राजकारणातील नायक , खलनायक हा मीडियाचा प्रोपोगंडा ,,,,,,!
ऍड अविनाश टी. काले . अकलूज
तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर
मो न 9960178213
मी अनेक वर्ष पत्रकारितेत होतो , पत्रकारिता ही निष्पक्ष असली पाहिजे हे आदर्श तत्व झाले पण वास्तवात तसे होत नाही .
पत्रकार हा ही जींवत माणूस असतो आणि त्याची मते सार्वजनिक वावर या मधून घडतं असतात , तो ज्या प्रवर्गातून आलेला आहे , त्या प्रवर्गाचा , जातीय संरचनेचा , सामाजिक स्थिती चां कळत नकळत त्याचेवर प्रभाव हा असतोच असतो , त्यातून त्याचा मानसिक कल बनत जातो .आणि आपल्या स्वतः चे दृष्टिकोनातून त्याचे लिखाण बाहेर पडत असते .
दुसऱ्या बाजूने आपण पाहिले तर शोध पत्रकारिता ही फारशी राहिलेली नाही .
अनेक पत्रकारांना त्या त्या चॅनल किंवा वृत्त पत्र मालकांनी विशिष्ट ठिकाणी कायमचे नेमलेले असते .
आणि ही बाब आपणास मुंबई येथील विविध पक्षाच्या पदाधिकारी , पक्ष नेते , सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचे मुख्य नेते यांच्या ऑफिस मध्ये ठान मांडून बासलेले पत्रकाराचे जथ्थे दिसत राहतात .
सत्ताधाऱ्यांनी घेतलेले निर्णय , एकजण सांगतो तर दुसरे त्यातील कमतरता सांगतात यातून जनतेचे शिक्षण होते ,
आजवर मीडिया मध्ये अगदी संपादक म्हणून काम करून ही माझे असेच मत होते .परंतु नंतर हळू हळू लक्षात यायला लागले की ही बातमीपत्रे मोजक्या लोकांच्या भौवती फिरत राहतात , आणि त्यांच्याच क्रिया प्रतिक्रिया या भौवती फिरत राहिल्याने हे समग्र जग फक्त त्यांच्या पुरते मर्यादित आहे की काय असा भास निर्माण होण्यास सुरुवात होऊन आपली मानसिक स्थिती अशी निर्माण होते की तेच फक्त व्यवस्थेला आकार देऊ शकतात , निर्णय घेण्याची , प्रशासन चालवण्याची क्षमता फक्त त्याच वर्गात आहे
आपण फक्त मुकी मेंढरे आहोत , कमजोर आहोत , आणि मग सामान्य माणूस फक्त कार्यकर्ता बनू शकतो अश्या निष्कर्षाप्रत आपण येऊन पोहचतो .
महाराष्ट्राची च नाही तर समग्र देशाची सामाजिक धार्मिक रचना च अशी अस्तित्वात होती व आहे की पूर्वाश्रमीच्या क्षत्रिय वर्गाच्या हातात गाव गाड्या पासून ते देशाच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात हा समाज राहिला .
परंतु सामाजिक पातळीवर त्यांच्या ही वर असणाऱ्या ब्राम्हण वर्गाकडे प्रशासकीय चाव्या असल्याने आणि सामाजिक मान्यता असल्याने शीर्ष सत्ता स्थानी केंद्रीय पातळीवर हा समाज शासक म्हणून राहिला .
यातील काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव , आणि गांधीवादी उदार मतवादी भूमिकेतून थेट मागासवर्गीय समाजाला ही सत्ता भागीदारीत सामावून घेत राहिला .
पण असा लोकप्रतिनिधी कोण असावा याचा निर्णय हा त्यांच्या स्थानिक क्षत्रिय नेत्यांच्या निर्णयाधिन राहिला .
पुढे या क्षत्रिय वर्गातील नेत्याचे संस्थानिकात रूपांतरण झाले ,
आणि या सत्तेला शह देण्यासाठी धार्मिक विचारसरणी आधारे हिंदुत्वाची विचारधारा निर्मिती झाली .
महाराष्ट्रात जेधे जवळकर यांनी ब्राम्हणेतर चळवळीची सुरुवात केली , याचे पडसाद म्हणून ब्राम्हण सीकेपी समूहाने मराठेतर ओबीसी व हिंदू मधील एस सी, एस टी, प्रवर्गातील समूहांना सत्तेच्या लढाईत उतरवले आणि त्यांच्या माध्यमातून ते तळागाळात सर्व दूर पसरले ,
अंतिम सत्ता प्राप्त करायची असेल तर मराठा नेत्यांना ही बाजूला ठेऊन चालणार नाही हे हेरून आपली राजकीय शक्ती वाढवण्यासाठी काँग्रेस मधील सत्ता संघर्षातून झालेल्या दुफळीचा आधार घेऊन त्यातील कांहीं जणांना आपल्या बाजूला ओढण्यात हिंदुत्व वादी पक्ष यशस्वी झाले
आणि इथेच आपल्या सत्तेला शह बसतो आहे हे हेरून मराठा समाजाचे प्रबळ नेतृत्व शरदचंद्र जी पवार साहेब यांनी , पेशवाई ची वस्त्रे , फुले पगडी हे मुद्दे पुढे आणून “मराठा”
अस्मितेला फुंकर घातली .
पेशवाई पगडी नाकारून त्यांनी प्रतीकात्मक संदेश समाजात दिला .
मराठा समाजातील संभाजी ब्रिगेड सारख्या चळवळी नी तो विचार मराठा समाजात दूरवर नेला .
भाजपा व शिवसेना यांच्यातील सत्ता संघर्षाची दुसरी ही बाजू आहे ,
घाटावर आल्या की “मराठा ” अस्मितेचे राजकारण करणाऱ्या सुप्रिया ताई सुळे या घाट उतरला की सीकेपी अभिमान आणि गर्व याची भाषा करत ,, तसे त्यांचे गणपती कालखंडातील फोटो प्रसिद्ध झाले आहेत . तसेच त्या हिंदू हृदय सम्राट कै बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी च्या सुष्णा आहेत , या नाते संबंधातून त्या ठाकरे पवार घरण्याच्या एकत्री करनाचा दुवा ठरल्या.
दुसऱ्या बाजूने पवार घराण्याचा राजकीय वारसदार ठरवणे ही पवार साहेब यांची गरज बनली , आणि आपला वारस ह्या खा सुप्रिया ताई सुळे च असल्या पाहिजेत हे त्यांनी ठरवल्या नंतर , पुतणे ना अजित दादा यांना बाजूला सारणे ही त्यांची प्रर्थमिक ता ही राहिली ,
महाराष्ट्रातील त्री शंकू आलेले निवडणूक निकाल यातून एक बाब स्पष्ट झाली की कोणतेही दोन पक्ष एकत्रित आल्या शिवाय सरकार बनत नव्हते .
केंद्रीय सत्तेशी जुळवून घेण्याच्या चर्चा घरा अंतर्गत करून त्यांनी अजित दादा यांना भाजप समवेत सत्ता बनवण्यास सांगितले , आणि स्वतः ची धर्म निरपेक्ष छबी कायम राखण्यासाठी ते बाहेर राहिले ,
भाजपा ला सत्ता स्थापनेची घाई असल्याने त्यांनी राष्ट्रपती राजवट उठवली आणि पहाटेचा शपथ विधी पार पडला . पण हा फक्त 80 तास इतका राहिला , सुप्रिया ताई ते काकी यांच्या मदतीने भावनिक नाट्य निर्माण केले गेले . व त्यास अजित दादा बळी पडले .
एक एक करून पुन्हा विधायक पवार साहेब यांच्या कडे परतले , अजित दादा यांना पुन्हा उप मुख्य मंत्रिपद दिले गेले , पण शेवटी हे निर्वाचन होते , त्यात त्यांची स्वतः ची शक्ती नव्हती .
इकडे शिवसेनेचा पक्ष प्रमुखांचां रिमोट कंट्रोल बाजूला ठेऊन तुम्हीच मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे असे उद्धव जी ठाकरे यांना सांगण्यात आले , आणि इथेच ना एकनाथ जी शिंदे दुखावले गेले .
देवेंद्र जी फडणवीस यांच्या मनात त्यांच्या प्रति षडयंत्र रचल्याचा राग होताच , आणि यातून केंद्राच्या मदतीने त्यांनी सीबीआय , ई डी अश्या चौकशीचे ससेमिरे विरोधी पक्षाच्या मागे लावले ,
असंतुष्ट नेत्यांना त्यांनी साद घातली , सत्ता तुम्ही घ्या , पण हे सरकार गेले पाहिजे अशी भूमिका त्यांनी स्वीकारली , आणि शिवसेना सहित महा विकास आघाडीला सत्ता सोडावी लागली .
इथून पुढे भावनिक राजकारणाला सुरुवात झाली , वर्षा बंगला निर्विकार पणे उद्धव जी ठाकरे यांनी सोडला आणि कला नगर मधील मातोश्री पर्यंत त्यांच्या वर फुलांचा वर्षाव झाला ,
पुढे हे प्रकरण इथेच थांबले नाही , आणि विरोधी पक्ष कुमकुवत करण्यासाठी थेट त्या पक्षावर दावा ठोकण्यात आला आणि पक्ष संस्थापक बाजूला सारून शिवसेना एकनाथ जी शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा यांच्या कडे वर्ग झाली .
यातून सहानुभूती मिळाली ती पवार साहेब यांना आणि उद्धव जी ठाकरे यांना .
या बातम्या प्रसार माध्यमावर इतक्या आदळत राहिल्या आणि इतिहासातील “अनाजी पंत ” ही पदवी देवेंद्र जी फडणवीस यांना देऊन त्यांची प्रतिमा ही पूर्णतः मलिन करण्यात आली ,
राजकीय डावपेच म्हणून या बाबी कडे न पाहता त्यांना खलनायक ठरवण्यात आले , तर अजित दादा आणि एकनाथ जी शिंदे यांना गद्दार ठरवण्यात आले .
या त्यांच्या प्रतिमा समाज माध्यम वापरून इतक्या गढूळ केल्या की त्यांनी कांहीं चांगले निर्णय घेतले तरी ही त्याची महती जनतेच्या दृष्टीने कवडीमोल झाली .
त्यातच भाजप ने 400 पार चां नारा लोकसभेत दिला आणि त्याचे पडसाद अल्पसंख्यांक आणि दलीत , आदिवासी मध्ये अगदी विरोधी रीतीने उमटले ,
भारतीय लोकशाही ला गंभीर धोका असून भारतात भाजपाच्या रूपाने एक पक्षीय राजवट आणावयाची आहे , आणि त्या साठी समग्र विरोधी पक्ष मुळापासून उखडून फेकायचे आहेत .
कालपर्यंत हिरो असलेले मोदी जी ही टीकेचे धनी झाले , आणि त्यांच्या ही सभे कडे लोक पाठ फिरवू लागले .
आजच्या घडीला महा विकास आघाडी ही महाराष्ट्रात खलनायकाच्या भूमिकेत आहे , आणि याच भरवशाच्या आधारे महा विकास आघाडी पुन्हा सत्ता हस्तगत करू पाहत आहे .
यातील मुख्य मुद्दा हा हाच आहे , की नायक असलेल्यांनी समाजाला काय दिले ?
आपणास आठवत असेल की काँग्रेस च्या काळात ऐतिहासिक शेतकरी कर्ज माफी झाल्या नंतर शरदचंद्र जी पवार साहेब यांनी अश्या प्रकारच्या माफी पुन्हा देण्यात येणार नाहीत , या मुळे आर्थिक शिस्त बिघडेल असे वक्तव्य केले होते
जागतिक मुक्त बाजारपेठ , मुक्त स्पर्धा , उदारी करण, खाजगी करण , ही आर्थिक धोरणे काँग्रेस ची ही आहेत , आणि तीच भाजपा ची ही आहेत ,
मग या आर्थिक धोरणातील नेमका फरक काय आहे ?
सत्ता वाटपाच्या विकेंद्रिकरणाची बाब बोलणाऱ्या पवार साहेबांच्या घराण्यातील किती खासदार किती आमदार आज सत्तेत आहेत ?
अजित दादा समवेत असणाऱ्या नेत्यांची मुले आणि मुले शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस चे दावेदार बनतात , हे नरहरी झिरवळ ते दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा पर्यंत दिसून येते ,
शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून आदित्य ठाकरे राज्याच्या केबिनेट मधील मंत्री बनतात .
सामान्य माणसासाठी सत्तेची कोणती संधी उपलब्ध आहे?
प्रतिगामी हरले , पुरोगामी जिंकले याचा आनंद व्यक्त करणारे आमच्या सारखे खुळे फक्त टाळ्या वाजवण्याचा आणि त्यांच्या सत्ता वाहण्याच्या पालखीचे भोई आहोत .
मागास वर्गीय समाजातील पक्ष हे जातीय रचने मुळे सत्ता स्थानी पोहचत नाहीत हे वास्तव मान्य करून
आम्ही या निष्कर्षावर आलेले आहोत की
पुरोगामी, प्रतिगामी , धर्म वादी , निधर्मी ही त्यांची पोकळ शाब्दिक बडबड आहे , शाहूमहाराज महा विकास आघाडी कडे तर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी राजे हे महायुती कडे , हे वास्तव आम्हाला उमगले आहे ,
म्हणून निरर्थक लढाईत न पडता है पक्ष आम्हाला नवबौध्द व मातंग समाजाला उमेदवारी देतील त्याच पक्षाच्या समवेत आम्ही राहण्याचा निर्णय घेतलेला आहे ,
महा युतीने विधान सभेत जागा वाटप करताना नवबौध्द व मातंग समाजाला योग्य प्रतिनिधित्व दिल्यास आम्ही महायुतीचा प्रचार आणि प्रसार करू व ती क्षमता आमच्या लेखणीत आणि वाणीत ही आहे .
माळशिरस , फलटण , मोहोळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस ने जाहीर केलेल्या उमेदवारी पाहता त्यांची मानसिकता नवबौध्द व मातंग समाजा प्रति न्यायाची नाही , माळशिरस तालुक्यात तर सरळ सरळ बनावट जात दाखला घेऊन उभे राहिलेल्या उत्तमराव जानकर यांना उमेदवारी देऊन मोहिते पाटील यांच्या शक्ती वर अंकुश ठेवण्याचे काम करतानाच आमच्या खऱ्या मागासवर्गीय समाजावर अन्याय करण्यात आलेला आहे .
या व फलटण तालुक्यातून तीन टर्म चर्मकार समाजाला प्रतिनिधित्व मिळालेले आहे , आणि अजून ही ते पर्याप्त वाटत नसेल तर आम्हाला ते खुळे समजत आहेत ,
हे या पुढे चालणार नाही
या अन्यायाच्या विरोधात आम्ही रणशिंग फुंकले आहे ,
महा युती तील कोणत्याही पक्षा कडून उमेदवारी मिळाली तर ही निवडणूक आम्ही लढवू आणि महायुतीच्या पारड्यात ही जागा खेचून आणण्याची हमी आम्ही आमच्या या दोन समाजाच्या आधारे देत आहोत ,
आमची मागणी न्याय पूर्ण आहे , एक टर्म नवबौध्द व दुसरी टर्म मातंग समाजाला मिळालीच पाहिजे ,
जे पक्ष ही उमेदवारी मान्य करतील ते आमच्या साठी नायक व जे आम्हाला नाकारतात , व कायम नाकारत आले आहेत ते आमच्या साठी खलनायक आहेत,,,,,
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत