“शाक्य” संस्थेचे सल्लागार अशोकजी भालेरावसर यांची शोकसभा..
का. क भालेराव सर यांच्या निधनाने संस्थेचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यांचे अंत्य विधीसाठी मुंबई येथे जाण्याची इच्छा बहुतेक जणांची असतानाही ते शक्य झाले नाही आयु.केरु जाधव सर, व मुके सर हे दोघे नक्की वंदे भारत या रेल्वेने जायचे निश्चित झाले होते.पण ते शक्य झाले नाही कारण निसर्ग.
दिनांक ०४/०८/२०२४ रोजी भालेराव कुटुंबीय यांचे वतीने त्यांचे सोलापुरातील निवास स्थानी शोक सभा आयोजित केली असून त्या शोक सभेस “शाक्य” संस्थेच्या सर्व सभासद यांनी सहभाग नोंदवावा.असे विचार आयु. अशोक दिलपाक सर यांनी व्यक्त केले. ते आयु. केरु जाधव यांनी मान्य केले.
“त्यांना सर्वांची सहमती आहे”
अमच्या "शाक्य" सामजिक बहुउद्देशीय संस्थेचे सल्लागार आयु.भालेराव सर यांनी पंचाहत्तरी पार केली. तेंव्हा सुचलेले काव्य.
गुणोत्तम गुणाची व्यक्ती
तयाची नवतरुण शक्ती
नित्य धम्मा प्रती भक्ती
शिस्त पालनाची सक्ती
प्रेम प्रवाहाची आसक्ती
नाते जपण्याची युक्ती
व्हावी हर पिडेची मुक्ती
स्वीकारा निर्माल्य पंक्ती
डॉ.मुके अं.ना.(M.A.N.)
===========================
आसवे ! आसवे !!
{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}
“शाक्य”संस्थेचे अपरिमित नुकसान झाले
अ शो क जी आम्हा, शोकात लोटूनी गेले
करारी बाणा, धाडसी, हे भिमजीच लेकरू
नित्य करी निराधारांची सेवा रमाचं पाखरू
मी अनेक भले भले पाहिले,या सम नाही
अशोकासम निवृत,पोलिसात शोधून पाही
४७ मुलं,शिक्षणासाठी त्यांनी घेतले दत्तक
अनेकांची शेवा हेच त्यांचे जीवनचे पुस्तक
तव जीवनाच्या पुस्तकाची पाने पाहताना
ती पानेही दिसली आम्हास अश्रू ढाळतना
प्रतेक पानावर वेगळ्याच कीर्तीचा मधुगंध
विद्यार्थ्यांची सेवा हाच अशोकाजीचा छंद
कीर्ती सांगती, अशोकजीच्या पाऊल खुणा
काय घेऊन आलो,व काय न्यायचे ते जाणा
येशी उघडा,जाशी उघडा हे सारे नित्याचे
सत्कर्म करीत राहणे, हेच वागणे सत्याचे
हे मर्म जाणिले होते बुद्धवासी आशोकाने
हे सारे जवळून पाहिले त्या सृष्टी चालकाने
सर्वां आवडीचा,नक्की आवडे विधात्याला
त्यांचाच होता,नेमका त्यांनाच घेऊन गेला
सार्थ झाले तव जीवन ही मधुर सुमनांजली
सर्व शाक्य संस्था जीवांची साश्रू श्रद्धांजली
डॉ.मुके अं.ना.(M.A.N.)
===========================
*** तरी “शाक्य” संस्थेतील सर्व
मान्यवरांना नम्रपणे सूचित करण्यात येत आहे की, आपण सर्वांनी दिं. ०४/०८/२०२४ रोजी, शिक्षक सोसायटी येथील भालेराव सर यांचे निवासस्थानी शोक सभेस उपस्थित राहावे ही विनंती करीत आहोत. (वेळ नंतर कळवण्यात येईल.)
अध्यक्ष
डॉ.मुके अं.ना.(M.A.N.)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत