नगरपालिका अंबेजोगाई मार्फत करण्यात आलेल्या मराठा सर्वेक्षणाचे प्राध्यापकांचे मानधन त्वरित अदा करण्यात यावे. क्रांतीकारी शिक्षक संघटना
प्रतिनिधी_
महाराष्ट्रात मराठा समाजाचे सर्वेक्षण विविध कार्यालय मार्फत करण्यात आलेलं होते व सर्वेक्षण करणाऱ्या प्राध्यापकांना सर्वेक्षण पूर्ण झल्यावर मानधन अदा करण्यात आलेलं होते पण नगरपालिका अंबेजोगाई मार्फत मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यात आलेल्या प्राध्यापकांना अद्याप त्यांचे मानधन अदा करण्यात आले नसल्याने क्रांतीकारी शिक्षक संघटनेने या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सर्वेक्षण केलेले सर्व प्रगणकांचे मानधन त्वरित अदा करण्यात यावे म्हणून मागणी केली आहे. यावेळी क्रांतीकारी शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव श्री शाहेद कादरी व तसेच शेख शकील नवाब, काझी मुदस्सर मजहर, शेख मुक्तदिर जीलानी, शेख रईस सलीम, तालुका सचिव इम्रान खान इत्यादी उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत