प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

पवार रणनीती च्या चक्रव्यूहात अडकलेला महाराष्ट्र

ऍड अविनाश टी काले , अकलूज 
तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर 
मो न 9960178213


महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक राजकीय डावपेच कोण आखत असतील तर ते आखतात फक्त शरदचंद्र जी पवार साहेब.
याबद्दल आत्ता कोणाचे ही आणि कोणतेही दुमत नाही .
महाराष्ट्रातील साखर सम्राटांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या नव युगातील तालुका जिल्हा निहाय संस्थानिकांना आपल्या कह्यात ठेऊन त्यांच्या माध्यमातून आपल्या राजकीय पक्षाचा पाया अधिक विस्तारित करता आला नाही तरी पायाला अधिक क्षती न पोहचू देता तो मजबूत करणे , त्याची रिपेअरिंग करणे हे काम अव्याहतपणे चालूच असते .
राजकारणात एक तर सत्तेत असले पाहिजे किंवा ती सत्ता आपल्या भोवती च फिरली पाहिजे याची दक्षता घेऊन ते काम करतात , तशी रणनीती ते आखतात .
गाडीचे चाक कोणत्या ही दिशेला फिरले तरी त्याचे फिरणे “आसा भोवती”च असते , तो आस बनण्याचे कसब त्यांच्या कडे आहे .
महाराष्ट्रातील सर्व प्रस्थापित राजकीय पक्ष आपले आपले राजकारण स्वतंत्र करताना दिसले तरी ही त्यांचे राजकारण पवार साहेबांनी निर्माण केलेल्या क्रिया आणि त्या विरोधात असलेल्या प्रतिक्रिया या स्वरूपातच असते ,
याचाच अर्थ असा आहे की त्यांनी टाकलेलं “जाळच”अस असत की , एक तर त्यात लोक अडकतात , आणि निसटल्या सारखे वाटले तरी ते पुन्हा त्या जाळ्या कडे धाव घेतात .
ज्या माशांना या जाळ्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न भाजपा सारखे पक्ष करतात तेच पक्ष त्याच माशांना पुन्हा त्यांच्या जाळ्यात ढकलून मोकळे होतात .
आपणास आठवत असेल की महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा शिवसेना युती अस्तित्वात असताना त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या आणि नेहमी सारखा त्रि शंकू निकाल येताच आपल्या पक्षाचा पाठिंबा त्यांनी शिवसेनेला जाहीर केला .
याचा परिणाम असा झाला की , शिवसेनेची बार्गेनींग पॉवर वाढली .
पुढे अधिकचे पदरात पाडून घेत शिवसेनेने भाजप समवेत सरकार स्थापित केले ही , परंतु त्यात ते आपलेपण राहिलेले नव्हते , आणि युतीत एक अदृश्य अशी फूट पडली होती .
ती भेग अधिक रुंद करणे काळाच्या अधीन सोडून साहेब निवांत बसले असे झाले नाही , त्यास अधिक रुंदावत राहिले ,
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल हा करार होता की नाही हे आपणास सांगता येणार नाही , पण यातून संघर्ष होणार आहे हे ज्ञात असताना ही निवडणूक पूर्वी तो संघर्ष उद्भवला नाही . याचे कारण तसे झाले असते तर भाजपने इतरांच्या मदतीने अधिक जागा लढवल्या असत्या , त्यांना निम्म्या अधिक जागेवर लढावयास लाऊन त्यांच्या निम्म्या जागा अगोदरच कमी केल्या गेल्या होत्या .
याचा अर्थ भाजपा ज्याला मित्र समजत होती तो त्यांचा मित्र राहिला नव्हता तर तो पवारांच्या खेळातील एक खेळाडू बनलेला होता.
पण आत्ता तो आपला विषय नाही .
पवार साहेब यांना सोडून गेलेल्या सहकाऱ्यांना ही त्यांनी त्यांच्या जाळ्यात कसे ओढले ? याची एक रंजक कहाणी आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडून त्यांचे अनेक सहकारी एक तर अजित दादा समवेत गेले होते किंवा ते भाजपा कडे गेले होते ,
आत्ता त्यातील एक एक करून माघारी फिरताना दिसत आहेत , ज्यात बाबा जानी दुराणी सारखे नेते आहेत , तर दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या , ते नरहरी झिरवाळ यांचे पुत्र शरदचंद्र जी पवार आमच्या काळजात असल्याची बाब बोलत आहेत.
अकलूज मधील मोहिते पाटील आणि वेळापूर चे उत्तम राव जानकर दोन्ही ही भाजप कडे गेल्याने भाजप कमजोर सदरात जाऊन इथे खा रणजितसिंह निंबाळकर यांचा विजय झाला होता .
2024ची निवडणूक लागताच अपेक्षे प्रमाणे मोहिते पाटील लोकसभेचे तिकीट मागणार हे नीच्छित असल्याने , पवार साहेबांशी अंतर्गत संधान साधून राहिलेल्या शिंदे परिवाराला त्यांनी कामाला लावले , आणि सर्व भाजपा व मित्र पक्षातील आमदार घेऊन केंद्रात आपले शक्ती प्रदर्शन करून आत्ताच तिकीट जाहीर करण्याचा आग्रह धरला गेला , परिणामी मोहिते पाटील दुखावले , त्यांनी पूनच्छ राष्ट्रवादी कडे आपला प्रवास चालू केला .
प्रत्यक्ष जेंव्हा निवडणूक लागली तेंव्हा भाजप मधील संजय बाबा कोकाटे सारखी मंडळी पवार साहेब यांच्या कडे ओढली गेली ,
ज्या माढा विधानसभा मतदार संघात आ बबनदादा शिंदे 67000मताचे लीड घेऊन विजयी झाले होते तिथे धैर्यशील मोहिते पाटील यांना 52000चे लीड मिळाले .
या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस चे तिकीट संजय बाबा कोकाटे यांना मिळणे अपेक्षित असतानाच
मुंबई तक वर निलेश झलाटे यांच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध झाली
बबन दादा शिंदे यांचे लहान बंधू रमेश शिंदे यांची व सुप्रिया ताई यांची भेट दिल्ली येथे झाली असून ते राष्ट्रवादी काँग्रेस श प कडून उमेदवारी साठी इच्छुक आहेत .
प्रस्थापित घराण्याचे समर्थन आणि याची शक्ती ओळखून पवार साहेब शांत चित्ताने राजकीय डाव टाकत राहतात .
धनगर समाजातील बहुतेक मान्यता प्राप्त नेते भाजप समवेत असल्याने तो चेहरा आपल्या पक्षाकडे हवा म्हणून याच लोकसभा निवडणुकीतील विजयाचे सुत्र म्हणून जुळवा जुळव करताना मोहिते पाटील यांना त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी उत्तम राव जानकर यांचेशी जुळवून घ्यावे लागले , व आत्ता त्यांच्याच खांद्यावर उत्तम राव जानकर यांच्या विजयाच्या जबाबदारी चे ओझे टाकून पवार साहेब निर्धास्त झालेले आहेत .
उत्तम राव जानकर यांची लॉयलीटी किती? हा संशोधनाचा भाग असला तरी हे मात्र नीच्छीत आहे की एकदा ते सत्ताधारी बनले की त्यांचे पर्यायी सत्ता केंद्र निर्माण होण्यास वेळ लागणार नाही . आणि असे झाले तर मोहिते पाटील यांची शक्ती कायम स्वरुपी कमजोर होईल व अशी कमजोर शक्ती पुन्हा राजकारणातून अधिकाधिक कमजोर कशी करता येईल याची रणनीती आखण्याची आवश्यकता ही त्यांना राहणार नाही ,
खासदारकीच्या तुपाच्या बदल्यात हा सर्वात मोठा बडगा त्यांच्या साठी ठरणारा असेल आणि त्याचे दूरगामी परिणाम मोहिते पाटील यांच्या साठी भयावह असतील .
स्वतःचे बारामती मतदार संघात ते असे प्रयोग राबवत नाहीत , पण दुसऱ्याचे मतदार संघात मात्र हमखास राबवतात .
आपल्या कडे एक म्हण आहे “कासायाला गाय धार्जीन” तसे लोक अज्ञानी बनून त्यांचे सावज बनतात त्यास आपण तरी काय करणार?
“आ अमोल मिटकरी ते आ जितेंद्र आव्हाड यांच्या वरील झालेले हल्ले , आणि उपमुख्य मंत्री देवेंद्र जी फडणवीस यांचे ठोकून काढा चे आदेश याचा संदर्भ जोडला जाईल , आणि याचा परिणाम म्हणून भाजपा अधिकाधिक खोलात रुतत जाईल .
लोकशाही वादी असणे , आणि व्यवस्थेचे बळी ठरवून सहानुभूतीची लाट जनतेत निर्माण करणे हेच अपेक्षित आहे ,
आज आ अमोल मिटकरी एकाकी आहेत याचा अर्थ ना अजित दादा कमजोर सदरात ढकलले गेले आहेत असाच निघतो , आणि अजित दादा पवार यांच्या पक्षाला अधिक गळती लागून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस श प बलाढ्य होईल .
या चक्र व्युव्हात अडकणे सोपे आहे , परंतु शांत चित्ताने भाजप व मित्र पक्षाने डागडुजी केली नाही , आणि या रणनीती वर मात केली नाही तर
महायुतीचा पराभव अटळ आहे .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!