मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्ग पोलिसांची मोठी धडक कारावाई

नळदुर्ग पोलीसांनी 1 कोटी 5 लाख 78 हजार 800 रुपयेचा गांजा मोठया शिताफीने पकडला

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

उमरग्याहुन सोलापुरकडे जाणाऱ्या स्कार्पिओ गाडीतुन 1 कोटी 5 लाख 78 हजार 800 रुपयाचा गांजा नळदुर्ग येथील राजा बागसवार दर्गाहसमोर राष्ट्रीय महामार्गवर नळदुर्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडला आहे. नळदुर्ग पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे.
सोलापुर –हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरून नेहमीच गांजासाह गुटख्याची कायम तस्करी सुरु असते. दि. 30 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग पोलिसांची रात्री राष्ट्रीय महामार्गवर गस्त सुरु होती यावेळी उमरग्याहुन सोलापुरकडे भरधाव वेगात स्कार्पिओ गाडी क्र. एम. एच. 08 झेड 5684 ही जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी नळदुर्ग येथील राष्ट्रीय महामार्गवर ही गाडी अडविली. गाडी थांबल्यानंतर गाडीची तपासणी केल्यानंतर गाडीत मोठ्याप्रमाणात गांजा आढळून आला. यावेळी अतिष राजकुमार माने याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हा गांजा आपण सोलापुरला घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यांचबरोबर त्याच्याकडे चौकशी केले असता यामध्ये भीमराव दिलीप खडसुळे, राम दिलीप खडसुळे, डी. जे. चहाविक्रेता, कळवे, रवी सर्व रा. सोलापुर व राहुल रा. अहमदनगर हे यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले.या सर्व आरोपीवर नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील अतिष राजकुमार माने याला अटक करण्यात आली आहे.
स्कार्पिओ गाडीतुन पोलिसांनी एकुण 528 किलो गांजा जप्त केला आहे त्याची किमत 1 कोटी 5 लाख 78 हजार 800 रुपये इतकी किमत आहे. गांजा व स्काकर्पिओ गाडी असा एकुण 1 कोटी 15 लाख 78 हजार 800 रु्पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अलीकडच्या काळात राष्ट्रीय महामार्गवर इतक्या मोठ्या किमतीचा गांजा पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे.याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कांगुने हे करीत आहेत.
सदरील कारवाई नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कांगुने, सुरज देवकर आटुळे, पोलिस उपनिरीक्षक ईश्वर नांगरे, गिते यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.पोलिसांच्या या कारवाईचे सर्वस्तरातुन स्वागत होत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!