मातंग बांधवा जागा हो अजूनही वेळ गेलेली नाही….
राजकुमार सुर्वे,
(समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने )
कटू पण सत्य
मातंग समाजातील सुशिक्षित युवा पिढीने निराशा केली. … त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या…. पण तेही मळलेली वडिलोपार्जित मानसिकता घेऊन त्याच वाटेवर चालत आहे आहेत…. ज्या वाटेवर त्यांना कधीच विकास ,सन्मान, प्रतिष्ठा, आत्मभान स्वाभिमान मिळणार नाही….. फार फार तर शिक्षण घेतल्याने धंद्याला लागले तर आर्थिक विकास होईल पण सामाजिक अध्यात्मिक सांस्कृतिक वैचारिक विकास जसा होता तसाच राहणार . समाजाचा सर्वांगीण विकास केवळ शिक्षणाने आणि नोकरीने होतो असे नाही .त्याला मजबूत वैचारिक व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल अधिष्ठान लागते.. आपल्या बापजाद्यानी देवाधिकाच्या नादी लागून आपल्या पिढ्या बरबाद करून घेतल्या.. त्याच वाटेव हा वर्गही रुळलेला दिसतो आहे…
समाजातील वर्षावरील ज्येष्ठान विषयी आमची काही तक्रार नाही कारण त्यांची मानसिकता आहे तशीच आहे. त्यांच्याकडून काही होईल अशी अपेक्षाही नव्हती. शिकल्या सवरलेला नवा वर्ग सुशिक्षित नोकरदार वर्ग यांच्याकडून अण्णाभाऊंच्या दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करण्याचे होण्याचे अपेक्षित होते .परंतु अण्णाभाऊ साठे यांचा परिवर्तनाचा जग बदलाचा विचार या पिढीलाही नकोसा वाटतो .त्यांना अण्णाभाऊ केवळ आमच्या समाजात जन्मले म्हणून हवे आहेत . त्यांनी सकल उपसंचा अपेक्षितांचा आवाज ठेवला आपल्याच हातातून आवाज उठवला त्यांचं दुःख वेशीला टांगलं.त्यांनी परिवर्तनाचा म्हणजे आंबेडकरी विचाराचा स्वीकार केला ., हे यांच्या ध्यानी मनी हिशोभी कुठेच नाही.. अण्णाभाऊ हवे पण त्यांचा दिलेला विचार नको अशी विचित्र परिस्थिती आहे,.. आधीच समाजातील अज्ञानी अडाणी लोकांनी तुमचे बाबासाहेब असतील तर आमचे लहुजी साळवे अशी स्पर्धा लावलेलीचं आहे… अण्णाभाऊ ,जय लहुजी ,फक्त पिवळे वादळ या पलीकडे त्यांची मती खुंटते.. ज्यांनी अंधाऱ्या नरकातून बाहेर काढल, संविधानाच्या माध्यमातून आरक्षित केलं अधिकार बहाल केल. माणसात आणल ते बाबासाहेब यांना नको आहेत बाबासाहेब हे महारांचे आहेत. आकाश एवढ्या बाबासाहेबांना यांनी महाराचा शिक्का लावून ठेवला.आणि ज्या व्यवस्थेने पिढ्यान पिढ्या जनावरापेक्षाही हिन वागून दिल्या . सर्व विकासाच्या वाटा जेरबंद केल्या आणि ज्या व्यवस्थेविरोधात अण्णाभाऊ लिहीत राहीले. त्या मानसिकतेचे व व्यवस्थेचे हे आजही गुणगान करताना दिसतात.,. एकीकडे आंबेडकरी विचारधारा जगाने स्वीकारली असे चित्र दिसते तर दुसरीकडे हे अक्कलबहादुर केवळ इतरांना करण्यापूर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आणि फोटो वापरतात…. देशात पटवर्धक असलेली कट्टर विरोधक असलेली आरएसएस देखील आज बाबासाहेबांची प्रतिमा लावण्या मजबूर आहे., आंबेडकर विचार घेऊन अनेक देशात पीडित उपेक्षित लोकांनी क्रांत्या घडवल्या त्यांची जात कोणती यांचा धर्म कोणता भाषा कोणती…हे यांना कोण सांगणार,.,.. सार्वजनिक कार्यात, मंदिरात प्रवेश ना करणाऱ्या व्यवस्थेचे अजूनही पाईक आहेत. त्यांची चाटूगिरी चमके गिरी लाचारी थांबलेली दिसत नाही . शेवटी लाचार करणार काय ?समाजाला कोणाच्यातरी दावणीला नेऊन बांधणार वर्षानुवर्ष हेच चालू आहे.. ज्या व्यवस्थेने अगदी अलीकडे 1950 पर्यंत मांगाला रोटी वाढा माय साहेब म्हणंत फिरवले.. मांगाची जात आणि वाखाचं तरहाट, मांग आणि भलतीच खबर सांग असे गाव गा ड्यात अविश्वासी ओळख निर्माण केली. समाजाला इमानदारीचे मिळालेले हे बक्षीस आहे .ती व्यवस्था यांना आपली वाटते..,
हे झालं ज्येष्ठ आणि अज्ञानी वर्गाच पण शिकलेला वर्ग तरी वे गळं काय करतो शिकलेली मुलं तरी काय करतात… अनेक मातंग समाजातील तरुणांनी औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन नोकरी मिळवल्या. शिक्षणानंतर त्यांच्या गावी पाहाल तर त्यांचे त्यांचे आई वडील आणि ते स्वतः देखील कीर्तनात दंग दिसतात.., खरा बाप सोडून दुसऱ्याच कोणाच तरी गुणगाण करताना दिसतात,.,. समाजात अधिकारी वर्ग शिक्षक वर्ग डॉक्टर वकील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहे .. कोणीतरी समाजाच नीट प्रबोधन करेल ? त्यासाठी स्वतः प्रबोधित व्हावे लागेल…. अण्णाभाऊ एक ऑगस्टला अंगात आणायचे आणि वर्षभर त्यांच्या विचाराची हत्या करायची हे आता थांबविले पाहिजे. समाजातील जी माणसं आंबेडकर विचारधाराआत्मसात करत नाहीत ती कधीही अण्णाभाऊंचे अनुयायी असूच शकत नाही,.. प्रत्येक समाज सुधारक,महापुरुष महामानव यांची उभारणीतील एक अहे म भूमिका असते. तीन नाकारण्याच काही कारण नाही.. सामाजिक चळवळीतील एक त्यांचं अबाधित असं स्थान असते .परंतु आपण कोणत्याही एकाची दुसरी अशी दुसऱ्याशी तुलना करायची नाही अथवा त्यांच्या त स्पर्धा लावायची नसते…. लहुजी वस्ताद यांनी त्यांच्या क्षमतेप्रमाणे नक्कीच कार्य केले ते प्रेरक ही आहेत… पण त्यांना पूर्ण व्यवस्था बदलता आली नाही… खऱ्या अर्थाने आपली गुलामी संपवण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहावं लागलं आणि त्यात अस्पृश्यता पाळने माणसा माणसात भेद करणेगुन्हा आहे असं प्रावधान करावं लागलं… आपल्या सर्वांनी उन्नतीसाठी शिक्षणा त नोकरीत आरक्षित कराव लागल .जर हे लहुजी वस्ताद साळवे यांनी 18 व्या शतकातच केलं असत तर मग आपण तेव्हाचं प्रगती आरुढ झालो असतो. पण तसे झाले नाही आज समाज जो लहुजी लहुजी करतोय याबाबतीत मी अण्णाभाऊच बरच साहित्य वाचलं.त्यात या बाबतीत काही मला तरी मिळालेले नाही. तसे असते तर अण्णाभाऊंनीच आपल्याला हा रस्ता दाखवला असता असता…तसे झाले असते तर अण्णाभाऊ… जग बदल घालून घाव सांगून गेले माझे लहुजी वस्ताद… असं बोलले असते परंतु ते बाबासाहेबांच्या माध्यमातून झालं … अण्णाभाऊ असं म्हणतात जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव.., ज्यांची आज आजआपण जयंती करतो त्यांचा मूळ संदेश हा आंबेडकरी विचारधारेने मार्गक्रमण करा असा आहे …म्हणजेच परिवर्तनाचा विचार घ्या असा आहे …म्हणजे काय करायचं आधीचे जीर्ण कपडे काढून नवीन कपडे घालायचे . जुना विचारय त्या गायचा आणि नवा विचार आत्मसात आत्मसात करायचा.. म्हणजे नशे नशीब, देव नरक स्वर्ग अंधश्रद्धा अज्ञान चुकीच्या चाली रीती परंपरा ,विचार करा सोडून द्यायचे नवा वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करायचा असा त्याचा अर्थ आहे हे न करता.,.. अण्णाभाऊ की जय बोलो और किधर भी चलो असं नाही… मातंग समाजाचे गाडी जोवर अण्णाभाऊ लहुजी साळवे यांच्या पुढे सरकत नाही तोवर त्यांच्यान सर्वांगी विकासाची कल्पना करणे ही केवळ मृगजल ठरेल. तशी सुतराम शक्यता नाही…. आताची ही वेळ निर्णायक आहे. आता जर समाजातील युवा पिढीने आपल्या डोळ्यावरचेआणि मतीवरचे झापडं काढून फेकली नाही तर या समाजाच काही खरं नाही..
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कोणालातरी खुश करण्यासाठी घ्यायचं .,. मंचावर कार्यक्रमापुरती त्यांची प्रतिमा ठेवायची..,.. समाजात जय लहुजी…..कुठे जय लहुजी ला जय अण्णाभाऊ जोडायच आणि कुठेकाठे थेट राम राम अशी अभिवादन करत आपल्या कोत्या प्रवृत्तीची जाणीव करून द्यायची.. याच्यात कोणाचेही नुकसान नसले तरी याच्यात समाजाचे भले ही नाही … हे कशाचे द्योतक आहे? आपणं जिथं होतो तिथेच आहोत .. जागेवरून हललेलो नाही.आंबेडकरी विचारजगाने स्वीकारलेला आहे . तो आंबेडकरी विचार तुम्ही नाकारून इतरांचं नाही तुमचं नुकसान होणार… आंबेडकरी विचार हा कोणाला खुश करण्यासाठी नाही तो आपल्या जगण्याचा भाग झाला पाहिजे तो आपल्या श्वासाशी जोडला गेला पाहिजे कारण त्यात इतर कोणाचेही नाही आपले भले आहे आपल्या जीवनाला दिशा आणि प्रेरणा मिळेल .आपल्या जीवनातील सारे अज्ञान पराभूत मानसिकता निराशा बदलून टाकून नवचेतना घेऊन खऱ्या अर्थाने विकसित व्हायचा असेल पुढे जायचं असेल तर ही मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक आहे.. एकेकाळी आपल्यासारखी परिस्थिती असलेला आंबेडकरी समाज पुढे गेला याच कारण केवळ शिक्षण नाही, शिक्षण तर तुम्ही घेतलं होतं .तो पुढे गेला आपण मागे का काहीतरी गफलत आहे.. त्याने शिक्षणही घेतलं आणि मानसिकता बदलली तुमच्यासारखातो सुट्ट्यामध्ये देवा ज्योतीला
देव देवीला माफ करत नवस करत फिरत नाही वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला त्याचे फलित आहे हे समजून घेतलं पाहिजे., डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने झोपडीतले जे मातंग समाजातील तरुण महालात गेले . कधीकाळी आपल्याला टायरच्या चपला सुद्धा नव्हत्या असल्या तरी त्या घालण्याची मुभा नव्हती.अशी परिस्थिती बदलणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे थोडे फार तरी उतराई होण्याची भावना मनात मनात जागृत करावी आणि लयास चाललेला दिशाहीन समाज अण्णाभाऊ साठे म्हणतात, त्याप्रमाणे बदलाच्या मार्गावर आंबेडकरी मार्गावर आणून उभे करावा ही आज खरी गरज आहे असे केले नाही तर हा मोठा अपराध ठरेल . ज्याचे दूरगामी परिणाम या समाजाच्या वाट्याला येऊ शकतात…. आंबेडकरी विचारधारा ही कोणत्या एका समूहाची , समाजाची धर्माची , देशाची मालमत्ता नसून जगाला परावर्तीत करणारा आणि प्रत्येक माणसाला माणूस बनवणारा हा क्रांतिकारी विचार आहे .याला नाकारू नका .. हे करुन सारे गमावून बसाल,. विरोधाला विरोध करून याआधी बरच काही गमावलं आहे …तुम्ही केवळ शिकून चालत नाही सुशिक्षित होऊन चालत नाही ,,
ज्ञानवंत होऊनही चालत नाही . तुम्ही आता प्रज्ञावंत झाले पाहिजे… अण्णाभाऊ यांनी दाखवलेल्या मार्गावर परिवर्तनाच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येकाला अण्णाभाऊ साठे जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा… राजकुमार सुर्वे, संयोजक परिवर्तन एक लोक चळवळ (लेखक गेली दिड दशक मातंग समाजाच्या सामाजिक जागृती अभियानात कार्यरत आहेत)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत