अशी लोक क्वचितच असतात त्यापैकी आयु. एस. के. भंडारे हे एक आहेत..! – -डॉ. भीमराव य. आंबेडकर
मुंबई (दि 31/7/2024)- म्हाडा प्राधिकरणाचे समाज विकास अधिकारी आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष/ केंद्रीय कार्यालय प्रमुख तथा समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांची म्हाडा प्राधिकरणातून 34 वर्षे विविध पदावर यशस्वीपणे काम करून दि 31/7/2024 रोजी सेवा निवृत्ती झाली त्यानिमित्ताने सत्कार सोहळा डॉ आंबेडकर भवन दादर या ठिकाणी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात एस के भंडारे यांच्या म्हाडा कार्यालयातील प्रशासनिक व कर्मचाऱ्यांच्या संघटनात्मक सामाजिक कार्याचा गौरव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर, डॉ बाबासाहेबांचे दुसरे नातू व रिपब्लिकन सेनानी आनंदाराज आंबेडकर आणि राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉ हरिश रावलिया यांच्या हस्ते करण्यात आला. हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एस के भंडारे यांच्या कार्याचा गौरव करताना डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर म्हणाले की, एस के भंडारे साहेब हे अत्यंत तरूण पणातच संस्थेच्या कार्यात उत्साहात काम करत होते. याची कल्पना मला महाउपासिका मीराताई आंबेडकरांनी दिली. ताईसाहेब एस के भंडारे यांच्या लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी दादर मार्केटमध्ये गेल्या होत्या. ताईसाहेब बस्ता बांधून घरी आल्यानंतर ताईसाहेबांना मी स्वतः विचारणा केली कि आई तु कुठे गेली होती. तेव्हा ताईसाहेब म्हणाल्या की, आपल्या संस्थेचा एक तरुण आणि हुशार कार्यकर्ता आहे तो धार्मिक कार्यात खूप उत्साहाने काम करतो. अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाणे आवश्यक आहे. असे म्हणून ताईंनी भंडारे यांच्या कार्याचे कौतुक केले. भीमराव आंबेडकर साहेब पुढे म्हणाले की,सरकारी कर्मचाऱ्यांनी भंडारे साहेबांचा आदर्श घ्यायला हवा कारण सरकारी अधिकारी असून ही न डगमगता सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी त्यांनी वाहून घेतले आहे. अशी लोक क्वचितच असतात त्यापैकी भंडारे हे एक आहेत.असे नमुद करून आंबेडकरांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉ हरिश रावलिया यांनी आपल्या भाषणात भंडारे साहेबांच्या बाबतीत बोलताना म्हणाले की भंडारे एक नारळ आहेत. वरून कडक आतून नरम आणि गोड हे मला काही कालावधीनंतर लक्षात आले. पुढे जाऊन ते संस्थेसाठी खूप काही करू शकतात याची मला खात्री आहे! कारण त्यांच्या मनात आंबेडकर परिवार आणि संस्थे बदल नितांत आदर आहे. ते भविष्यात संस्थेचे ट्रस्टी होऊन संस्थेला कायदेशीर अडचणीतून बाहेर काढून न्याय मिळवून देतील अशी आशा व्यक्त करून त्यांनी भंडारे यांचे भरभरून कौतुक केले.
एस के भंडारे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कुटुंबाचा विचार न करता समता प्रस्थापित करण्याकरिता समाजाचा विचार करून तुम्हा- आम्हाला समतेत आणून सुटाबुटात आणले, स्वाभिमान दिला त्यामुळे आपण काम करणे गरजेचे आहे व भारतीय संविधानाने धार्मिक व सामाजिक कार्यात सर्व नागरिकांना,
सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा सहभागी होण्याचा अधिकार दिला आहे.संस्थेच्या माध्यमातून आपण जीव तोडून धम्म प्रचार करतो परंतु त्याचा लेखाजोखा ठेवत नाही. कार्य अहवाल बरोबरच आर्थिक लेखा जोखा ही देऊन आपला व संस्थेचा आरसा स्वच्छ ठेवला पाहिजे. भविष्यात आपण सर्व मिळून दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून कार्य अधिक अतिमान करूया असा संकल्प करून कामाला लागू या असे सर्वांना आव्हान केले.
एस के भंडारे यांचे व्यक्तिमत्त्व रोखठोक, शिस्तबद्ध आहे. जे मनात आहे ते ओठांत आहे. ते फणसाप्रमाणे बाहेरून कडक व आतून गोड आहेत. त्यांचे व्यक्तीमत्त्व अभ्यासु व बहू आयामी असल्याच्या भावना, प्रामुख्याने ट्रस्टी व आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रवीण निखाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय महिला विभाग प्रमुख सुषमाताई पवार, राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी, राष्ट्रीय सचिव तथा केंद्रीय प्रशिक्षण विभाग पप्रमुख डॉ अँड एस एस वानखडे, आयबिसेफचे केंद्रीय अध्यक्ष तथा राज्य परिवहन कास्टट्राईब कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनिल निरभवने, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे,महाराष्ट्र राज्य महिला शाखा अध्यक्ष व आयबिसेफ स्वातीताई शिंदे,कॅनरा बँक एस सी एस टी असोसिएशनचे अध्यक्ष शरद कांबळे,विदयापीठ कर्मचारी संघटनेचे दीपक मोरे, म्हाडा Mks युनियनचे संतोष खरात,मुंबई महिला शाखा अध्यक्ष वैशाली अहिरे, मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास वानखडे इत्यादीनी व्यक्त केल्या. आयोजकांनी आवाहन केल्यानुसार कार्यकर्त्यांनी एस के भंडारे यांना शुभेच्छासाठी पुस्तके देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एच गायकवाड यांनी केले.
म्हाडा प्रशासन व महाराष्ट्र गृहनिर्माण कर्मचारी संघटना, म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटना आणि ग्रॅज्युएट इंजिनियर्स असोसिएशन ऑफ म्हाडा, कम्युनिटी डेव्हलोपमेंट ऑफिसर्स वेलफेयर असोसिएशन ऑफ म्हाडा यांच्यावतीने सायंकाळी 5 वाजता म्हाडाच्या गुलझारीलाल नंदा सभागृहात म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर व शिवकुमार आडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव अनिल वानखडे, मुख्य अधिकारी व उपमुख्य अभियंता अनिल अंकलगी (अध्यक्ष, ग्रॅज्यु एट इंजिनियर्स असोसिएशन ऑफ म्हाडा ),किशोरकुमार काटवटे (अध्यक्ष म्हाडा Mks युनियन ), उपमुख्य अधिकारी लक्ष्मण मुंडे, महाराष्ट्र गृहनिर्माण संघटनेचे माजी अध्यक्ष मधुकर विचारे, कार्यकारी अभियंता अभय रामटेके इत्यादी प्रमुख मान्यवरांनी एस के भंडारे यांच्या कार्याचा गौरव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गौरव सोहळ्यात एस के भंडारे यांच्या पत्नी सुमेधा, मुलगी सुचेता, वडील कल्लापा भंडारे गुरुजी, सासरे वसंतराव कांबळे, बंधू रविंद्र भंडारे यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका झनके व महेश देशपांडे यांनी केले.दोन्ही सत्कार कार्यक्रमासाठी ठाणे, रायगड, नवीमुंबई, पालघर, पुणे, सांगली व मुंबई मधून मोठया संख्येने उपस्थिती होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत