नळदुर्ग येथे बालाघाट शिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदी डॉ सुभाष राठोड यांची विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृत निवड
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. सुभाष राठोड यांची विद्यापीठ प्रशासनाकडून अधिकृत नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्या देण्यात आल्या. तत्कालीन प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बालाघाट शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. सुभाष राठोड यांची महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती केली होती. या कालावधीत राठोड यांची काम करण्याची तळमळ पाहून संस्थेने विद्यापीठ प्रशासनाकडे कायम स्वरूपी प्राचार्याची नेमणूक करण्याचा प्रस्ताव पाठवून सदरील पदाची मुलाखत घेऊन कायमस्वरूपी प्राचार्याची नेमणूक करावी अशी मागणी केली होती.
त्या अनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने काल महाविद्यालयात प्राचार्य पदाच्या मुलाखतीस आलेल्या प्राचार्यांच्या मुलाखती घेतल्या व डॉ. सुभाष राठोड यांची नियुक्ती केली. महाविद्यालयाच्या वतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थित नूतन प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांचा कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील , वनस्पती विभाग प्रमुख डॉ. विजय सावंत , नॅक समन्वयक डॉ. शिवाजी घोडके , प्रा. आशिष तिडके यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पांडुरंग पोळे यांनी केले तर आभार डॉ. सचिन देवद्वारे यांनी मानले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत