाही कोणी तरी खाली आहे. आपण कोणाच्या तरी वर आहोत ह्यातच समाधान मानून आपला इतिहास माहित करण्याच्या भानगडीत पडत नाही. आर्यांनी सांगितलेला इतिहासच आपला इतिहास अशी समज बहुजन समाजाची आहे.
ब्राह्मणी व्यवस्था आपसात भिडवत असते कधी जातीच्या नावाने तर कधी शैक्षणिक सवलती च्या नावाने आरक्षणामुळे सरकारी नोकरी लागत नाही बेकारी चे प्रमाण सारखे वाढण्याला ते कारण आहे. अशाप्रकारे भरवल्यामुळे बहुजनातील तरुण आरक्षणा विरुदध बोलतो. आरक्षण संपविण्या च्या गोष्टी करतो. परंतु सरकारी नौकरी कोणी हडपल्या आहेत सरकारी नोकऱ्या खालपासून वरपर्यंत च्या जागा कोणत्या जातीने व्यापलेल्या आहेत याची कधी चौकशी करीत नाही उलट आरक्षित जागा भरल्या गेल्या काय याची माहिती काढीत नाही किंवा त्याला त्याची माहिती होऊ दिल्या जात नाही. त्याची दिशाभुल केली जाते .जय शिवाजी जय भवानीचा नारा लावून आपल्याच बांधवांवर आक्रमण करण्यास प्रवृत्त केल्या जाते. ज्यांनी व्यवस्थेत आपले स्थान वरचे ठेवले आहे. तो मात्र संरक्षित राहतो . त्याच्या आसनाला कोणताही धक्का लागत नाही .खरी समस्या कळूच दिली जात नाही . वरवरच्या समस्या पुढे करुन आपसात संघर्ष करुन गुंतवून ठेवल्या जाते. मूळ गाभा तसाच कायम ठेवल्या जातो. त्याला स्पर्शच केला जात नाही. त्यांच्याच भरवश्यावर सत्तेचे पद द्यायचे कधी कारपोरेटर तर विधानसभेचे सभासदत्व लोकसभेतही पाठवायचे कारण त्या ठिकाणी आपले संरक्षण करण्यास अशा फौजेची गरज असते .ही फौज तुटुन पडण्यास कामी येते . ब्राह्मण कमी पडेल परंतु बहुजनातील अशी मंडळी जास्त आक्रमक असते. ब्राह्मणवादी व्यवस्थेचे संरक्षण करण्यास शीर तळहातावर घेऊन लढण्यास तयार असतो. ह्यातच ब्राह्मणी व्यवस्था खुश असते. दलीत चळवळीचे लक्ष्य ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध लढणे आहे . म्हणुन दलीत चळवळी बदल संभ्रम निर्माण करण्याचे काम करुन दलीत चळवळ व बहुजन चळवळ एकमेकीपासून दूर ठेवल्या जातात. दलीत अस्पृश्य असल्यामुळे ते तुमची बरोबरी करु शकत नाही. जातीच्या उतरडीनुसार त्याची श्रेणी खालची आहेत म्हणुन बहुजन समाजानी दलीत समाजापासुन फटकुन वागावे अशा पद्धतीचे वातावरण तयार केले जाते. तोंडापुरते बाबासाहेबाचे नाव घ्यायचे परंतु काम मात्र उलट करायचे विषमतावादी व्यवस्था कशी मजबुत होईल यासाठी डावपेच आखीत राहायचे .दलीत समाजाविषयी जितकी घृणा द्वेष मत्सर पसरविता येईल तेवढे पसरावयाचे .दलीत चळवळीचे ध्येयच विषमतावादी व्यवस्थे विरूद्ध लढण्याचे आहे. दलितांमध्ये अनेक गट तट असतील समाज दुभगला दिसत असला तरी विषमतावादी विरूद्ध लढणे हाच मुख्य हेतू आहे. समता,स्वातंत्र्य ,बंधुत्व ,न्याय या तत्वप्रणाली वर आधारित समाज व्यवस्था आणण्यासाठी लढणे हाच एकमेव उद्देश आहे ‌. म्हणून दलीत चळवळी पासुन अलिप्त ठेवण्याचे धोरण आहे .
जाती जातीत अंतर ठेवणे किंवा जाती पाळणे हाच ब्राह्मण वादाचा भाग आहे. दलीता पासून दूर राहण्यासाठी तत्वज्ञानाचा, विश्लेषणाचा आधार घेतला जातो शुलक मतभेदावरून दलीत चळवळी पासुन दुरी राखली जाते . ब्राह्मणाच्या पाया पडायचा व दलितांना लाथा मारायचा हा सिद्धांत झाला आहे मग देवळात दलित प्रवेश् करीत असला तर त्याचा खून केला जातो. आपल्या मुलीची इज्जत लुटल्या गेली त्याचा न्याय मागणयास गेला असता त्याला आपले डोळे गमवावे लागते कधी जिवाला हि मुकावे लागते. जे अन्याय, अत्याचार दलिता सोबत केल्या जाते तेच ब्राह्मण सोबत केल्याचे ऐकिवात नाही कारण ब्राह्मण देवाचे रूप आहेत व त्यांना दुखावणे म्हणजे प्रत्यक्षात देवाला दुखवणे होय त्यामुळे बहुजन समाजाची ब्राह्मणी गुलामीवरची निष्ठा कायम आहे. आपल्या शोषणास सामाजिक स्थितीस जबाबदार कोण याची जाणिव नाही. म्हणुन परंपरेने चालत आलेली ब्राह्मणी व्यवस्था आपली होय. त्याविरुद्ध काहीही ऐकण्याची किंवा बोलण्याची हिंमत होत नाही. आपल्या भल्याची योजना का आखित नाही. सामाजिक समता का आणित नाही. उन्नतीच्या मार्गात अडथळा कोण आणतो .सारखी आर्थिक परिस्थिती असताना सुद्धा सामाजिक विषमता कोण जोपासतो. एकाजाती विरूद्ध कोण भडकवितो याची जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. कारण एका विशिष्ट जातीच्या श्रेष्ठत्व राखण्यासाठी बाकी जातींना गुलाम करुन त्याच व्यवस्थेत राहण्यास बाध्य करीत आहे. ह्या देशात राहणाऱ्या अन्य जातिना सुद्धा आपला उद्धार करण्याचा हक्क आहे . त्यांच्यात स्वाभिमान निर्माण होऊन समतेचे स्वप्न पाहणे गैर नाही करूणाचा अंगिकार एकमेकां विषयी प्रेमाने वागणे दुसऱ्या वर दया दाखवणे व दुःखीताचे अश्रू पुसणे त्याला धीर देणे स्वावलंबनाचे जिवन जगण्यास शिकविणे आवश्यक आहे . समाजात बंधुभाव त्यांच्या बुद्धीनुसार आवडीनुसार काम करण्यास मोकळीक असते समाजात समतेची वागणूक मिळते कामाची समान संधी असणे समान न्याय मिळणे आवश्यक आहे .व ह्या साठी समविचारी लोकांनी एकत्र येऊन संघर्ष करुन ब्राह्मणवादी व्यवस्थेचा पाडाव करू शकतो .
विनायकराव जामगडे मो. ९३७२४५६३८९, ७८२३०९३५५६

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!