क्रांतिकारी, क्रांतिरत्न ,लोकशाहीर ,लेखक डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त,,,,,,,,,!
ऍड अविनाश टी • काले , अकलूज
तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर
मो न 9960178213
लोकशाहीर , क्रांतिकारी लेखक म्हणून डॉ अण्णा भाऊ साठे आज सर्वदूर परिचित झालेले आहेत , त्यांची जयंती , आणि पुण्यतिथी ही सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरी केल्या जात आहेत .
आण्णा भाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे गावखेड्या तील गवकुसा बाहेरील मातंग वस्तीत झाला .तो दिवस होता 1ऑगस्ट 1920
त्या काळी अस्तित्वात असलेली दाहक अस्पृश्यता आणि त्या मुळे असलेलं दारिद्र्य हे गावकुसां बाहेरील पूर्वाश्रमीच्या महार व मातंग वाड्यात हमखास असायचेच
शैक्षणिक परंपरा नाहीत , आत्ताशी कुठे इंग्रज शासका मुळे शिक्षणाची दारे खुली होऊ घातलेली
समाजातून 21व्यां शतकात ही या सामाजिक जात व्यवस्था मानसिकता आपण तोडू शकलेलो नाही
त्या काळच्या स्थिती मुळे थोराड झालेल्या अण्णा भाऊ यांना शाळेत घातले, परंतु गुरुजी नी केलेल्या भेदभावामुळे त्यांनी फेकून मारलेली छडी विना विलंब गुरुजींच्या दिशेने भिरकवण्याचा बंडखोरपणा त्यांच्या रक्तात होता.
इथे लक्षात घ्या की पूर्वाश्रमीच्या महार व मातंग समाजात अन्याया विरोधात पेटून उठण्याची , बंड करण्याची संघर्ष शील वृत्ती जन्मजात आहे
तिला दाबून टाकण्याचा मार्ग त्यांची शास्त्र आणि शस्त्र बंदी सह त्यांची उत्पादनाची साधने काढून घेण्यातून निर्माण झालेला होता
पुढे अण्णाभाऊ युवा अवस्थेत रोजगाराच्या संधी चे शोधात मुंबई कडे 350 किमी चालत जाऊन “चिरा नगर ” चे झोपडपट्टीत स्थिरावले
लाल बावटा “चे कामगार चळवळीतून त्यांनी मार्क्स वादाचे धडे गिरवले, श्रमिकांच्या शोषण व्यवस्थेचे मर्म जाणले .
आणि त्या ही पुढे जाऊन त्यांनी धर्मवादी व्यवस्थेने पिळले , इथपर्यंत पोहचले
रशियन क्रांती साठी प्रेरणा दाई ठरलेली मॅक्सीम गोर्की यांची “आई” नावाची कादंबरी त्याची रचना त्यांना भावली
साहित्याच्या माध्यमातून आपण ही सामाजिक राजकीय क्रांतीला हातभार लावू शकू याच प्रेरणेतून ते साहित्य निर्मितीकडे वळले
कथा संग्रह , नाटक , चित्रपट कथा, छक्कड , पोवाडे , असे एकाहून एक सरस अश्या कला कृती निर्माण झाल्या
माणसांच्या जिवंत वेदना त्यांची लेखणी बनली , त्यांच्या तील संघर्ष आणि नैतिक मूल्य यांची पखरण त्यांनी बेमालूम पणे साहित्यात केली
फकिरा मधील मानवता वादी अण्णा कुलकर्णी त्यांनी उभा केला
फकिरा अण्णा ना विचारतो अण्णा दुष्काळात घरात अन्नाचा कण नाही , आम्ही कसं जगावं?
अण्णा म्हणतात कसं जगावं हे मला विचारू नका ,,,, पण मी तुम्हाला सांगतो “कुत्र्याच्या मौतीने मरू ही नका
आणि पुढे मठा वरचा तो दरोडा , ज्वारीची रास घेऊन महार वाड्यात आणि मांगवडयात घरटी केलेलं समान वाटप
“उरलेलं धान्य डावा डावाने वाटून टाका , लक्षात ठेवा एक एक दाणा एक एक दिवस माणसाला जगवेल
धान्याचा माग काढत आलेल्या पोलिसांना अण्णा कुलकर्णी म्हणतात त्यांच्या घरात धान्य म्हणून ते चोर असतील तर मला ही अटक करा माझ्या ही घरात ते धान्य आहे
इथे अण्णा भाऊ ब्राम्हणेतर चळवळीला नकार देतात
माणसे सृष्ट असतात तशीच ती दृष्ट ही असू शकतात , व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अस्तित्वात असतात.
म्हणून मला माणसांचे विकृती करण करणे आवडत नाही अस ते म्हणायचे
मी कल्पनेचे पंख लावून भराऱ्या मारत नाही , मी जे पाहिलं , सोसलं , अनुभवलं ते ते लिहीत गेलो
परिस्थिती वर रडणारी माणसे मला आवडत नाहीत , त्यावर स्वार होऊन त्याचेशी दोन हात करणारी संघर्ष शील माणसे मला भावतात
थोडक्यात ते शुरता , विरता याचे भोक्ते होते
पण या हून ही महिलांच्या अब्रूची प्रतिष्ठा राखणारी माणसे त्यांनी साहित्यातून उभी केली
“मंजुळा”ही माझी सर्वात आवडती कला कृती ,
यातील पाटील आणि त्याचा नोकर गणू माळा ने चाललेले असताना त्यांना स्मशानात अर्धवट जळणारे प्रेत दिसते , आजूबाजूची लाकडे गोळा करून ते प्रेताचे बाहेर राहिलेले अवशेष त्या चितेत ढकलतात
वाटेने जाताना गणू पाटलाला विचारतो , पाटील काय नशीब असत बघा एका एका माणसाचे ?
कांहीं जणांना चंदणात जाळले जाते , तर कांहीं जणांना पुरेशी लाकडे ही नशिबात नसतात
तेंव्हा पाटील म्हणतात , ” गणू जगात दोन प्रकारची माणसे असतात
एक आपले स्वतः चे पोट व दुसऱ्याचे ही पोट स्वतः चे पाठीवर घेऊन जगणारे
आणि दुसरे आपली स्वतःची पोटे दुसऱ्याच्या पाठीवर लादून स्वतः सुखात जगणारे
माझ्या हातात खुरपे आणि दोर होता तो पर्यंत माझ्या शेतीचे दस्त सावकाराच्या तिजोरीत बंदिस्त पडलेले होते
हातातील खुरपे आणि दोरी टाकून बंदूक घेतली आणि सावकाराने दस्त टरा टरा फाडून टाकले
(आत्ता लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आहे , आत्ता बंदुकीची भाषा बोलून चालणार नाही
पण या वर्गाला मिळालेल्या लोकशाही हक्काचे , राजकीय आरक्षणाचे संरक्षण आपल्या सर्वांना संघर्ष करूनच टिकवावे लागेल)
जे आज प्रस्थापित राज्यकर्त्या नी बनावट लोकांच्या माध्यमातून हिसकावून घेण्यास सुरुवात केली आहे
आपल्यातील षंढ आणि विकाऊ नेत्यांनी स्वतःचे आर्थिक राजकीय लाभाचे मोहापायी आपले अधिकार व हक्क त्यांच्या पायावर गहाण टाकले आहेत
ते लोक ही समाजाचे वैरी आहेत , फुले शाहू आंबेडकर , अण्णाभाऊ साठे यांच्या नावाला न जागणारे ते लोक आहेत
मी आर्थिक दृष्ट्या श्रीमंत भांडवलदार नाही, पण मी या विचाराचा वारसदार आहे
या अन्याया विरोधात कुणी तरी लढणे आवश्यक होते , ते शिवधनुष्य मी आपल्या या दोन्ही समाजातील प्रामाणिक वैचारिक वारसदारांच्या आधारे उचलायचे ठरवले आहे
राजमाता अहिल्यादेवी यांच्या नैतिक राज्य कारभारात त्यांनी ठगांचा बंदोबस्त केला होता
तो ठग बोलण्यात हुशार असतो परंतु त्याची अंतिम कृती गळ्यात रुमालाने फास आवळल्या नंतर कळते
या ठगाला आताच गाडले नाही तर राजकीय आरक्षण सहित तुमचे शैक्षणिक व नोकरीतील ही आरक्षण गेलेच म्हणून समजा
शेतकऱ्या चे काडी ला ही हात लावू नका म्हणून आपल्या सैनिकांना बजावणाऱ्या छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या समाजा ला हे सांगावे लागत नाही की ज्याच्या वाट्याचे आहे ते त्यालाच राहू द्यावे
अश्या सर्व जाती समूहातील न्यायप्रिय माणसांच्या सहकार्याने आपण ही लढाई लढू आणि जिंकू ही
अण्णा भाऊ साठे यांच्या जयती निमित्ताने हा प्रण आपण करूयात
अण्णाभाऊ यांना जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत